NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, २९ एप्रिल, २०१५

शुद्ध पेयजल प्लांटच्या उद्घाटन

श्रीक्षेत्र परमेश्वर मंदिर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही....आ.नागेश आष्टीकर 

हिमायतनगर(वार्ताहर)जाज्वल देवस्थानच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा वाढवून मंदिर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणणार असल्याचे प्रतिपादन हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी केले. ते हिमायतनगर परमेश्वर मंदिराच्या वतीने भाविक भक्त व शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्ठीने बसविण्यात आलेल्या शुद्ध पेयजल प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी प्रथम बसविण्यात आलेल्या प्लांटची पाहणी व पूजन करून व फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने आ.आष्टीकर यांच्या उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी शाल - श्रीफळ देवून सत्कार केला. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, परमेश्वर मंदिर कमेटीने आजवर राबविण्यात आलेले सर्व उपक्रम प्रशंसनीय आहेत. त्यातून मंदिराचा विकास व सामाजिक बांधिलकी जोपासली गेली आहे. दर्शन व मंदिरात विसाव्यासाठी येणार्यांना दुषित पाण्याच्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शुद्ध पेयजल योजना कार्यान्वित केली. मंदिराच्या वतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम अतिशय गरजेचा होता. शासनही असे उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्या माध्यमातून पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या सोयीसाठी चौकात चौकात फिल्टरचे प्लांट बसविण्याच्या तयारीत आहे. याच  बरोबर मंदिर संचालकांनी सुचविल्याप्रमाणे मंदिरासह शहराच्या विकासासाठी मी कटीबद्ध असून, यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासनही त्यांनी दिले.


दरम्यान मंदिराचे उपाध्यक्ष श्रीश्रीमाळ यांनी सांगितले की, नांदेड - किनवट रस्त्यावर तहसील शेजारी असलेल्या मंदिराच्या १५ एकर जागेत शुशोभित व नैसर्गिक असे भव्य उद्यान व्हावे. जेणेकरून  शहरातील वयोवृद्ध, बालके, व सहकुटुंब नागरिकांना फिरण्यासाठी तथा विरंगुळ्यासाठी रम्य ठिकाण उपलब्ध होऊन शहरच्या वैभवात भर पडेल. यासाठी शासनाकडे पाठ पुरावा करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. त्यांच्या मागणीला दुजोरा देत आमदारांनी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी मंदिर समितीचे सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, संचालक लक्ष्मण शक्करगे, संभाजी जाधव, राजाराम झरेवाड, प्रकाश शिंदे, वामनराव बनसोडे, अनंता देवकते, माधव पाळजकर, स्वीय्य सहाय्यक बंडू पाटील आष्टीकर, हदगाव - हिमायतनगर विधानसभा संघटक विजय वळसे, शिवसेना तालुका रामभाऊ ठाकरे, महिला आघाडी प्रमुख चंद्रकला गुड्डेटवार, ज्ञानेश्वर शिंदे, परमेश्वर इंगळे, जफरभाई, किशनराव वानखेडे, रामराव पाटील, शंकर पाटील, गणेश कदम, परमेश्वर पानपट्टे, संजय काईतवाड, विशाल राठोड, राम नरवाडे, रमेश गुड्डेटवार, गजानन पाळजकर, प्रकाश रामदिनवार, विलास वानखडे, गजानन वानखेडे, गजानन हरडपकर, हानुसिंग ठाकूर, दिलीप शिंदे, नांदेड न्युज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार, परमेश्वर शिंदे, धम्मपाल मुनेश्वर, यांच्यासह शिवसैनिक कार्यकर्ते, गावकरी, पत्रकार, मंदिराचे कर्मचारी उपस्थित होते. 
टिप्पणी पोस्ट करा