NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०१५

‘‘जिवनातील आठवणीचा प्रवास’’

इंजि.शिवाजीराव नारायणराव सुर्यवंशी
सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता


दि.28 फेब्रुवारी 2015 सार्वजनिक बांधकाम खात्यातील नांदेड विभागातून इंजि.एस.एन.सुर्यवंशी साहेब आज आपल्या शासकीय सेवेची 33 वर्ष 6 महिणे एवढी प्रदीर्घ काळ सेवा करुन सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जीवनपटातील आठवणीचा हा प्रवास. हदगाव तालुक्यातील कामारी सारख्य खेड्यात स्वातंत्र्यपूर्व निजाम काळात, धर्म विवेक व शिक्षण यासारख्या कलागुणांची जन्मजात आवड असलेली, पांडूरंगराव शिरफुले सारखे शिक्षणमित्र राहिलेले कै.साहेबरावजी बारडकर व केशवरावजी धोंडगे सारख्या निस्वार्थ सेवा करणारे लोकनेते यांच्या नेहमीच सानिध्यात राहणारे धर्म व सहिष्णुनतेचा वसा जपून शिवाजीरावांचे वडील कै.नारायणरावजी सुर्यवंशी व आई इंदिराबाई यांच्या पोटी 1957 साली शिवाजी हे रत्न जन्माला आहे. रत्न या शब्दाचा उल्लेख एवढ्यासाठीच धर्म व सहिष्णुनता, विवेक व शिक्षण या तीन्ही विषयांचा परिपूर्णं वसा शिवाजीरावांनी आपल्या जीवनात अंगीकारुन जीवन प्रवासाला सुरुवात केली.

Flexible Personality, To Finish the work, First Start Most Outstanding Bridge National Award 1997
मुळातच कौटूंबिक शिक्षणाची आवड असलेल्या शिवाजीरावांनी बी एस सी मॅथस, बी ई सीव्हील, एम आय ई चॅर्टड इंजिनइर सारख्या पदव्या घेवून 1981 साली सहजगत्या सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर येथे सहाय्यक अभियंता या पदापासून शासकीय सेवेची सुरुवात केली. अतिशय कुशाग्र बुद्धी, विचाराची सर्वसमावेषकता, शैक्षणिक पात्रता या सारखी गुणवत्ता अंगी आहे. 1980 ते 85 चा काळ शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी स्वाभिमान, बुद्धीमान व मेहनतीची कदर करणार्‍यांचा होता. त्या काळात मलाही अशीच सहज शासकीय सेवा करण्याची संधी मिळाली. त्या काळात पैशापेक्षा बुद्धी व गुणवत्तेलाच अधीक संधी असत. आज दुर्देवाने असे चित्र फारच दुर्मिळ. शिवाजीरावांच्या शासकीय सेवा काळाच्या प्रवासाची सुरुवात सहाय्यक अभियंता श्रेणी-2 ते उपविभागीय अभियंता, भोकर पासून ते नांदेड - परभणी-मुंबई-पाथरी-माहूर-वसमत-मुखेड-नायगाव पर्यंत अविरतपणे करत असतांना त्या काळात अतिशय कुशाग्र बुद्धीचे मेहनती व प्रशासकीय कामाचा गाढा अभ्यास असणारे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता इंजि.अंबडकर, कंधारे, निर्मले, पसारकर, घोलसंघी, एम.एम.खान, मेंढेकर, तुंगे, अविनाश धोंडगे, नवले, राजपूत साहेबांचे मार्गदर्शन त्यांना नेहमीच लाभले. याचा आवर्जुन उल्लेख करावाच लागेल. भोकर विभागातील नक्षलग्रस्त भागातील रस्ते विकासाचा आरखडा तयार करुन अनुदानासह मंजूरी घेणे, विशेष प्रकल्प विभाग ठाणे अंतर्गत ठाणे कळवा रस्त्यावरील खाडी पुलाची बांधणी, पाथरी-लिंबा-विटाळ-सोनपेठ रस्त्यावरील विटा गावाजवळ गोदावरी नदीवरील पुल बांधणी. पाथरी येथील न्यायालयीन इमारतीचे बांधकाम, वसमत येथील न्यायालयीन व स्त्री रुग्णालयाचे बांधकाम, पेनुर येथील गोदावरी नदीवरील पुलाचे बांधकाम, खाजगीकरणाअंतर्गत शिरुर ताजबंद-मुखेड-नरसी-बिलोली, नरसी-देगलूर रस्ता, मुखेड येथील आयटीआय इमारत व मुख्य प्रशासकीय इमारत उभारणी, मा.जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार महामहार्गावरील अतिक्रमणे काढणे यासारखे असंख्य कामे त्यांच्या काळात प्रगतीपथावर राहून पुर्णंत्वाच्या मार्गावर असल्यामुळे त्यांच्या कष्टाची व कर्तव्यनिष्ठतेची जाण देत उभी आहेत. या वृत्तीमुळे व त्यांच्या कार्यतत्परतेमुळे ठाणे, पाथरी येथील त्यांच्या कामाच्या कर्तव्यनिष्ठतेमुळे वेळोवेळी त्यांना , मराठी पत्रकार संघ हिमायतनगर तर्फे उत्कृष्ठ सेवा पुरस्कार, गुरुवर्यत एम.पी.भवरे, कामाटीकर स्मृती पुरस्कार-2014 तर्फे कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार, तत्कालिन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने महामार्गावरील अतिक्रमणे वेळेत काढल्याबद्दल अभिनंदनपर पत्र देवून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करुन त्यांना सन्मानित करण्यात आले. शिवाय खात्यातर्फे अतिउत्कृष्ट सेवा म्हणून अगाऊ वेतनवाढही देण्यात आली. पूर्वी लोकप्रतिनिधी व राजकीय पुढारी सार्वजनिक विकासात्मक व विधायक कामासाठी अधिकारी व कर्मचार्‍यावर दबाव टाकायचे. आज वैयक्तीक विकासासाठी दबावतंत्राचा जास्तीत जास्त वापर प्रशासकीय कामात आपणास दिसून येतो. अशाही परिस्थितीत न डगमगता आपल्या शिवाजीरावांनी सेवा काळात सार्वजनिक विकासाकडे प्राधान्याने लक्ष दिले.

अशा सकारात्मक जीवनशैलीचा सर्वांगाने विचार करणारे आपले शिवाजीराव आजही तरुणच आहेत. केवळ वयामुळे ते सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचा देह व मन अजूनही छत्रपतीसारखे तरणेबांड आहे. अशा कर्तव्यनिष्ठ, बुद्धीमान, मनमिळावू स्वभावाच्या अधिकार्‍यामुळे काही अंशी का होईना बांधकाम खात्याची प्रतिष्ठा शाबुत ठेवण्यास मदत झाली. हीच विचाराची परंपरा आपण सर्वांनी मिळून वृद्धींगत केली तर बांधकाम खाते पूर्वीसारखे नावारुपास आल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या आचारविचाराची परंपरा अशीच वृद्धींगत करुन महाराष्ट्रातील बांधकाम खात्याला भ्रष्टाचार मुक्त व विकासात्मक समृद्धीकडे नेण्याचा खारीचा का होईना सहभाग आपण सर्वजण घेवू या. त्यांच्या या जीवनप्रवासातील थोडासा सहवास मलाही लाभला. त्याबद्दल मी नशिबवानच म्हणावे लागेल. उच्च विद्याविभूषीत मुलगा व मुली, अतिशय शालीन मनमिळावू कुटूंब उत्सल असलेल्या त्यांच्या सहजीवनदायनी परिवाराने भरलेला शिवाजीरावांचा परिवार हाही इतरांना हेवा वाटावा असाच आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते की, कर भला । होगा भला अतं भले का भला । आपल्या शिवाजीरावांच्या जीवनप्रवासातील आठवणीची ही शिदोरी सहहृदय, प्रेमपूर्वक त्यांना समर्पित करुन बांधकाम खात्यात अशीच विश्वासार्ह्यता जपून कर्तबगार पिढी निर्माण व्हावी म्हणूनच या जीवनप्रवासातील शब्द जुळविण्याची ही तळमळ व खटाटोप. त्यांना व त्यांच्या कुटूंबियांच्या क्षेमकल्याणासाठी व दिर्घायुष्यासाठी सदभावना व शुभेच्छा व्यक्त करुन त्यांचे सर्वांचे भविष्यही असेच तेजोमय होवो हीच मनोमन सदिच्छा ठेवून या जीवन प्रवासातील आठवणींना लाल सलाम करतो.
                                                                           जीवनाच्या आठवणीतील सहप्रवासी -कॉ.के.के.जांबकर
टिप्पणी पोस्ट करा