NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

मंगळवार, २७ जानेवारी, २०१५

शेतकर्याची आत्महत्या

नापीकीला व बँक कर्जाला कंटाळुन शेतकर्याची आत्महत्या 

लोहा(वार्ताहर)जुना लोहा येथील स्वत:चे घरी मयत संभाजी माधव पवार, वय 25 वर्ष, व्यवसाय शेती, राहणार या शेतकर्याने यावर्षी पाऊस समाधान कारक न झाल्याने शेतात नापीकीला व बँकेचे कर्जास कंटाळुन स्वत:चे घरातील लाकडी तुळईला दस्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अशी फिर्याद सचिन बालाजी पवार, वय 20 वर्ष, व्यवसाय शेती राहणार  यांनी दिल्यावरुन लोहा पोलिस स्थानकात कलम 174 सिआर.पि.सी.प्रमाणे आकस्मिक मृत्यू दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोहेकॉ जायभायेे हे करीत आहेत.

माहुर येथील शेतकर्याची गळफास घेवून आत्महत्या 

माहुर(वार्ताहर)तालुक्यातील मौ. हडसनी शिवार येथे,मयत अंकुश गोविंदराव शिंदे, वय 28 वर्ष, व्यवसाय शेती, राहणार हडसनी याने हडसनी शिवारात अंब्याच्या झाडाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन मरण पावला. अशी फोर्याद कुबेरराव भावराव शिंदे, वय 31 वर्ष, व्यवसाय शेती, राहणार हडसनी ता. माहुर यांनी दिल्यावरुन माहुर पोलिस स्थानकात कलम 174 सिआर.पि.सी.प्रमाणे आकस्मिक मृत्यू दाखल करण्यात आला असून तपास नापोकॉ गेडाम हे करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा