NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शनिवार, ३० मे, २०१५

पोलिस वाहन पसार..

गाभण गाईला जबर धडक देवून पोलिस वाहन पसार..
वाहनचालकाचे वागणे अशोभनीय..
तक्रार देवूनही ..केवळ चौकशी सुरु.. 
शेतकर्यास न्याय मिळेल काय..? 
हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील खैरगाव तांडा येथे रस्ता पार करणाऱ्या पोलिस व्हैनने एका गाभण गाईला जबर धडक दिल्याने जबर जखमी झाली असून, तिच्या पोटातील वासरू मृत होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचा पशु वैदकांचा अंदाज असून, मृत्यूशी झुंज देत असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे खैरगाव तांडा येथे दि.२९ च्या सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान पाणी पिवून एक गाभण गाय नांदेड - किनवट रस्ता ओलांडत होती. दरम्यान याच वेळी नांदेड  पोलिस दलाची वहिन जिचा क्रमांक एम.एच.२६ -आर ०५१६ या भरधाव वेगातील गाडीने पशु पालक रामा सटवा भालेराव यांच्या गाभण गाईस जबर धडक दिली. या घटनेत सदर गाय मुर्चीत होऊन खाली पडली असून, दोन्ही पाय निकामी झाले आहेत. यावेळी धडक देवून पसार होत असताना प्रत्यक्ष दर्शी नागरिकांनी आरडा - ओडर करून पोलिस गाडीला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसी अविर्भावात वाहन चालक तेथून पसार झाला. संबंधित पशु पालक शेतकर्याने गावातील एका ऑटो चालक युवकास फोनवरून हि माहिती देवून हिमायतनगर शहरातील उमरचौक येथे गाडीला थांबविण्याची विनंती केली. पशु मालकाच्या विनंतीवरून ऑटो चालक युवकाने पोलिस गाडीस उमरचौक येथे थांबवून संबंधित घटनेची चौकशी केली. परंतु नांदेड पोलिस दलातील हेकेखोर वाहन चालकाने अरेरावीची व उर्मटपनाची भाषा वापरू गाडीसह तेथून पोबारा केला. असे जखमी गाईचे मालक राम भालेराव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


सदरील घटनेमुळे माझे जवळपास २० ते २५ हजारचे नुकसान झाले असून, पोलिसाकडून न्याय मिळवून देण्याची आपेक्षा ठेवणाऱ्या नांदेड पोलिस दलावर सदरील वाहनचालकाच्या अशोभनीय वागण्याने मान खाली घालण्याची वेळ आली आहे. आदीच दुह्स्कालात होरपळनार्या शेतकर्यास पोलीसामुळे नुकसान सहन करावे लागत असल्याने एम.एच.२६ आर ०५१६ च्या वाहनचालकावर हिमायतनगर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. इतर नागरिकांना न्याय मिळवून देणाऱ्या हिमायतनगर पोलिसाकडून पोलिस खात्यातील आरोपी वाहन चालकावर कोणती कार्यवाही केली जाणार व शेतकर्यास नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल काय..? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या बाबत पोलिस उपनिरीक्षक सुशील चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, तशी तक्रार आली असून, या घटनेची चौकशी सुरु आहे, चौकशी अंती काय निष्पन्न होणार ते अवघ्या काही दिवसातच सोर येईल असे त्यांनी सांगितले.

याबाबत पशु अधिकारी माघाडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, जखमी गाईवर तपासणी करण्यात आली असून, तीच्यावर उपचार करण्यात आले आहे. गाय तीन महिन्याची गाभण असल्याने पोटातील गर्भाविषयी अंदाज बंधने अवघड असल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले. 


   
टिप्पणी पोस्ट करा