NEWS FLASH नांदेड़ पुलिस भर्ती में बड़ा घोटाला, होणे के बाद परीक्षा रद्द 15 गिरफ्तार, और भी जगह घोटाला आ सकता है सामने, ..., **

बुधवार, २८ जानेवारी, २०१५

चित्रांचे प्रदर्शन

चित्रकलेमुळे मानवी भावनाचा अविष्कार होतो - शिवाजीराव जाधव


नांदेड(प्रतिनिधी)जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता. मुखेड संचलित वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांनी वर्षभरात काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या चित्रप्रदर्शनांचे उद्‌घाटन संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, चित्रकलेत मनुष्याच्या भावनांचा अविष्कार होत असतो. आपल्या मनातील भावना कागदावर प्रत्यक्ष उतरविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. परंतु त्या विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे अनिवार्य आहे. प्रदर्शनात मांडलेल्या नाविन्यपूर्ण चित्रांचे अवलोकन त्यांनी केले आणि विद्यार्थी तसेच कलाशिक्षक एस. एल. रेपेकर यांची प्रशंसा केली.या प्रदर्शनात मांडलेल्या चित्रापैकी अनिकेत रामदास कांबळे वर्ग नववा (अ) यांचा प्रथम क्रमांक आला द्वितीय महेश बाबुराव पांचाळ तर विद्या मधुकर गायकवाड या विर्द्यानीचा तृतीय क्रमांक आला प्रोत्साहनपर प्रियंका वानखेडे व आश्विनी शिंगनवाउ यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

तसेच देशभक्तीपर गीत गायनामध्ये सर्व प्रथम आलेल्या कु. आकांक्षा मोतेवार या विद्यार्थीनीचा 500 रुपये रोख बक्षीस शिवाजीराव जाधव यांच्या तर्फे देण्यात आला. या प्रदशृनाच्या उद्‌घाटनप्रसंगी मु. अ. सौ. पल्लेवाड, उपमु.अ. ए. एन. मादळे, पर्यवेक्षक ए. एस. लघुळे, प्रा. हंगरगेकर, प्रा. जाधव, प्रा. भारसावडे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी चित्रप्रदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एन. एम. भारसावडे यांनी तर आभार सौ. पल्लेवाड मॅडम यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा