NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, २८ जानेवारी, २०१५

२१ वा पदवीदान समारंभ शुक्रवारी

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा  शुक्रवारी २१ वा दीक्षान्त समारंभ
यंदा १ लाख ३२ हजार ३२७  विद्यार्थ्यांना केली जाणार पदवी प्रदाननाशिक(प्रतिनिधी)यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २१ वा पदवीदान समारंभ शुक्रवार दिनांक ३० जानेवारी २०१५ रोजी विद्यापीठाच्या नाशिक येथील मुख्यालयात सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहेविविध शिक्षणक्रम उपलब्ध करून देऊन ‘ज्ञानगंगा घरोघरी’ पोहोचविण्याचे आपले ध्येय साध्य करत राज्यातील सर्व जिल्ह्यांत चार हजारांहून अधिक अभ्यासकेंद्रे असलेले मुक्त विद्यापीठ यंदा १ लाख ३२ हजार ३२७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ.माणिकराव साळुंखे यांनी आज पत्रकार परिषदेत दिलीयावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी विद्यासागर राव आणि संगणक तज्ञ तथा आणि बोर्ड ऑफ गर्व्हनस आयआयटीचे अध्यक्षडॉ. विजय भटकर हे उपस्थित असतील.

यावेळच्या पदवीदान समारंभाची आकडेवारी असे दर्शवते की, राज्यातल्या युवा वर्गाने मुक्त शिक्षण’ पद्धती मनापासून स्वीकारली आहे. राज्याच्या ३५ जिल्ह्यांत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ज्ञानगंगा घरोघरी” पोहचविण्याच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे. यावर्षी पदवी/पदविका घेणाऱ्यांमध्ये राज्यातील १ लाख ३२ हजार ३२७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या समारंभात पदवी ९८ हजार ४२६, पदविका २७ हजार १९० तर पदव्युतर पदवी शिक्षणक्रमाचे ६ हजार ६९१ विद्यार्थी पदवी ग्रहण करणार आहेनोकरी व्यवसाय करून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सुमारे ७६ टक्के एवढे आहे, तर २० विद्यार्थी पीएच. डी. मिळविणार आहेत. मुक्त शिक्षणपद्धतीमध्ये महिलांची संख्या वाढत आहे. यंदा पदवी, पदविका घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महिलांची संख्या ४२ हजार ८१२ आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील पुरुष विद्यार्थ्यांचे प्रमाण जरी वेगवेगळे असले तरी महिलांचे ग्रामीण व शहरी भागातील प्रमाण जवळजवळ सारखे आहे.

यावर्षी पदवी घेणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण ६१ टक्के तर महिलांचे प्रमाण ३९ टक्के आहे. स्री-पुरुष प्रमाणात सर्वाधिक महिला कल्याण विभागात आहेत. त्याखालोखाल मुंबई आणि कोल्हापूर विभाग आहे. तर आकडेवारीनुसार विद्यापीठाच्या सर्वात जास्त महिला ८ हजार ७७४ नाशिक विभागात आहे. त्याखालोखाल औरंगाबाद नांदेड ८ हजार ७७ आणि पुणे विभागात ६ हजार ५७५ असे महिलांचे प्रमाण आहे. शहरी भागातील विद्यार्थी ३९ हजार ५२६ आहे. उच्च शिक्षण समाजाच्या वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय असलेल्या मुक्त विद्यापीठाने ग्रामीण भागातही मोठी विद्यार्थीसंख्या मिळवली आहेयंदाच्या पदवीदान समारंभात पदवी घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेततर आदिवासी भागातील १२ हजार १५० विद्यार्थी आहेत. गेल्या वर्षीच्या संख्येपेक्षा यावर्षी पदवीग्रहण करणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ आहे. यावर्षीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुक्त विद्यापीठाने ४०-६० वर्षे वय असलेल्या तब्बल १३ हजार ९३५ व्यक्तींना पुन्हा उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहेतर ६० वर्षेपेक्षा अधिक वय असलेल्या तब्बल १५२ व्यक्ती आपले पदवीधर होण्याचे आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण करीत असून त्यात सर्वाधिक व्यक्ती नांदेड आणि नाशिक विभागातील आहे. मुक्त शिक्षणपद्धतीत पत्रकारांमध्येही अतिशय लोकप्रिय होत असून यावर्षी पत्रकारितेच्या ३६२ विद्यार्थ्यांना पदवी घेता येईल. सर्वात जास्त विद्यार्थी बी.ए. चे ८१ हजार ५९८ तर बी.कॉम.चे ८ हजार ९२७ विद्यार्थी पदवी घेतील.स्पर्धात्मक युगात अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणा-या एम.बी.या शिक्षणक्रमाचे ९५४ विद्यार्थी पदवी ग्रहण करीत आहेततर बी.एस.सी.एमएलटीचे २२७एम.एड.२५०, एमएसडब्ल्यू ६८, एम.ए. (मराठी) २ हजार ८१०, एम.ए. (शिक्षणशास्र) ३२३, एम. एस्सी. फूड सायन्स २८, एम. लिब ३४९, ग्रंथालयशास्र ८१०, बी.एड. १ हजार ४९९ विद्यार्थी पदवी ग्रहण करीत असून ६९ बंदिवानांचाही त्यात समावेश आहे.

मुक्त विद्यापीठाने शिक्षण केवळ हस्तीदंती मनो-यातून बाहेर आणले असे नाहीतर त्याचे स्वरूप व्यवसायाभिमुख व कौशाल्याधीष्ठीत करण्यावर विशेष भर दिलात्यामुळे पदवीधर आहे परंतू नोकरी नाही असे चित्र निर्माण न होता नोकरी देणा-या उद्योगांना ज्या कौशल्याचे उमेदवार हवे आहेततिच कौशल्ये शिकविणारे अभ्यासक्रम अनेक उद्योगसंस्थांशी सामंजस्य करार करून सुरु केलेएकूणच उच्च शिक्षणाबरोबर व्यवसायाच्या संधीही विद्यापीठ उपलब्ध करून देत आहे. याशिवाय मालेगांवमधील अल्पसंख्याक समाजातील ४५०० यंत्रमाग कामगारांना कौशल्य प्रमाणपत्राचे वाटप करून पूर्वतयारीच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.

कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले की, पुढील शैक्षणिक वर्षापासून एमएसडब्लू अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी विद्यापीठाचा प्रयत्न असून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्याने मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतिहास या चार विषयांत सेमिस्टर पद्धतीने पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पीएच.डी.ची प्रक्रिया सुरु झाली असून विद्यापीठातर्फे २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून त्याना संशोधनासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये विद्यावेतन देले जाणार आहे. याशिवाय दलित विद्यार्थ्यांना शिक्षणक्रमास प्रवेश घेताना प्रत्यक्ष पैसे भरण्याची आवश्यकता भासणार नाही. मात्र त्यासाठी त्यांना शासनाचा ऑनलाईन अर्ज भरावा लागेल असे कुलगुरूंनी स्पष्ट केले. सर्व शिक्षणक्रमांचे मूल्यमापन केले जाणार असून ज्यांना मागणी नाही असे अभ्यासक्रम बंद करण्यात येतील असे ते म्हणाले.

विद्यापीठाचा रुग्णसहायक अभ्यासक्रम चालविणाऱ्या पुण्याच्या श्री भगवानराव नपाते फौंडेशनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून येथे सध्या गरीब आणि वंचित घटकांतील ४४० मुली प्रशिक्षण घेत असून आजवर एक हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी शिक्षणक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. वैद्यकीय क्षेत्रात समाजसेवेचा वारसा जपणाऱ्या या संस्थेतील जवळपास ५०० हून अधिक मुली महाराष्ट्रील नामांकित हॉस्पिटलांत रुग्णसेवेचे काम करीत असल्याचा कुलगुरूंनी विशेष उल्लेख केला. याबरोबरच २०१५-१६ शैक्षणिक वर्षापासून आयटी क्षेत्रातील किंवा पूर्वतयारी शिक्षणक्रम मोबाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल असेही कुलगुरू डॉ. साळुंखे यांनी शेवटी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटूळे, वित्त अधिकारी पंडित गवळी हे उपस्थित होते. प्रारंभी उपकुलसचिव जयवंत खडताळे यांनी पत्रकारांचे स्वागत केले तर संतोष साबळे यांनी आभार मानले.

या पदवीदानाची प्रमुख वैशिष्टे
मुक्त विद्यापीठाने शिक्षण केवळ हस्तीदंती मनो-यातून बाहेर आणले असे नाही, तर त्याचे स्वरूप व्यवसायाभिमुख व कौशाल्याधीष्ठीत करण्यावर विशेष भर दिला. त्यामुळे पदवीधर आहे परंतू नोकरी नाही असे चित्र निर्माण न होता नोकरी देणा-या उद्योगांना ज्या कौशल्याचे उमेदवार हवे आहेत, तिच कौशल्ये शिकविणारे अभ्यासक्रम अनेक उद्योगसंस्थांशी सामंजस्य करार करून सुरु केले. यामध्ये औषध उद्योगातील आंतरराष्ट्रीय महाकंपनी(Pharmaceutical Giant) लुपिन लॅबोरेटरिज लिमिटेड बरोबर शैक्षणिक करार केला आहे. म्हणजेच उच्च शिक्षणाबरोबर व्यवसायाच्या संधीही विद्यापीठ उपलब्ध करून देत आहे.
पदवीदानाचे इंटरनेटवर थेट प्रसारण
या पदवीदान समारंभाचे थेट प्रसारण इंटरनेटवरून करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac तसेचhttp://ycmou.ac.in  या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध असणार आहे. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही पदवीदान समारंभ थेट पाहता येईल.विद्यापीठाच्या विविध पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणक्रमांत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी या दीक्षांत समारंभास उपस्थित राहून पदवी ग्रहण करावी असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा