NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, ४ फेब्रुवारी, २०१५

२९ जानेवारीपासून कर्मचारी गायब

हिमायतनगर(वार्ताहर)विविध मागण्यासाठी दि.१० फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय मोर्चा असून, कर्मचारी मात्र २९ जानेवारी पासुनच गायब असल्याने जमिनीच्या वादात अडकलेल्या शेतकर्यांना अजून एक अडचण निर्माण झाली आहे.

अनेक दिवसपासून शेतकऱ्यांचे जमीन मोजणीसाठी प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा निपटारा करणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी मात्र बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे शेतकर्या बरोबर सर्व सामान्य नागरिकांना अडचण निर्माण झाली असून, उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात जमि मोजणी, पी.आर.कार्ड, नकाशे यासाठी चकरा माराव्या लागत आहेत. कार्यालय चालू असले तरी या कार्यालयातील काही तळीरामामुळे नागरिकांना १५ - १५ दिवस एका कामासाठी घालावे लागत आहेत. आत तर मोर्चाच्या नावाखाली अनेक दिवसापासून गैरहजर राहणाऱ्या कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्य शासन दरबारी मार्गी लागे पर्यंत कार्यालयाचा कारभार रामभरोसे पडला आहे. या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देवून मागण्या मार्गी लागेपर्यंत कार्यालयाचा कारभार सुरळीत करून शेतकऱ्याच्या समस्या दूर करण्याची मागणी शेतकरी, नागरिक करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा