NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

मंगळवार, २७ जानेवारी, २०१५

कार्याध्यक्षपदी फुलपगार

म. फुले शिक्षक परिषदेच्या कार्याध्यक्षपदी नामदेव फुलपगार
नांदेड(प्रतिनिधी)येथील सामाजिक कार्यकर्ते व छत्रपती शाहू महाराज निवासी अपंग विद्यालयातील कला शिक्षक नामदेव सदाशिवराव फुलपगार यांची महात्मा जोतीराव फुले शिक्षक परिषदेच्या नांदेड जिल्हा (अपंग क्षेत्र) कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. येथील हॉटेल रॉयल प्यालसच्या सभागृहात आयोजित बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. परिषदेचे प्रदेशाध्यक्ष वेंकटराव जाधव व जिल्हाध्यक्ष मधुकर मनुरकर यांनी नामदेव फुलपगार यांना यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष निवडीचे पत्र देऊन सत्कार केला. या बैठकीस राज्य उपाध्यक्ष मुरलीधर गोडबोले, प्रा. राजेश ढवळे, प्रा. विनोदकुमार इंगेवाड, भगवान ताटे, प्रा. दिलीप गोरे, भाऊसाहेब कानोले, विलास देवस्कर, शंकरराव जाधव आदि शिक्षक व मुख्याध्यापकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नामदेव फुलपगार हे नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते व लोहा नगर पालिकेचे माजी नगर सेवक आहेत. तसेच अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. शिक्षक संवर्गातील सर्व प्रकारच्या अडी - अडचणींना तोंड देण्यासाठी संघटन मजबूत करण्याचा मनोदय नामदेव फुलपगार यांनी यावेळी व्यक्त केला. 
टिप्पणी पोस्ट करा