NEWS FLASH लोकसभा विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड. चारुलता टोकास यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली, भाजप नेते माजी आ.रमेश कदम यांचा समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश, मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची जाणीव करून देण्यासाठी गुरुवारी पनवेल सावंतवाडी दरम्यान काँग्रेस पक्ष करणार सत्याग्रह आंदोलन, मुखेड नगरपरिषदेच्या घन - कचरा व्यवस्थापन टेंडर निविदा प्रक्रिया रखडल्याने जागोजाग घाण साचली, राम शिंदे यांना स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्राचे ब्रँड अम्बॅसेडर नेमा- सचिन सावंत **

२९ मे, २०१४

महिलेच्या असभ्य वर्तन

हिमायतनगर(वार्ताहर)शहरातून बोरगडीकडे जाणार्या रस्त्यावरील रॉयलनगर वस्तीतील एका विधवा माहीलेने मागील काही दिवसापासून अश्लील चाळे सुरु केले असून, तिच्या या असभ्य वर्तनामुळे गल्लीतील सभ्य महिलांना मान खाली घालण्याची वेळ आली आहे. याबाबत पोलिसांना तक्रारी देऊनही अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महिलांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त से कि, बोरगडी कडे जाणार्या रस्त्यालगत असलेल्या रॉयलनगर या वस्तीत एका विधवा महिलेने मागील काही महिन्यापासून वेश्या व्यवसायसारखे वर्तन सुरु केले आहे. या ठिकाणी रात्र -दिवस अनेक मध्य धुंद अवस्थेतील नागरिक व आंबट शौकीन येत असल्यामुळे परिसरातील चांगल्या महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल बनले आहे. सदर महिलेच्या वागणुकीमुळे टवाळ खोऱ्या व मद्यधुंद शौकिनांचा नाहक त्रासाने येथील सभ्य घरातील नागरिकांना जगणे अवघड बनले आहे. सदर महिलेच्या या वागणुकीला अवर घालावा अशी मागणी काही महिलांनी येथील पोलिस जमादार अप्पाराव राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. परंतु याबाबत कोणतीही ठोस पाऊले उचलली जात नसल्याने येथील महिलांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी केली आहे.

नुकत्याच काही दिवसापूर्वी येथील महिलांनी पळत ठेऊन सदर महिलेला अन्य इसमाबरोबर पोलिसांना रंगेहाथ पकडून दिले होते. मात्र पोलिस जमादाराने सदर इसमास पळून जाण्याची मुभा देऊन केवळ त्यांची दुचाकी जप्त केली, परंतु कार्यवाही गुलदस्त्यात ठेवली असल्याचा आरोपही या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

वारंवार स्थानिक पोलिसांना सांगूनही कार्यवाही होत नसल्याने या नगरातील लहान बालकांवर याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता बळावली असून, सदर महिलेच्या असभ्य वर्तनाने परिसरातील वातावरण दुषित झाले आहे. अश्लील चाळे करणर्या त्या महिलेवर कार्यवाही करून दुषित वातावण शुद्ध करून सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळून द्यावा अशी केली आहे. सदर निवेदनावर १५ ते २० महिलांच्या स्वाक्षर्या आहेत.

२८ मे, २०१४

समस्या वाढल्या

हिमायतनगर(अनिल मादसवार)शहराचा कारभार पाहणाऱ्या प्रभारी ग्रामविकास अधिकार्याची बदली झाल्यामुळे १५ दिवसापासून ग्रामपंचायतीचा कारभार ढेपाळला आहे. परिणामी शहर वासियांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून, आता तर शेवटच्या महिन्यात पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. या प्रकाराकडे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी लक्ष देऊन तातडीने या ठिकाणी ग्राम विकास अधिकार्याची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.

मागील अनेक वर्षापासून हिमायतनगर शहरातील ग्रामविकास अधिकार्याचे पद रिक्त असून, समस्या मार्गी लागाव्यात म्हणून या ठिकाणचा कारभार पाच ते सहा महिन्यानंतर कोण्यातरी प्रभारीवर सोपविल्या जात आहे. अनेक वर्षापासून या ठिकाणी कायमस्वरूपी ग्राम विकास अधिकार्याची नियुक्ती करावी अशी मागणी होत असताना देखील वरिष्ठांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. परिणामी शहरातील नागरी समस्या, पावसाळ्यापूर्वी रस्ते - नाल्यांची सफाई, अर्धवट राहिलेल्या अंगणवाडी बांधकाम, विहीतिल गाळ कडून पाणी समस्येवर मात करणे, सार्वजनिक नाल्योजानेतून गावात पाणी - पुरवठा करणे, कर वसुली, मासिक बैठका यासह अन्य कामे ठप्प झाली आहेत. जिल्ह्यात सर्वात मोठी ग्राम पंचायत म्हणून समजली जाणार्या शहरातील ग्राम पंच्यातीत नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे असेल तर, ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचे हाल काय असतील याचा विचार न केलेलाच बरा. कारण तालुक्यात जवळपास पच ग्रामसेवकाच्या बदल्या झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्या बदल्यात तालुक्यात किती ग्रामसेवक हजार झाले हे अजूनही कोडेच आहे.

ग्रामसेवक नसल्याने निकुष्ठ कामाचा सपाटा

सध्या हिमायतनगर शहरातील अनेक वार्डात कोटयावधीच्या निधीतून सिमेंट रस्ते विकासाची कामे सुरु आहेत. सदरची कामे खुद्द काही ग्रामपंचायत सदस्य करीत असून, याकडे लक्ष देण्यासाठी ग्रामसेवक नसल्यामुळे संबंधितानी निकृष्ठ कामाचा सपाटा सुरु केला आहे. सदर कामात माती मिश्रीत रेती, विहीच दगड तसेच सिमेंटचे कमी प्रमाण वापरून लाखोचे काम हजारात उरकून मालामाल होऊ पाहत आहेत. एवढेच नव्हे तर सादर सत्याच्या कामावर कुरिंग केली जात नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.राजकीय नेते व अभियंत्याशी मिलीभगत करून कामे निकृष्ठ दर्जाची केली जात असल्याने पहिल्या पावसातच रस्त्याच्या कामाची पुरती वाट लागण्याची शक्यता बळावली आहे.

तर रस्ते कामासाठी नाल्या केल्या गायब

शहरतील दत्त नगर प्रभाग क्रमांक २ मध्ये ग्राम पंचायतीने सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे करून याकामासाठी सांडपाण्याच्या नाल्या अदाठला ठरत असल्याचे कारण समोर करून चक्क एक नालीच बुजउन गायब केली आहे. याबाबत संबंधित ग्राम पंचायतीच्या गुत्तेदारास विचारले असता पुन्हा करून देऊ असे सांगून वेळ मारून नेल्याने या परिसरातील घाण पाणी आता थेटरस्त्यावर साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मोबाईल टोळी सक्रियहिमायतनगर(वार्ताहर)शहरातील बुधवारच्या आठवडी बाजारात बाजारकरुंचे मोबाईल हैन्डसेट चोरणारी टोळी सक्रिय झाली असून, भर बाजारात १० ते १८ जणांच्या खिश्यातील मोबाईल काढून घेतल्या जात असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. या प्रकाराला स्थानिकाच्या पोलिसांचे होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्ष जबाबदार असल्याचा ओप केला जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मागील अनेक महिन्यापासून शहरातील बाजारातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी दोन पोलिसांची नियुक्ती कण्यात आली आहे. मात्र आठवडी बाजारात कर्तव्यावर हजर न राहता संबंधित पोलिस घराकडे व पोलिस स्थानकात गप्पा मारत बसण्यात धन्यता मानत आहेत. परिणामी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना पाकीटमार व मोबाईल चोरट्यांचा फटका सहन करावा लागत आहे. मागील महिन्याभरापासून आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांची टोळी दाखल होत आहे. सकाळी १०.३० च्या पैसेंजर रेल्वेने शहरात दाखल होऊन सायंकाळच्या ०५ वाजेच्या रेल्वेने या टोळीतील काही युवक महागड्या किमतीच्या १५ ते २० मोबाईल वर डल्ला मारून पसार होत आहेत. हा प्रकार अनेकांनी पोलिसांच्या कानावर टाकला, मात्र पोलिसांनी या चोई प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. याचा फटका शहरातील तीन प्रसिद्ध पत्रकारांना बसला असून, मागील आठवड्यात परमेश्वर गोपतवाड, ज्ञानेश्वर पंदलवाड व येथील व्यापारी धन्नू सेठ, प्राध्यापक लक्ष्मण डाके, दिगंबर वानखेडे, प्रवीण सातुलवाड, गजानन काटेवाले, दिगंबर वानखेडे, यांच्यासह २० ते २५ जणांना बसला होता. तर दि.२८ च्या बुधवारच्या बाजारात नांदेड न्युज लाइव्हचे संपादक तथा पत्रकार अनिल मादसवार, सरसम येथील शिक्षक दीपक कांबळे, यांच्यासह जवळगाव येथील एक नागरिक व अन्य १० ते १५ जणांचे महागडे मोबाईल हैन्डसेट भाजीपाला खरेदी करताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लांबविले आहेत. या बाबत चार जननी पोलिसात तक्रार दिली असून, पोलिसांनी तपासाचे आश्वासन दिले आहे.

याबाबत काहींनी भोकरचे उपविभागीय पोलिस अधिकारी कांबळे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली त्यांनी या प्रकारचा गंभीरतेने तपास लावण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे यांना दिल्याचे सांगितले. 

२७ मे, २०१४

यशस्वी कामगिरी

हिमायतनगर(वार्ताहर)नुकत्याच गोवा येथे संपन्न झालेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय वाडोकाई कराटे स्पधेसाठी हिमायतनगर येथील विद्यार्थ्यांनी सफल कामगिरी केली असून, त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

साऊथ इंडिया वाडोकाई कराटे असोसिएशन चे अध्यक्ष तथा सेन्साई सुशीलकुमार चव्हाण यांनी गोवा (पणजी) येथे आंतरराष्ट्रीय वाडोकाई करते कोचिंग कैम्पचे आयोजन केले होते. सदरचा कैम्प दि.२० ते २५ च्या दरम्यान यशस्वीरीत्या संपन्न झाला. या कैम्पामध्ये विशाखापटनम, नागपूर, उडीसा, हरियाना, छतीसागढ, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, हिंगोली, नांदेडजिल्ह्यातून जवळपास २०० ते ३०० विद्यार्थ्यांनी या कैम्प मध्ये सहभाग नोंदविला होता. हिमायतनगर येथील प्रशिक्षक खंडू एम.चव्हाण यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या राजू कदम, मारोती सुरोशे, शे.फिरदोस, शुभम संगणवार, राविसागर महाजन, रामा गाडेकर या सह विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. या ठिकाणच्या कैम्पाध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. या यशानंतर नुकतेच हि टीम शहरात परतली असून, त्यांच्या यशाबद्दल सर्व खेळप्रेमी व पालक वर्गांनी अभिनंदन केले आहे.

२६ मे, २०१४

हिमायतनगर शहरात जल्लोष

हिमायतनगर(वार्ताहर)देशच्या पंतप्रधानपदाची शपथ भाजपचे नरेंद्र मोदिनी घेतल्यानंतर हिमायतनगर शहरातील भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटक्याची आतिषबाजी व चहाचे वितरण करून जल्लोष साजरा केला आहे.

ठरल्याप्रमाणे भारताचे १५वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या राज्याभिषेक तथा शपथग्रहानाचा ऐतिहासिक सोहळा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंद्र राजपक्षे यांच्यासह सार्क राष्ट्रप्रमुख आणि अनेक विदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनावर सायंकाळी ६.१५ मिनिटांनी संपन्न झाला. या सोहळ्याचा जल्लोष हिमायतनगर येथील भाजपा शिवसेनेच्या वतीने फटक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून करण्यात आला. यावेळी येथील मोडी समर्थक युवक अकबर बेग या युवकाच्या वतीने ५०० हून अधिक नागरिकांना नमो चायचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते कंटा गुरु वाळके, हिमायतनगर भाजपचे तालुकाध्यक्ष गजानन तुप्तेवार, सरचिटणीस डॉ.प्रसाद डोंगरगावकर, संतोष गाजेवार, हनुसिंघ ठाकूर, रामदास रामदिनवार, राम नरवाडे, संजय मुधोळकर, अनिल भोरे, अनिल मादसवार, प्रकाश सेवनकर, विलास वानखेडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

२५ मे, २०१४

बाजारात पशूंची गर्दी

चारा  - पाण्याची चिंता व वाढत्या महागाईने बाजारात पशूंची गर्दी 


हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यात निर्माण झालेली चारा व पाणी टंचाई व वाढत्या महागाईमुळे शेतकर्यांनी आपले पशुधन बाजारात विक्रीसाठी आणून आगामी खरीप हंगाम भाड्यांच्या बैलांवर करण्याचा निश्चय केला आहे.

गात अनेक वर्षापासून तालुक्यात होत असलेली अतिवृष्टी व नापिकीमुळे शेतकी हैराण झाला आहे. एवढेचे नवे सततच्या पावसामुळे ज्वारीच्या पेऱ्यात झालेली कमतरता, आणि धुर्यावरील गवताची  उगवण क्षमता कमी झाल्याने पशूना आवश्यक त्या प्रमाणात चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. एवढेच नव्हे उन्हाळ्याच्या सरते शेवटी पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. एवढेच नव्हे चारा असलेल्या ठिकाणी अंध्रापादेशातील शेतकरी दाखल होऊन जादा दाम देत असल्यामुळे मराठवाड्यातील शेतकर्यांना कडबा १२ ते १५ रुपये व गवत ०९ ते १२ रुपये दराने खरेदी करणे अवघड बनले आहे. तसेच शासनाने नांदेड जिल्ह्यातील चारा तंचैच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पशूना चारा उपलब्ध करून पशुंचे पालन पोषण करणे गरीब शेतकर्यांना अवघड झाले आहे. परिणामी शेती करणे अवघड झाले असून, शेतीसाठी खर्च जास्त तर उत्पन्न कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकर्यांनी आपल्या पशूंची बाजारात विक्री करून मोकळे होण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. मागील दोन आठवड्यापासून शहरातील बुधवारच्या बाजारपेठेत बैल जोडी, गोरे, गाई, म्हशींची संख्या वाढली असून, आठवडी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या जनावरांच्या मालकांना मात्र या ठिकाणी सुद्धा चारा व पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. 

आठवडी बाजारातून ग्राम पंचायत टैक्सच्या स्वरुपात मोठी मिळकत होत असताना सुद्धा बाजारात येणाया पशूंच्या पंच्याची कसलीच सोय केली जात नसल्याची ओरड पशुपालकातून केली आहे.     

२३ मे, २०१४

उमरीत लाचखोर तहसिलदार

उमरीत लाचखोर तहसिलदारासह लिपीक व खाजगी सेवक जेरबंद

नांदेड(प्रतिनिधी)निवृत्तीच्या आठ महिने अगोदर लाच प्रकरणी आज एका तहसिलदारासह तीन लोकांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने उमरीत जेरबंद केले.

नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे आलेल्या एका तक्रारीनुसार एका शेतकऱ्याने आपली शेत जमीन विकली.खरेदी करणारा ती जमीन सातबारावर फेरफार करून घेण्यास इच्छूक होता.पण दरम्यान विक्रेत्याच्या पत्नी व मुलांनी तहसिलदार उमरी यांच्याकडे अर्ज दिला की आमच्या संमतीशिवाय ही जमीन विक्री झाली आहे.ती फेरफार करू नये.याप्रकरणाची सुनावणी आणि निकाल 27 मे 2014 रोजी होणार होता.बदललेल्या घडामोडीमध्ये जमीन विक्रेता त्याची पत्नी आणि मुले या सर्वांनी आपली विकलेली जमीन हा चुकीचा निर्णय आहे म्हणून न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी 27 मे 2014 रोजी उमरीचे तहसिलदार उदयकुमार पांडूरंग शहाणे यांनी तो निकाल देवू नये अशी विनंती करण्यात आली.सध्या दिवाणी न्यायालयाला सुट्टया असल्या कारणाने 15 जून नंतर तारीख मिळावी अशी जमीन विक्रेत्याची अपेक्षा होती.म्हणून तशी तोंडी विनंती तहसिलदाराना करण्यात आली.त्यावर तहसिलदारांनी फुकटात तारीख मिळते का?असा मुद्दा मांडला.तेव्हा गरज असणाऱ्या जमीन विक्रेत्याकडे सात हजार रूपयाची लाचेची मागणी करण्यात आली.जेणेकरून तहसिल कार्यालयातील या प्रकरणातील निकाल पुढे ढकलण्यात यावा.

7 हजाराच्या मागणीनंतर तडजोड करून 5 हजार रूपये तारीख वाढवून देण्याचे ठरले.पण तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिंबंध विभागाकडे तक्रार केली.त्यानुसार आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचला.उमरीचे तहसिलदार उदयकुमार पांडूरंग शहाणे वय 57 यांनी उमरी तहसिलऐवजी आपले कार्यालय घरातच थाटले होते.त्यानुसार घरा जवळ सापळा रचला गेला आणि तक्रारदाराने 5 हजार रूपये शहाणे यांना देवू केले तेव्हा शहाणेने ते पैसे लिपीक शंकर गणेश मुंडलीक वय 38 यांच्याकडे देण्यास सांगितले.शंकर मुंडलिकने ते पैसे तहसिलदाराचा खाजगी सेवक दिलीप किशन येरेवाड यांच्याकडे देण्यास सांगितले.तेवढ्यात लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा गुप्त इशारा झाला होता आणि पोलिसांनी तेथे धाड टाकली.तेव्हा ते पैसे दिलीप येरेवाडच्या खिशात मिळाले.

लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस उपअधीक्षक एम.जी.पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आता तहसिलदार शहाणे,लिपीक मुंडलिक व खाजगी सेवक येरेवाड या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरूध्द लाचलुचपत प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.हा सापळा पोलिस अधीक्षक व्ही.एन.देशमुख यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक एम.जी.पठाण,पोलिस निरीक्षक गणपत राहिरे,पोलिस कर्मचारी अशोक देशमुख,मोहम्मद उर्फ बाबू पठाण,व्यंकट शिंदे,विठ्ठल खोमणे,सतिश गुरूतवार,मारोती केसगीर,चंद्रकांत कदम यांनी यशस्वी केला.सन 2014 मध्ये आजपर्यंत लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांना पकडण्याचा हा 19 वा यशस्वी सापळा आहे.

बसस्थानक केंव्हा होणार...?

हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरासारख्या तालुक्याच्या ठिकाणी मागील ५५ वर्षापासून बसस्थानक नसून प्रवाशांना बसण्यासाठी प्रवाशी निवारा तर सोडा, साधे टीन शेडही नाही. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय तर सोडाच बसेस येण्या-जाण्याचे साधे वेळपत्रकही या ठिकाणी लावलेले नाही. मंदिराच्या मैदानात असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली व समाधीच्या ओट्यावर उन्हात व पावसात बसून प्रवाश्यांना बसची वाट बघावी लागत असल्याचे साध्यचे चित्र आहे. परिणामी श्रीक्षेत्र असेलल्या परमेश्वर नगरीत ये - जा करणार्यांना अनंत अडचनीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात सत्ताधारी पुढारी असताना सुद्धा हा प्रश्न अजूनही रेंगाळत असून, हि प्रलंबित मागणी कधी पूर्ण होईल..? असा सवाल जनता विचारावत आहे. 

तालुका तिथे आगार..या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी मागील सात वर्षाच्या काळात सर्वत्र झाली. त्यावेळी नांदेड जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात बसस्थानका बरोबर आगाराचाही प्रश्न निकाली काढल्या गेला होता. मात्र नव्याने तालुका होऊन १५ वर्ष लोटलेल्या हिमायतनगर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी आगार तर नाहीच...परंतु साधे बस स्थानक सुद्धा बांधण्यात आले नाही हि खेदाची बाब आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून हिमायतनगर शहरातील सी परमेश्वर मंदिराच्या मैदानात बसेस उभ्या केल्या जातात. या ठिकाणाहून विदर्भ - आंध्रप्रदेश - मराठवाडा आदी ठिकाणच्या गाड्यांची वर्दळ नेहमीच सुरु असते. तसेच रेल्वे रुंदीकरणानंतर एक्सप्रेस व पैसेंजर रेल्वगाड्या ह्या सकाळ, दुपार व सायंकाळी या ठराविक वेळेत येतात. जास्तीत जास्त प्रवाश्यांना बसचे वेळापत्रक नसल्यामुळे खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. तर जेष्ठ नागरिक मात्र बसने प्रवास करण्यासाठी तासनतास भर उन्हात व पावसात वात पाहत बसतात. प्रवाश्यांची हि समस्या लक्षात घेतापरमेश्वर मंदिर कमेटीने बस उभ्या करण्याची सोय केलेली आहे. मात्र येथे साधे प्रवाशी निवारे नसल्यामुळे ऊन, पावसाचा सामना करावा लागतो आहे. तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीच्या वाडी - तांड्यातील व बाहेरगावाहून ये - जा करणाऱ्या प्रवाश्यांना एस.टी.महामंडळाच्या या दुर्लक्षित कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मागील ५० वर्षापासून येथिउल काही राजकीय व्यक्तींच्या स्वार्थामुळे झालेल्या ओढाताणीचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. खरे पाहता बसस्थानक हे रेल्वे लाईन नजीक असायला हवे मात्र या राजकीय व्यक्तींच्या मतभेदामुळे बसस्थानकाचे भिजत घोंगडे अजूनही दिसत आहे. हिमायतनगर तालुका केवळ रस्ते, नाल्या, बांधकामाच्या विकासात आघाडीवर असून, महत्वाच्या बसस्थानकाच्या प्रश्नात अजूनही मागेच आहे. आता तरी जबादार लोकाप्रतीनिधिनी बस स्थानकासाठी जागा उपलब्ध करून शासनाच्या निर्णयानुसार तालुका तिथे आगार या योजनेतून हिमायतनगर येथील बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लावावा अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत आहे. याकडे लोकप्रतिनिधी लक्ष नाही दिल्यास आगामी काळात हिमायतनगर शहरात बसस्थानक होईल कि नाही.. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

२२ मे, २०१४

चौकशी गुलदस्त्यात

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील आदिवासी बहुल भागात येणाऱ्या गणेशवाडी ग्रामपंचायती अंतर्गत करण्यात येत असलेल्या ठक्करबाप्पा योजनेतील काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत असल्याची तक्रार माजी सरपंचाने करूनही सदर कामाची चौकशी न करताच चौकशीच्या नावाखाली कार्यवाही गुलदस्त्यात ठेऊन बदली करून जाणार्या ग्रामसेवकास अभय देण्याचा प्रकार चालविल्या जात आहे. याकडे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी लक्ष देऊन निकृष्ठ कामाची वाट लावणाऱ्या संबंधित अभियंता, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, जीरोणा ग्रामपंचायत अंतर्गत ठक्कर बाप्पा योजनेतून अंतर्गत सिमेंट रस्त्याचे अनेक प्रकारची कामे केली जात आहेत. परंतु ग्रामसेवक पुपलवार, उपसरपंच बळवंत जाधव, यांनी सरपांच महिलेला अंधारात ठेऊन सदर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक चालविली आहे. या कामात विहीच मुरमाड दगड, नाल्याची माती - मिश्रित रेतीचा वापर करून अंदाजपत्रकाला केराची टोपली दाखविली आहे. सदरचे काम करताना गावकर्यांनी विरोध करताच एक दिवस काम बंद करून राजकीय वरद हस्ताचा आव आणत पुन्हा मनमानी पद्धतीने निकृष्ठ कामाचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळालेल्या ५ लक्ष रुपयाच्या निधीचे काम लाखात करून अंदाजपत्रकाला खुंटीला टांगून अल्पावधीतच मालामाल होऊ पाहत आहेत. त्यामुळे सदरचे रस्ता पहिल्याचा पावसात पुरती वाट लागणार अशी अवस्था सुरु असलेल्या कामावरून दिसून येत आहे. यास सर्वस्वी विद्यमान ग्रामसेवक, उपसरपंच असून, वर कमाई करू पाहणाऱ्या या भ्रष्टाचार्यांवर कार्यवाही करावी अशीमागणी माजी सरपंच वामनराव जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. याबाबतचे वृत्त प्रकाशित होऊनही प्रशासकीय यंत्रणा दोषी ग्रामसेवक, उपसरपंच, गुत्तेदारावर कोणतीच कार्यवाही करीत नसल्याने दाल मे कुछ कला है.. या म्हणीचा प्रत्यय या निकृष्ठ कामाच्या बाबतीत दिसून येत आहे. पाणी कुठे मुरात आहे, याचा शोध घेणे अतिशय गरजेचे असून, जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष मुख्य कायाकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी याकडे जीकारीने लक्ष करून दोषीवर कार्यवाही करावी अशी मागणी विकास प्रेमी गावकऱ्यानी केली आहे. आता तरी या दोषीवर कार्यवाही होईल काय..? याकडे गणेशवाडी सह सर्व तालुका वाशियांचे लक्ष लागले आहे.

याबाबत शाखा अभियंता मुधोळकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले कि, तक्रारी झाल्या असतील, तक्रारी करणे हे तर लोकांचे कामाचा आहे. मग त्या नुसार चौकशी सुद्धा झालीच असले, माझी तब्बेत ठीक नाही, म्हणून मी बर्याच दिवसापासून हिमायतनगर तालुक्याकडे गेलेलो नाही, त्यामुळे मला काही माहित नाही, असे म्हणून संतापाच्या भरात भ्रमण ध्वनी बंद केला.

याबाबत गटविकास अधिकारी यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले कि, पेपरवर आलेल्या बातम्यांचे कात्रण व चौकशीच्या मागणीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठून परवानगीने कार्यवाही करण्यात येईल असे, यासठी तक्रार कर्त्यांनी आमच्याकडे सुद्धा तक्रार द्यावी असेही त्यांनी सांगितले.

या कामाचे वृत्त प्रकाशित होताच ग्रामसेवकाचे धाबे दणाणले असून, अभियंता, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व राजकीय व्यक्तींच्या आशीर्वादाने सदर प्रकरणावर पडदा टाकण्यास्ठी प्रयत्न सुरु केले असून, आमचे कोणच काहीच वाकडे करू शकत नाही या अविर्भावात निकुष्ठ पद्धतीचे काम सुरूच ठेवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

२१ मे, २०१४

जैविक विविधता दिन साजरा

गोदावरी नदी काठाच्या सफाईने जैविक विविधता दिन साजरा 

नांदेड(प्रतिनिधी)जागतिक जैविक विविधता दिनानिमित्त वनविभाग, नांदेड नैचुरल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. २२ रोजी सकाळी ६ ते ९ यावेळेत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी गुरुद्वारा जावालीन नदीकाठावर येउन गोदापात्रातील घन व निर्माल्या कचरा काढून सफाई करण्यात येउन जैव विविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यात आले. याप्रसंगी स्वतः जिल्हाधिकारी धीरजकुमार, वनविभागाचे सुजय डोडल , नांदेड वाघाळा मनपाचे अरुंधती पुरंदरे, नैचुरल क्लबचे मेंबर यांच्यासह शेकडो नागरिक या कामात सहभागी झाले होते.

संयुक्त राष्ट्रसंघाने दरवर्षी २२ मे हा आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी अधिसूचना जारी केलेलि आहे. त्यानुसार जैविक विविधता व पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन जागतिक जैविक विविधता दिनी संगोपन व संवर्धन व्हावे यासाठी हि संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यातून समाजात एक व्यापक जनजागृती निर्माण व्हावी म्हणून म्हणून नांदेड शहरातून वाहणारी गोदावरी नदीच्या बेटावर जमलेली जैविक घाण साफ करून हि चळवळ गतिमान करण्यासाठी प्रयत्न केल्या गेले. गुरुवार दि.२२ सकाळी ६ वाजल्यापासून नदीच्या काठावर जिल्हाधिकारी धीरजकुमार, वनविभागाचे सुजय डोडल, नांदेड वाघाळा मनपाचे अरुंधती पुरंदरे, नैचुरल क्लबचे मेंबर, गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य, नागरिक, पोलिस कर्मचार्यांनी उपस्थिती दर्शून या सफाई मोहिमेत सहभाग घेतला होता. 

भारतीय राज्यघटनेनुसार वने, तलाव, नद्या आणि वन्यजीव यासह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि सर्व सजीवाविषयी अनुकंपा बाळगणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे, यासाठी  सर्वांनी आपापल्या परिसरातील बेटावर जाऊन हा दिन साजरा करून आपले कर्तव्य पार पडावे असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले. दरम्यान नदीच्या काठावर जमलेली सर्व घाण व निमाल्या सफाई करून पर्यावरणाचे संरक्षणाची जबाबदारी पार पाडण्यात आली आहे. हि मोहीम दर महिन्याला राबवावी तसेच नदी पत्रात मिसळणाऱ्या घाण पाण्याची दिशा बदलून वाहणाऱ्या पाण्याचे पावित्र राखण्याकडे नगर पालिकेने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत अनेकानी व्यक्त केले.   

भूमिपूजन

हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील नेहरू नगर परिसरातील हनुमान मंदिर सभागृह बांधकामासाठी खा.सुभाष वानखेडे यांनी दिलेल्या निधीतून नुकतीच सुरुवात झाली असून, या सभागृहाचे भूमिपूजन बुधवारी शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

हिमायतनगर शहरातील नेहरूनगर परिसरातील नूतन वस्तीत येथील नागरीकांच्या प्रयत्नाने हनुमानाचे मंदिर उभारल्या गेले असून, मंदिराच्या वतीने संपन्न होणार्या धार्मिक कार्यक्रमासाठी सभाग्रह व्हावे असा आग्रह येथील ग्रामपंचायत सदस्य राजू आलेवाड व नेहरू नगर वासियांनी खा. सुभाष वानखेडे यांच्याकडे केली होती. तात्काळ सदर मंदिराच्या सभागृहासाठी निधी देऊ केला, यास कार्यकारी अभियंता (बांधकाम) उत्तर विभाग जिल्हा परिषद नांदेड यांनी ०३ लाखाच्या निधीतून मंजुरी देऊन काम सुरु करण्याचे पत्र दि .०४ मार्च २०१४ ला दिले होते. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे सदरचे काम रेंगाळले होते. नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणूक निकालानंतर बुधवार दि.२१ रोजी हिमायतनगर शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करून नारळ फोडण्यात आले. तसेच तिकास मारून सभागृहाच्या बांधकामास सुरुवात एकण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उदय देशपांडे, हनुसिंघ ठाकूर, बाबुराव शिंदे, लक्ष्मण ढोणे, बालाजी मिस्त्री, बाबुषा चव्हाण, शंकर गुंडेवार, रमेश गुड्डेटवार, शंकर पाटील, राम नरवाडे, विलास वानखेडे, अनिल भोरे, पंडित ढोणे, संजय रामदिनवार, रामू ढोणे, नरसिंगा गड्डमवार, पांडू जाधव, लक्ष्मण संभाजी, कोंडाबा जाधव, दीपक हनवते, शंकर चव्हाण, संभाजी वानखेडे, बाळू भंडारे, शंकर गोडबर्लेवाड, राजू नरवाडे, उत्तम सुलभेवार, योगेश चीलकावार, पत्रकार अनिल मादसवार, छायाचित्रकार धम्मपाल मुनेश्वर आदींसह गणेशवाडी परीसारतील युवक, नागरिक, हनुमान भक्त मोठ्या संखेने उपस्थित होते. 

१९ मे, २०१४

भीषण अपघात..तीन ठार

भोकर फाट्यावर जीप व ट्रकचा भीषण अपघात..तीन ठार 


हिमायतनगर(वार्ताहर)हिमायतनगरहून लग्न सोहळ्यासाठी नांदेडकडे जाणार्या एका बोलेरो जीपला भरधाव वेगातील ट्रकने जबर धडक दिल्याने तीन जन जागीच ठार तर आठ जन जखमी झाल्याची घटना भोकर फाट्याजवळील कलदगाव पाटीजवळ(ता.अर्धापूर) सायंकाळी ०६ वाजेच्या सुमारास घडली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर येथील काही युवक लग्नासाठी नांदेडकडे बोलेरो जीप क्रमांक एम.एच.२६ - ३६८२ मधून जात होते. सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान भोकर फाट्याच्या अलीकडील कलदगाव फाट्याजवळ येताच समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील ट्रक क्रमांक आर.जे.२७- जी. बी. ६०६९ ने जबर धडक दिली. या घटनेत बोलेर जीपचा चकनाचूर झाला असून, जीपमध्ये चालकाच्या पाठीमागे बसलेल्या अब्दुल लतीफ शे.आलम वय २४ वर्ष, मो.इम्रान मो.राहिमोद्दिन वय २० वर्ष, सय्यद आसिफ स.इसुफ वय २५ वर्ष सर्व रा. जनता कॉलनी, हिमायतनगर तिघे जन जागीच ठार झाले तर, मोहम्मद उमर मो.खुदुस वय २२ वर्ष, आसिफ खान दौलत खान वय २२ वर्ष, शेख हनीफ अ.खदिर वय २२ वर्ष, जाकीर खान जफर खान वय २० वर्ष, शेख युनुस शे.महेमूद वय २० वर्ष, शेख महेबूब शे.खदिर वय २४ वर्ष (नवरदेव), यांच्यासह अन्य दोन जन जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच बारड महामार्ग स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक रहेमान शेख, पोलिस कोंस्तेबल दीपक ओडणे, श्रीनिवास रेड्डी, चालक सुभाष बसवंते यांनी तातडीने जखमींना नांदेडच्या गुरुगोविंद मेमोरियल रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, चालक मात्र फरार झाला आहे. 

१८ मे, २०१४

ठक्करबाप्पा योजनेच्या मात निकृष्ठ्पणा

अभियंत्याच्या आशीर्वादाने ठक्करबाप्पा योजनेच्या मात निकृष्ठ्पणा 

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील मौजे गणेशवाडी येथील ग्रामपंचायती अंतर्गत करण्यात येत असलेल्या ०७ लक्ष रुपयाच्या सिमेंट रस्त्याच्या कामात अतिशय निकुष्टपणा आणला जात असून, याकामाकडे लक्ष देणाऱ्या अभियंत्यांनी गुत्तेदार व ग्रामसेवकास अभय दिले आहे. परिणामी सदरची कामे अल्पावधीतच धुळीत मिळण्याची शक्यता आहे. सदर कामाची गुननियन्त्रक मापक मशीनद्वारे चौकशी करून लालची ग्रामसेवक व गुत्तेदार व पुढार्यावर कायावाही करावी अशी मागणी येथील माजी सरपंच वामनराव जाधव व ग्रामस्थांनी केली आहे.

तालुक्यातील बहुतांश ग्राम पंचायतीत ठक्करबाप्पा योजनेतील कामांची पुरती वाट लावण्याऱ्या  अधिकारी पदाधिकार्यांना येथील पंचायत समितीचे विद्यमान गटविकास अधिकारी व अभियंत्याचे  अभय मिळत आहे. परिणामी शासनाकडून प्राप्त झालेल्या योजनाची कामे निकृष्ठ दर्जाचे करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. असे प्रकार करणाऱ्या एकंबा, कारला - पिच्चोंडी येथील ग्रामसेवकावर अपहार प्रकरणी वर्षभरापूर्वी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे होत असले तरी तालुक्यातील जीरोना - गणेशवाडी - गणेशवाडीतांडा या गट ग्रामपंचायतीत कार्यरत ग्रामसेवक पुपलवार यांनी विद्यमान उपसरपंच बळवंत राठोड, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, अभियंता यांना हाताशी धरून निकुष्ठ कामाचा सपाटा लावला आहे. आदिवासी भागात येत असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे गणेशवाडी येथे ठक्कर बाप्पा योजनेतील ५ लक्ष रुपयाच्या निधीतून सिमेंट रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. या कामात ग्रामसेवक महाशय यांनी सोलिंगमध्ये विहिरीचा ठिसूळ दगड, नाल्याची काळी माती मिश्रित रेतीचा वापर सुरु केला आहे. एवढेच नव्हे तर १३ ब्रास काम करण्याचे असताना गुत्तेदारास हाताशी धरून दोन ते तीन ब्रास काम कमी करण्याचे सांगितले होते. हि बाब समोर आल्याने व रस्त्याच्या कामात वापरण्यात येत असलेल्या दगड - रेतीची पाहणी करून ग्रामस्थांनी वीरोध करून सदर रस्त्याची माती अल्पावधीतच होईल अश्या प्रतिकिया दिल्या आहेत. 

निकुष्ठ प्रकारचे माटेरीयल टाकताच ग्रामस्थांनी विरोध करून गुत्तेदारास काम करण्यास मज्जाव केला आहे. तरीदेखील राजकीय वरदहस्त प्राप्त येथील उपसरपंचाच्या जोरावर अडाणी सरपंचास अंधारात ठेऊन ५ लाखाच्या निधीचे काम ग्रामसेवकाने हिमायतनगर शहराच्या ठिकाणी राहून अत्यंत निकृष्ठ पद्धतीने करून शासनाचा निधी गिळंकृत करण्याचा प्रयत्न चालविला आहे.   

या निकृष्ठ रस्ता कामाच्या प्रकाराकडे औरंगाबाद आयुक्त, जिल्हाधिकारी व कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी लक्ष देऊन कामात वापलेल्या व वापरण्यात येत असलेल्या निकृष्ठ साहित्याची गुणनियंत्रक मापक मशीनद्वारे चौकशी करून आदिवासी वस्तीतील कामाचा दर्जा सुधारावा तसेच मागील १० ते १५ वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून निकृष्ठ व अर्धवट कामे करणाऱ्या ग्रामसेवकास निलंबित करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. कामाची चौकशी न झाल्यास वेळ प्रसंगी उपोषणाचा मार्ग अवलंबिणार असल्याचे सांगितले आहे. 

मागील सात - आठ महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासन योजनेच्या ठक्कर बाप्पा योजनेतून गणेशवाडी ग्रामपंचायत जीरोणा अंतर्गत येथे ५ लक्ष रुपयाच्या निधीतून सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले.  मात्र अल्पावधीतच हा रस्ता फुटून धुळीस मिळाल्याचे दिसून येत आहे.   

१७ मे, २०१४

सोळावं ठरलं वानखेडेना धोक्याच

हिमायतनगर(वार्ताहर)काल घोषित झालेल्या लोकसभेच्या निकालाने नांदेड हिंगोली लोकसभा मतदार संघात काँग्रेसने जल्लोष साजरा केला तर संसदेच सोळावं वर्ष खा. सुभाष वानखेडे यांना धोक्याच्या ठरला असून, त्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात विजयाची हैट्रीक मारणारे सुभाष वानखेडे हे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत संसदेत निवडणून गेले. लोकसभेतील विजयानंतर अनेक निष्ठावंत शिवसैनिकांशी त्यांचा समन्वय राहिला नव्हता. वानखेडे च्या या वागण्याने अनेक निष्ठावंत सैनिकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत दुसर्या पक्षांशी घरोबा केला. नाराज कार्यकर्त्यांशी जमून घेण्यात वानखेडेनि स्वारस्य दाखविले नसल्यानेच मोदी लाटेने सुद्धा त्यांना तरले नसून अखेर त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

सोळावी लोकसभा, मे महीण्याची सोळा तारीख, आणि राजीव सातव यांना मिळालेली सोळाशे मतांची आघाडी पाहता सोळाचा आकडा खा. सुभाष वानखेडे यांच्यासाठी ठरले धोक्याचे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. सूर्यकांता पाटलांचा रुसवा, शिवाजी मानेंचा फुगवा आणि मराठ्यांनी चालविलेले जातीचे कार्ड राजीव सातव यांचा विजय रोखू शकले नाही. किनवट - माहूर विधानसभा मतदार संघातील खा. सुभाष वानखेडे यांचे कार्यकर्त्यांशी असलेले सख्यचं त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याने या मतदार संघातील मतदानाची वाढती टक्केवारीच वानखेडे यांच्या पराभवाचे ठोस कारण बनले आहे.

मोदी लाटेत न तरलेल्या सुभाष वानखेडेच्या पराभवाने अवघ्या सहा महिन्यावर येउन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी गुढग्याला बाशिंग बांधलेल्या नागेश पाटलांच्या राजकीय भवितव्यावर कुऱ्हाड कोसळली असून, आता विधानसभेलाही सुभाष वानखेडे यांनी आपले नशीब आजमावले तर नागेश पाटलांना खो बसण्याची दाट शक्यता आहे. येणारी राजकीय गणिते काहीही असली तरी काँग्रेस चे दोन खासदार निवडून आल्याने हदगाव - हिमायतनगरच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

आज फरार आरोपीस अटक

चकमा देऊन आरोपी पळाला चार पोलीस कर्मचारी निलंबित, आज आरोपीस अटक


नांदेड(प्रतिनिधी)पोटात दुखत असल्याचा बहाणा करून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार  झालेल्या आरोपीस आज पोलिसांनी मोठ्या शिताफीने अदिलाबाद जवळ खजरला येथे अटक केली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कलम 376 भादंविसह 3 (1) (12) अनुसचित जाती /जमाती प्रतिबंधके कायदा या गुन्ह्यातील अटक झालेला आरोपी निलेश विजय राठोड यास मांडवी पोलिस स्थानकाचे (1) पोहेकॉ. आनंद नरवाडे (2) पोकॉ.संजय रांजणे (3) पोकॉ. रामराव ढोले (4) पोकॉ.गजानन धुर्वे हे गुन्हयातील आरोपीला उप जिल्हा रुग्णालय किनवट येथुन मेडीकल करुन मांडवीला परत घेवुन जात होते. याच वेळी आरोपी निलेश राठोडने पोटात दुखत असल्याचे सांगताच पोलीस जीप थांबविली. जीप पिंपळगांव फाटा येथील धाब्याजवळ रात्री ८.४५ च्या सुमारास थांबल्यानंतर हा आरोपी पोलीस कर्मचा-यास चकमा देवुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेल्या या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. या कर्मचा-यांनी गंभीर गुन्हयातील आरोपी बाबत अत्यंत निष्काळाजीपणाचे व बेजबाबदार पणाचे वर्तन केले म्हणुन पोलीस अधिक्षक श्री. परमजित सिंह दहिया यांनी निलंबित केले आहे.

त्यानंतर  अधीक्षक परमजित सिंह दहिया यांनी आरोपी पकडण्या बाबत उप. वि. पो. अ. माहुर/किनवट यांना आदेश दिले होते उप. वि. पो. अ. श्री. कांबळे यांनी लगेचच  वेगवेगळी शोध पथके आरोपीच्या शोधात पाठविले होती अखेर या आरोपीला आज दि.१७ शनिवारी अदिलाबाद (आंध्रप्रदेश) येथे जाऊन अटक करण्यात आली आहे.

१६ मे, २०१४

हिंगोलीचा सिंह गेला...

दिल्लीचा गढ आला पण..हिंगोलीचा सिंह गेला...हिमायतनगर(वार्ताहर)दिल्लीच्या तख्तावर आगमी २१ तारखेला नरेंद्र मोदी राजसिंहासनावर विराजमान होणार आहेत. त्यांचे कुशल नेतृत्व आणि भ्रष्टाचार-महागाई या मजबूत मुद्दे व मोडी लाटेवर  स्वार होऊन भाजपने पाच राज्यांमधून काँग्रेसला हद्दपार करून स्पष्ट बहुमत सिद्ध केले आहे. हि बाब भाजप सेनेसाठी आनंदाची आहे, परंतु हिंगोली लोकसभा निवडणुकीत सुरुवातीपासून आघाडीवर असलेले लोकसभेचे विद्यमान खा.सुभाष वानखेडे यांच्या अल्पश्या मताने पराभव पत्करावा लागल्याने गड आला पण... सिंह गेला असे म्हणण्याची वेळ आली आहे.  

सकाळी ७ वाजता मतमोजणीला सुरुवात होताच निवडणुकीच्या विजयाची महिन्याभरापासून वाट पाहणार्यांमध्ये एकच उत्सुकता होती. मतदानाच्या काळात जनसंपर्क व प्रचारात आघाडी घेतलेल्या सुभाष वानखेडे यांची मतमोजनीतही आघाडी होती, त्यानंतर वानखेडेच्या विजयाची घोषणाही झाली. त्यावरून सर्वत्र शिवसेना - भाजपच्या कार्यकर्त्यांनी फाताक्यची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला. परंतु काही वेळानंतर शेवटच्या टप्प्यात काँग्रेसचे उमेदवार राजीव सातव यांच्या विजयाच्या बातमी सर्वाना धक्का देणारी ठरली. शेवटच्या दोन राउंडमध्ये राजीव सातव यांना दीड हजाराची आघाडी मिळून शिवसेनेच्या उमेदवाराचे मताधिक्य अचानक कमी झाले आणि अवघ्या १६०० मतांनी म्हणजेच अल्पश्या मतांनी खा.सुभाष वानखेडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. 

शिवसैनिकांचा विजयाच्या जल्लोषाने आनंदोत्सव ओसंडून वाहत असताना हि बातमी सर्वांनाच थक्क करून सोडणारी ठरली आहे. काही क्षणातच शिवसैनिकांचे चेहरे हिरमुसले मात्र राज्यभरात भाजपने मारलेली ऐतिहासिक निकालाची मुसंडी मोदी लाटेचा करिष्मा जाणवत होती. दिल्लीच्या गडावर भगवा फडकला याचा आनंद द्विगुणीत करून दिल्लीचा गड आला ... परंतु हिंगोलीचा वानखेडेच्या रूपातील सिंह गेला अशी भावनिक प्रतिकिया व्यक्त होताना दिसून आली आहे. 

महाराष्ट्रात कॉंग्रेसला दोन जागा

हिंगोली/नांदेड(प्रतिनिधी)नुकत्याच संपन्न झालेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड - हिंगोलीतून कॉंग्रेसचे उमेदवार तर लातूर मधून भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. यांच्या विजयाचा जल्लोष फटके फोडून केला जात आहे.

हिंगोली लोकसभा निवडणुकीत नुकत्याच संपन्न झालेल्या २४ फेर्यांच्या मतमोजनीतील शिवसेना - कॉंग्रेस या दोन प्रमुख पक्षामध्ये झालेल्या शेवटच्या टप्प्यातील मतमोजणीत सुभाष वानखेडे समोर असताना अचानक कलाटणी मिळाल्याने राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राजीव सातव यांचा १ हजार ६०० मतांनी निसटता विजय झाल्याचे सांगण्यात आले आहे.

नांदेड लोकसभा मतदार संघात झालेल्या 22 फेर्यांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार डी.बी.पाटील यांना पाठीमागे टाकले होते. शेवटी अशोक चव्हाण हे ८७ हजार मतांनी विजयी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळ्यामुळे मुख्यमंत्रीपद गमवावे लागले होते. त्यानंतर त्यांच्यासाठी राजकारणातील परतीचे दार कायमचे बंद झाल्याचे बोलले जात होते. मात्र अनेक चढ-उतारानंतर अशोक चव्हाण यांच्या पदरी याप्रकरणात राज्य सरकारची क्लीन चिट पडली. त्यानंतरही काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या संतापामुळे अशोक चव्हाण यांची कोंडी कायम राहिल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र एकेक करत चव्हाण यांच्यापुढील विघ्नं दूर होत गेली. तर लातूर लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार सुनील गायकवाड यांचा २.५ लाख मतांनी विजय झाला आहे.

नांदेडमधील उमेदवारीने चव्हाण यांचा काँग्रेसमधील वनवास खऱ्या अर्थाने संपला. ही उमेदवारीही त्यांना नाट्यमयरीत्या मिळाली. आधी चव्हाण यांच्या पत्नीने या मतदारसंघातून अर्ज भरला होता. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस उरला असतानाच अचानकपणे दिल्लीतून नांदेडसाठी चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर घोटाळ्याचा डाग लागलेले चव्हाण जिंकतील का? हा मोठा प्रश्न होता. मात्र देशात आणि राज्यात मोदीलाट असताना, माजी मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह राज्यात काँग्रेसचे बहुतेक सर्वच उमेदवार पराभवाच्या छायेत असताना चव्हाण आणि सरतेशेवटी राजीव सातव हे या लाटेतून तरल्याचे दिसत आहे.

१५ मे, २०१४

चौकशी गुलदस्त्यात

पवना तांडा येथील सोन्याची चौकशी गुलदस्त्यात हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील मौजे पवना तांडा येथील बहुचर्चित गुप्तधनाची चौकशी अद्यापही गुलदस्त्यातच असून, पोलिस मात्र या ठिकाणी काहीच नसल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मराठवाडा - अंध्रप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या तालुक्यातील मौजे पवनातांडा येथील एका शेतकर्यास बार्शीच्या दिवशी शेतात काम करताना चार सोन्याच्या विटा सापडल्याची चर्चा सबंध तालुकाभर पसरली होती. हि बाब पोलिसांपर्यंत जाऊ नये म्हणून राजू शंकर पवार या युवकाने सुरक्षेच्या दृष्टीने विटा त्याच्या भावाजीकडे ठेवल्याचे सांगण्यात आले. काही दिवसाने राजूने सोन्याच्या विटाची मागणी भावजीकडे केली असता, देण्यास टाळाटाळ केली. त्यावरून दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे राजूने गुप्तधनाची तक्रार हिमायतनगर पोलिसांना दिली. प्रथम अधिकार्याने चौकशीच्या नावखाली गावात भेट देऊन किरकोळ मारहाणीचा गुन्हा नोंदविला. त्यानंतर राजू शंकर पवार याने सोने सापडल्याची फिर्याद दि.०५ मे  २०१४ रोजी दिली.  तेंव्हापासून सदर प्रकरणी चौकशी चालू असल्याच्या बतावण्या पोलिसांकडून केल्या जात आहेत. आता तर चक्क पोलिस या घटनेत काहीच तथ्य नसल्याचे सांगून सदर प्रकरण दडपण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा तालुकाभर सुरु आहे. असे असले तरी यातील एक सोन्याची वीट पोलिसांनी हस्तगत केली असून, उर्वरित सोन्याच्या विटा एका राजकीय व्यक्तीकडे ठेवण्यात आल्याच्या चर्चेला उधान आले आहे. त्यामुळे पोलिसांची चौकशी मंदावली असून, या प्रकरणाची चौकशी गुलदस्त्यात ठेऊन शासकीय मालमत्ता असलेले सोने गिळंकृत करण्याचे षड्यंत्र सुरु असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. 

या ठिकाणी सापडलेल्या सोन्याचे मुल्य कोट्यावधीपेक्षा जास्त मूल्याचे असल्याने हे प्रकरण निवडणुकीच्या धामधुमीचा फायदा घेत पोलिसांनी एका राजकीय व्यक्तीला हाताशी धरून आपले उखळ पांढरे करीत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु केल्याची जोरदार चर्चा ग्रामस्थांमधून होताना दिसून येत आहे. 

१४ मे, २०१४

नांदेड मध्ये अलर्ट

हैद्राबादमधील घटने नंतर नांदेड मध्ये अलर्ट 

नांदेड,(प्रतिनिधी)-हैद्राबादमधील छावणी भागात असलेल्या किशन बाग गुरुव्दारातील निशाण साहिब अज्ञात समाजकंटकांनी जाळून शिख धर्मियांच्या भावनेला ठेच पोहंचविली. या घटनेच्या निषेधार्थ व समाजकंटकांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीचे निवेदन येथील सचखंड गुरुव्दाराच्या प्रशासकीय समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.नांदेड मेषे अलर्ट जरी झाला आहे. 

हैद्राबाद येथील छावणी भागात असलेला किशन बाग गुरुव्दारा शिख बांधवांसाठी एक पवित्र स्थान म्हणून ओळखल्या जाते. दि.13 मे च्या मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी या गुरुव्दारात जावून निशाण साहिब याला आग लावली व जाळून त्याची राख केली. ही बाब हैद्राबाद परिसरातील व हैद्राबादमधील शिख बांधवांना समजताच छावणी हैद्राबाद परिसरात तणावाचे वातावरण बनले. यापूर्वीही याच गुरुव्दारामध्ये अशा काही समाजकंटकांकडून शिखधर्मियांच्या भावना दुखावण्यात आल्या होत्या. उलट स्थानिक प्रशासनाकडून शिख युवकावरच पोलिसांकडून अन्याय होत गेला. काल रात्री झालेल्या घटनेमुळे तमाम शिख समाज संतप्त झाला असून, या घटनेच्या निषेधार्थ आज नांदेड येथील सचखंड गुरुव्दारा बोर्डाच्या प्रशासकीय समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात निशाण साहिब जाळणाऱ्या अज्ञात समाजकंटकांना ताबडतोब अटक करा व त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने केली आहे. या निवेदनावर सचखंड गुरुव्दारा प्रशासकीय समितीचे सदस्य सरदार बलवंतसिंघ गाडीवाले, सरदार रविंद्रसिंघ बुंगई, सरदार सुखदेवसिंघ हुंदल, सरदार जर्नेलसिंघ गाडीवाले, सरदार नवनिहालसिंघ जहागीरदार, सरदार गुरुचरणसिंघ घडीसाज, सरदार सुरींदरसिंघ आणि सरदार गुलाबसिंघ कंधारवाले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या पार्श्वभूमीवर नांदेड मध्ये अलर्ट जरी करण्यात आला असून पोलिसांनी अनेक ठिकाणी फिक्स पोईंट लावले आहेत आणि गस्त वाढवली आहे. 

लघुशंकेचे पाट

हिमायतनगरच्या ग्राम पंचायतीत शौचालयाचा अभाव.. भिंती वाहतात लघुशंकेचे पाट


हिमायतनगर(प्रतिनिधी)संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत गावागावात ग्रामस्वच्छता अभियान राबवले जात असताना हिमायतनगर शहराची स्वच्छता तर सोडा चक्क येथील ग्रामपंचायत कार्यालयात साधे शौचालय व लघु शंकेसाठी मुतारी नसल्याची बाब उघड झाली आहे. परिणामी ग्राम पंचायत कार्यालयात येणारे अधिकारी - पदाधिकारी यांना कार्यालयाच्या भिंती आड लघुशंका करावी लागत असल्याने, भिंतीच्या माठीमागे लघवीचे पाट वाहत असल्यचे चित्र दिसत आहे. यामुळे बस स्थानक व ग्रामपंचायत पिसरत दुर्गंधी पसरल्याने कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. 

जिल्हाभरात मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या नेतृत्वाखाली संतगाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान चालविले जात आहे. याची चळवळ हिमायतनगर तालुक्यात मागील चार वर्षापासून सुरु झाली असून, ५० टक्के गावे हागणदारी मुक्त झाली आहेत. तालुक्यातील काही गावे सध्या या चळवळीत सामील झाले असून, त्या ठिकाणी सुद्धा सदरचे अभियान राबविले जात आहे. गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येक घरा-घरात शौचालय झालेच पाहिजे असा शासनाचा दबाव आहे. इतर जिल्ह्यातील पथकाकडून पाहणी करून सर्वेक्षणाअंती शासकीय, निमशासकीय कर्मचा-यांच्या घरी शौचालय बांधकाम झाले. त्याचे प्रमाणपत्र ग्रा.पं. कार्यालयाकडून दिले जाते. ज्या घरी शौचालय नाही त्यांना शासनाच्या विविध सोयी-सूविधांचा लाभ मिळणार नसल्याचेही शासन सांगते. परंतु आजवर कोट्यावधीची बक्षिसे मिळविलेल्या हिमायतनगर तालुक्यातील गावागावात हग्न्दाई मुक्त योजना पारदर्शीप्रमाणे राबविली जात असून, मात्र हिमायतनगर शहर स्वच्छता अभियानापासून कोसो दूर आहे. 

एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत संबोधल्या जाणार्या हिमायतनगरच्या ग्रामपंचायीमध्ये शौचालयाचा अभाव दिसून येत आहे. ग्राम पंचायतीची इमारतही खिळखिळी झाली असून, याच इमारतीच्या भिंती आड लघुशंका केली जात असल्याने कार्यालयात दुर्गंधी सुटली आहे. तर इमातीच्या भिंती आड लघु शंका केली जात असल्याने अक्षरश्या लघवीचे पाट वाहत असल्याचे दिसून येते आहे. परिणामी या दुर्गंधीमुळे कार्यालयात सरपंच - उपसरपंच यासह ग्रामपंचायत सदस्य जास्त काळ टिकून बसत नसल्याने सामन्यांचे कामे मात्र खोळबंत आहेत. शहराच्या विकास करण्यासठी लाखो तुप्याच्या निधीतून सिमेंट रस्ते बांधले जात आहेत. मात्र ग्रामपंचायतीत साधे शौचालय बांधण्याचा मुहूर्त मिळत नसल्याचे संबंधितांच्या हलगर्जीपणाच्या कारभारावरून दिसत आहे.  या प्रकाराकडे संबंधितानी लक्ष देऊन हिमायतनगर शहरात स्वच्छता अद्भियान राबविण्याबरोबर प्रथम ग्राम पंचायतीत शौचालय बांधून होत असलेली कुचंबना थांबवावी अशी रास्त अपेक्षा कामानिमित्त कार्यालयात येणाया जनतेतून केली जात आहे. 


याबाबत ग्राम विकास अधिकारी श्री आडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सार्वजनिक शौचालय व मुतारी बांधल्या जाऊ शकते. परंतु यासाठी मासिक बैठकीत ग्राम पंचायत सदस्यांनी ठराव घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगून, दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला.  

याबाबत सरपंच गंगावाई शिंदे यांच्याशी संपर्क  केला असता त्या म्हणाल्या कि, याच बाजूला देशीचे दुकान आहे, त्यामुळे दारुडे दारू ढोसून याच ठिकाणी लघुशंका करतात. आगामी महिन्याच्या बैठकीत शौचालय बांधकामाचा प्रस्ताव मांडून बांधकाम करण्यासाठी प्रयत्न करू. तसेच इमारतीच्या भिंतीवर लघुशंका करणार्यांना दंडाची तरतूद करण्यात येईल. यासाठी सर्व सदस्यांचे सहकार्य लाभणे गरजेचे आहे.

१३ मे, २०१४

पळसपूरच्या पेंडावरून रेती तस्करी जोरात


महसूलच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे पैनगंगा काठावरील पळसपूरच्या पेंडावरून रेती तस्करी जोरात हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील पैनगंगा तीरावर असलेल्या पळसपूर घाटावरून वाळू माफियांकडून अवैद्य रित्या रेतीचे उत्खनन केले जात असून, तहसील प्रशासन मात्र याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करून शासनाचा लाखोचा महसुलावर पाणी फिरवत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. यामुळे पर्यावरण धोक्यात आले असून, परिणामी त्यांना विरोध करताना नदीकाठावरील नागरिकांना माफियांच्या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे. 

विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठावर कामारी, दिघी, घारापुर, रेणापूर, पळसपूर, धानोरा, वारंग टाकळी, सरसम मासोबा नाला, यासह अन्य रेती घाट आहेत. मागील वर्षात यातील केवळ घारापुर, येथील रेती पेंडचा लिलाव प्रशासनाने केला असून, अन्य ठिकाणचे लिलाव अजूनही होणे बाकी आहे. परंतु प्रशासनाचे नियम डावलून लिलाव न झालेल्या रेती घाटावरून रेती तस्करांनी वाळू चोरीला सुरुवात केली असून, मुख्यत्वे पळसपूर पेंडावरून तस्करांकडून चार ते पाच ट्रेक्टर द्वारे मोठ्या प्रमाणात अवैद्य रित्या दिवस रात्र रेतीच्या उपसा केला जात आहे. परिणामी पर्यावरण धोक्यात आले असून, यामुळे महसुल प्रशासनाचा लाखो रुपयाचा  महसूल बुडविल्या जात आहे. हि बाब माहित असताना येथे कार्यरत तलाठी सुगावे, मंडळ अधिकारी सय्यद हे मात्र मुख्यालई न राहता नांदेडला राहून रेल्वे वेळापत्रकानुसार ये -जा करून, रेती तस्करांना  अभय देत आहेत. नागरिकांच्या तक्रारी होताच कधीतरी मंडळ अधिकारी, तलाठी परिसरात फेफटका मारून रेती तस्करावर लहानशी कार्यवाही केल्याचे दाखून अर्थपूर्ण मैत्री करीत असल्याचा आरोप पळसपूर येथील जागरूक ग्रामस्थांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना केला आहे. त्यामुळेच येथे कार्यरत महसूल अधिकारी कर्मचारी मात्र महिन्याकाठी लाखोची माया जमवीत असल्याचे ग्रामस्थामधून बोलले जात आहे. 

या संदर्भात तहसीलदार अरुण जराड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, अर्थपूर्ण संबंधाविषयी मला कसलीही माहिती नाही. यापूर्वी आलेल्या तक्रारीवरून मंडळ अधिकार्यांना सूचना दिल्या होत्या. तरी सुद्धा रेती तस्करी सुरु असल्याने ह्यापुढे मी स्वतः रेती घाटावर जाऊन रेती तस्करावर कार्यवाही करेन. जो कोणी अधिकारी रेती तस्करांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर सुद्धा कार्यवाही करण्यासाठी वरिष्ठांना पाठविणार असल्याचे सांगितले. 

याबाबत मंडळ अधिकारी सय्यद इस्माईल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, प्रत्यक्ष पेंडावर जाऊन रेती तस्करांची वाहने जप्त करून त्यांच्यावर पोलिस कार्यवाही केली जाईल.

१२ मे, २०१४

विनयभंग

१७ वर्षीय बालिकेचा विनयभंग


नांदेड(प्रतिनिधी)सिरंजनी ता.हिमायतनगर येथे एका 17 वर्षीय बालिकेचा तिघांनी विनयभंग केल्याचा प्रकार 11 मे रोजी सायंकाळी घडला. सोडविण्यास आलेल्या उवातीच्या भावाला सुद्धा संबंधित आरोपींनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सिरंजनी येथील एक 17 वर्षीय बालिका सिरंजनी बसस्थानकासमोरच्या पाण्याच्या हापश्याजवळ उभी होती. पाणी हपासताना सदा युवतीची ओढणी खाली पडल्यामुळे सदर आरोपींची तिच्यावर वाईट नजर पडली. या संधीचा फायदा घेत त्यावेळी रवि पंजाबराव राऊत याने वाईट उद्देशाने तिची ओढणी खांद्यावर टाकत अश्लील चाले केले. तर आरोपी महावीर पंजाबराव राऊत आणि अमोल पंजाबराव राऊत या दोघांनी तिचा हात धरून अश्लील चाले केले. त्यावरून सदर मुलीने आरडा - ओरडा करताच तिचा भाऊ मदतीस धावून आला. परंतु वरील तिघांनी तिच्या भावास पाठीवर बेल्टने मारहाण करून, सदर मुलीच्या खांद्यावरील ओढणी काढून सार्वजनिक रस्त्यावर अश्लिल चाळे केले. बालिकेच्या आईला डोक्यात ठोसा मारून मुक्का मार दिला. याबाबत सदर १७ वर्षीय अल्पवईन मुलीने दिलेल्या फियादिवरून हिमायतनगर पोलिसांनी तीन राऊत भावांविरूद्ध कलम ३६४(अ) ३२३, ५०४,३४ भादवी, ७,८ बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.

अतिवृष्टी व गारपीट

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील बोरगडी - बोरगडी तांडा येथे माहे जुलै २०१३ मध्ये झालेली अतिवृष्टी व मार्च २०१४ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी तलाठी शेख मुस्सा, ग्रामसेवक शिलेवाड, कृषी सहाय्यक माजळकर यांची मागणी पूर्ण न केलेल्या शेतकर्यांना शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या मदतीपासून वंचित ठेवल्याची तक्रार येथील २० ते २५ ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. तातडीने संबंधितांवर कार्यवाही करून निलंबित करावे आणि खरे नुकसान झालेल्यांना शासनाची मदत मिळून द्यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.

विदर्भ - मराठवाड्याच्या सिमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदी तीरावर बोरगडी - बोरगडी तांडा गाव्वासलेले आहे. या गावांना नेहमीच अतिवृष्टी व गारपीटीचा फटका बसतो. असच फटका सन २०१३ च्या जुलै - ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टी व सन २०१४ च्या मार्च महिन्यात झालेल्या वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे संबंधित नदी काठावरील गावाच्या शेतकर्यांना बसला आहे. अतिवृष्टीत खरडून गेलेल्या जमिनी व पिकंचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून खर्या शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी असे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री सुरेश धस यांनी दिले होते. तर गारपीट भागातील शेतकर्‍यांचे हाताशी आलेले रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कापूस व ज्वारी ही पिके नेस्तानाभूत झाली. तसेच शेत शिवारातील आंब्यांचा मोहर पूर्णत: नष्ट झाला आहे. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा सर्वे करुन शासनातर्फे तात्काळ मदत देण्यात येणार असल्याने हिमायतनगर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचे सर्वे कण्यात आले. त्यावेळी बोरगडी - बोरगडी तांडा भागातील तलाठी श्री शेख मुस्सा, ग्रामसेवक श्री शिलेवाड, कृषी सहाय्यक श्री माजळकर यांनी नुकसानीची नोंद वरिष्ठ स्थरावर पाठविण्यासाठी शेतकर्यांना प्रत्येकी ३ हजार रुपयाची मागणी करण्यात आली. परंतु केवळ मागणीची रक्कम न दिल्यामुळेच संबंधिता अधिकार्यांनी आमचे नाव नुकसानग्रस्त यादीतून वगळले आहे. स्वार्थापोटी नुकसानीच्या यादीतून वगळून शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकाची चौकशी करून मदतीपासून वंचित ठेवल्याप्रकरणी निलंबित करावे. तसेच जायमोक्यावर जाऊन खर्या अर्थाने झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकर्यांना मदत मिळून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी धीरज कुमार, उपविभागीय अधिकाई किनवट, तहसीलदार हिमायतनगर, तालुका कृषी अधिकारी हिमायतनगर यांच्याकडे करण्यात आली आहे. यावर प्रेमराव किशनराव चव्हाण, चिमणाबाई किसान चव्हाण, ज्ञानेश्वर संभाजी काईतवाड, सिधुबाई प्रेम चव्हाण, प्रेम कानिराम चव्हाण, बेबीबाई देवराव चव्हाण, प्रबत संतोबा काईतवाड, विजयाबाई नरेंद्र चव्हाण, संभाजी राजाराम काईतवाड, बालाजी गंगाधर सोलेवाड, नामदेव संभाजी काईतवाड, यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्या आहेत. 

९ मे, २०१४

सोन्यावर पडदा पडणार...?

हिमायतनगर(अनिल मादसवार)येथून जवळच असलेल्या मौजे पवन तांडा येथे शेतात सापडलेल्या चार सोन्याच्या विटांवर पडदा पडण्याची शक्यता असून, पोलिसांनी एका राजकीय व्यक्तीकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालू असल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसून येत आहे.

बार्शीच्या दिवशी शेतात काम करणाऱ्या पवना तांडा येथील राजू शंकर पवार या युवकास चार सोन्याच्या विटा सापडल्याची चर्चा सबंध तालुकाभर पसरली. सुरक्षेच्या दृष्टीने त्या विटा त्याने त्याच्या भावाजीकडे ठेवल्याचे सांगण्यात आले. काही दिवसाने राजूने सोन्याच्या विटा मागणीसाठी भावजीकडे गेला असताना देण्यास टाळाटाळ केली. त्यावरून दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. आणि सोने सापडल्याचे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत जाऊन पोहोंचले. चौकशीच्या नावखाली पोलिसांनी भेट देऊन प्रथमतः किरकोळ मारहाणीचा गुन्हा नोंदविला. त्यानंतर मात्र फियादी राजू शंकर पवार याने गुप्त धनाची फियाद दिली. सापडलेल्या सोन्याच्या विटा देण्यास टाळाटाळ करीत असून, मागितले असल्यास भांडण करीत असल्याची फिर्याद दि.०५ मी २०१४ रोजी देण्यात आली. तेंव्हापासून सदर प्रकरणी चौकशी चालू असल्याच्या बतावण्या पोलिसांकडून केल्या जात असल्या तरी यातील एक सोन्याची वीट पोलिसांनी हस्तगत केली असून, उर्वरित सोन्याच्या विटा एका राजकीय व्यक्तीकडे ठेवण्यात आले असून, त्या मंदावली करून देण्यात येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

या ठिकाणी सापडलेल्या सोन्याचे जवळपास २० ते २५ कोटी रुपये मुल्य असल्याने हे प्रकरण जवळपास दडपण्यात पोलिस व राजकीय व्यक्ती यशस्वी होण्याची चिन्हे दिसत आहेत. सोने सापडल्याची फिर्याद देणारा राजू हा सोने मिळविण्यासाठी पोलिस ठाण्यात गेला खरा पण सोन्याच्या अंड्यावर भालत्यांचीच नजर असल्याने या सोने प्रकरणाला वाचा फुटणार कि हे प्रकरण दडपले जाणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. हिमायतनगर पोलिसांकडून मात्र त्या ठिकाणी सोन्याच्या नव्हे तर मातीच्या विटा संदुकात असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे फियाद देणारा एक तर मानसिक रोगी असावा किंवा दोन्ही डोळ्यांनी आंधळा असावा असा तर्क वितर्क नागरीकातून लावला जात आहे.

प्रथमतः चौकशीला गेलेला पोलिस अधिकारी रजेवर गेल्याने सदरील प्रकरण संशयाच्या दात भोवर्यात सापडले आहे. याबाबत पोलिस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता ते म्हणाले कि, तेथे सोने - बीने काही नाही, मातीच्याच विटा आहेत, परंतु प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी उद्या दि.१० रोजी फियादीच्या तक्रारीवरून पुन्हा एकदा त्या सर्व संशयिताना चौकशीला बोलावले असल्याचे सांगितले.

८ मे, २०१४

लग्नसराईची धूम

हिमायतनगर(अनिल मादसवार)वाढती महागाई व नापिकीमुळे सर्व सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. खरीपाचा हंगाम अतिवृष्टीने वाहून गेला, रब्बीचा हंगाम गारपिटीने नेला. अश्या अवस्थेत आर्थिक घडी कशी बसवावी या विवंचनेत सर्वसामान्यांची गोची झाली आहे. परंतु काहीही झाले, कितीही मोठी संकटे आली तरी लग्न घटिका हि निभाऊन न्यावीच लागते. तशीच अवस्था या वर्षीची झाली असून, यातही वाढत्या महागाईला बाजूला सारून सध्या तरी लग्नसराईची धूम जोरात सुरु असल्याचे दिसून येत आहे.

हिंदू रीतिरीवाजाप्रमाणे वर हा लग्नाअगोदरच्या पूर्व संध्येला म्हणजे हळदीला वधू मंडपी पोहोंचतो, त्याच्यासोबत करवली, सकोन्या व अन्य खास पाहुणे मंडळी असतातच. त्या सर्वांची चांगली सोय करून, विधिवत व वाजत गाजत नवरदेवाची वरात काढून लग्न लावणे व भोजनासह पार्टीने पाठविणे हा सव खर्च वधूच्या पित्याला सहन करावा लागतो. हे सर्व तर ठीक मात्र सध्या वरच्या मिरवणुकीत सामील होऊन धम्माल करणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, यासाठी मग ट्रकसारख्या वाहनाच्या टपावर बसून जीवघेणा प्रवास करण्यास माघार घेत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात सर्रास पहावयास मिळत आहे.

खाजगी म्हणी प्रमाणे नवरदेव जातो नवरीसाठी ..वऱ्हाड जाते पोटासाठी... वधुपित्याकडून वऱ्हाड मंडळीच्या जेवणावळीची खास सोय केली जाते. परंतु महागाईने कळस गाठल्याने वाधुपित्यांचे कंबरडे मात्र मोडत आहे. त्यातच कायद्याने हुंडा देणे- घेणे बंदी असताना सुद्धा हि प्रथा अजूनही ग्रामीण भागात वाढल्यामुळे शासकीय नौकरीत असलेल्या नवरदेवाचे भाव तर गगनाला भिडले आहे. शेतकरी कुटुंबातील वारांचा भाव तर एकरी एक लाख असा झाला असून, सालगड्याची मागणी अर्ध्या लाखावर गेली आहे. यामुळे लग्नाची मुलगी असलेल्या पित्याची चांगलीच फटफजिती होत असून, कायद्याने हुंड्याची प्रथा कमी होत नसल्याने या बाबत जागरूक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तेंव्हा सर्वांनी मिळूनच या हुंड्याच्या प्रथेला लगाम लाऊन खर्च व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी सामुहिक विवाह मेळाव्यात सहभागी होऊन वधू पित्यांना दिलासा देणे व हुंडा बंदीची जागरूकता निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

घरच्यांचे दुर्लक्ष बालकांच्या जीवावर बेतले

घरच्यांचे दुर्लक्ष बालकांच्या जीवावर बेतले 

विषारी दारू विक्रीवर कायमस्वरूपी बंदी आना

नांदेड(अनिल माद्सवार)नांदेड शहरासह जिल्हयातील 70 टक्के गावात अवैध रित्या देषी व विदेषी दारूची उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रषासनाच्या संगनमताने राजरोसपणे विकी केली जात आहे. हा प्रकार छोटया हॉटेलात, पानटपरीवर, तर कुठे किराणा दुकाण, नांदेड सारख्या महानगराच्या ठिकाणी हातगाडयावर विकल्या जात असल्याचे निदर्षनास आनुन दिले होते. त्याची दखल तथा निवडणुक आचारसंहिता म्हणुन जिल्हयात दारूबंदी विभागाने 174 ठिकाणी छापे मारून कार्यवाही केली केली. खरे पाहता नांदेड जिल्हयातील 700 ते 950 ठिकाणी छापे टाकून कायावाही काणे आपेक्षित होते. परंतु अवैद्य धंदयात गुंतलेल्या लोकांना वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत सदर कार्यवाही झाल्यामुळे पुन्हा नव्या जोमाने या विकेत्यांनी आपला कारभार सुरु केल्याचे ग्रामीण भागातील वाडीतांडयातुन दिसुन येत आहे. यास हप्तेखाऊ पशासाकीय यंत्रणा कारणीभूत असल्याचा आरोप कर्मयोगी संस्थेने दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.

या विषारी जिवघेण्या दारूमुळे पतीराजाच्या त्रासामुळे हजारो तरूण, विधवा महिलांचे सांसार उध्वस्त झाले असून, जिल्हयातील हजारेा महीलांना आपले सौभाग्य गमवावे लागले आहे. परिणामी दिवसागणीक जिल्हयातील विधवांची सख्या वाढत आहे. ग्रामीण भागातील वाडी- तांडयावरील 12 ते 13 वर्षाची अल्पवयीन मुले ही विशारी दारू पितांना आढळुन येत आहेत. यामुळे हजारो नवयुवक लिव्हर सारख्या आजाराला बळी पडत असून, मरणयातना भोगत आहेत. कित्येक महीला दारुड्या पतीच्या अत्याचाराचे बळी ठरले असून, जिवाच्या भितीने सासर सोडुन माहेरी जाने पसंद केले आहे.

दारूच्या आहारी गेलेली व्यक्ती आपली तलब भागविण्यासाठी पत्नी,मुले, आई वडिलांशी भांडण करून पैश्यासाठी मारहाणीच्या घटना घडत आहेत. वेळ प्रसंगी शेजार्यांना शीवीगाळ करून भांडण तंट्याला कारणीभूत ठरत असून, याचा नाहक त्रास बिचार्या मुलीला भोगावे लागत आहेत. त्यामुळे सामाजीक, कौटुंबिक आणि आर्थिक कलह वाढून मोठया प्रमाणात नुकसान होऊन हा प्रकार समाजासाठी व देषहितासाठी अत्यंत हानीकारण ठरत आहे. ज्यामुळे ती व्यक्ती समाजात संस्कारषुन्य ठरत असून, येणारी नवीन पिढी समजदार होण्या अगोदरच व्यसनांच्या आहारी जात असल्याचे भयावह चित्र दिसत आहे. व्यसनाधीन तरूणांची टोळी देषाचे भवितव्य काय निर्माण करू शकतात, त्यासाठी सर्वत्र विक्री केली जात असलेली दारू विक्री बंद करून हद्पार करून देषातील तरूण अगोदर वाचवला पाहीजे. तरच देष आगामी काळात जागतीक महासत्ता बनेल अन्यथा २०२० साली देशाला महासत्ता बनू पाहणाचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असेही निवेदनात म्हंटले आहे.

यासाठी उत्पादन शुल्क विभागाने आपली स्वार्थी वृत्ती सोडून वर्षभर सक्रिय राहून हे धाडसत्र सारखे चालुच ठेवलयास अवैध दारू बंद होईल. ग्रामीण भागातील गावागावात, वाडीतांडयात दारू मिळालीच नाहीतर लोकांच्या दारूपिण्यावर मर्यादा येतील, ग्रामीण कुटुबातील वादविवाद, घरसंसार, महीलांवरील अत्याचार कमी होऊन नागरीकांचे आरोग्य अबाधित राहील.

नवीन पावणे बंद करा...

प्रषासनाच्या आर्थिक लालसे पुढे हे सर्व प्रकार केवळ आर्थिक स्तर उंचावून उत्पन्न वाढीसाठी नवनवीन वाईन शोप, बियरबार, देशी दारूचे पावणे देत आहेत. हे सर्व शासनाच्या आदेशाने चालते मग बंद कोण करणार ? याउलट सरकार तर हया दारूबंदी विभागास अधिक कर वसुल करण्याचे ध्येय देत असल्याचे दिसुन येत आहे ज्या दारूने माणसं मरत आहेत त्या दारू विक्रीचे सरकारनेच उद्दिष्ट ठरून दिल्यानेच सगळीकडे दारूचा महापुर वाहत असल्याचे चित्र सध्या नांदेड जिल्हयात पहावयास मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने नव्याने देण्यात येणाऱ्या परवाने बंद करून देश सुधारण्यासाठी यावर कायामुपी बंदी आणणे गरजेचे आहे.

समाज सुधारण्यासाठी अनिलसिंह गौतम अधिकारी हवेत

काही दिवसांपुर्वी हिमायतनगर तालुक्याला पोलीस निरीक्षक म्हणुन श्री अनिलसिंह गौतम आले होती केवळ 22 दिवसाकरीत तर तालुक्यातील एकाही गावात दारूचा थेंब मिळत नव्हता एखादा कर्तबगार अधिकारी चांगले काम करीत असेल तर त्यांना हप्ते मिळत नाहीत म्हणुन फिरवले जात आहे. त्यांच्या जाण्याने आज हिमायतनगर तालुक्यातील प्रत्येक गावात दारूचे महापूर वाहत आहे. जर एक अधिकारी केवळ 22 दिवसात येवढा बदल घडवुन आणू शकतो तर पोलीस प्रषासनाकडे मोठी ताकद असताना देखील असे जन हितकारक व प्रभावी काम नांदेड जिल्हयात का..? होतांना दिसत नाही. आजघडीला अनिलसिंह गौतम लोहा तालुक्यात असून, तालुक्यातील प्रत्येक गावात दौ पिउन घरी येण्याची हिम्मत कोणी करत नसल्याने त्या भागातील महिला शांतपणे घरगाडा चालवीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अनिलसिंह गौतम सारखे अधिकारी नेमावे असेही निवेदनात म्हंटले आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, ग्रहमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्यसचीव महाराष्ट्र राज्य, ग्रहसचीव महाराष्ट्र राज्य, राज्य उत्पादन शुल्क सचीव महाराष्ट्र राज्य, नागरीक आरोग्य सचीव महाराष्ट्र राज्य, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, जिल्हाधीकारी नांदेड, पोलीस अधिक्षक नांदेड व पासिद्धीसाठी सर्व वृत्तपत्राना दिले आहे.

७ मे, २०१४

ढगाळ वातावरण

हिमायतनगर(वार्ताहर)मागील अनेक दिवसपासून वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असताना बुधवारी सकाळपासून आभाळात ढगांची गर्दी झाल्याने दिवसभर उन - सावलीच्या खेळाचा अनुभव बघावयास मिळाला आहे. मात्र वर्य्मुळे उडालेली धूळ व कचर्याने नागरिकांना चांगलेच त्रस्त केले आहे.

बुधवारी सकाळपासून आभाळात ढगांनी गर्दी केली होती, तरीदेखील सकाळी कोवळी किरणे देऊन उगवणाऱ्या भास्करने दिवसाची सुरुवात झाली. ऐन आठवडी बाजाराच्या गर्दीत घाम गळणार्या व्यापारी व बाजारकरुणा ढगाळ वातावरणाने दिलासा मिळाला आहे. सकाळपासून अशीच परिस्थिती झाली असून, अधून मधून ढगांची कमी - अधिक होणारी गर्दी व उन - सावलीचा खेळ चालत असताना, वादळी वार्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. या वार्याने रस्त्यावरील धुळीबरोबर केर कचराही अनेकांच्या दुकानात शिरल्याने व्यापार्याने ती साफ करताना नाकीनऊ आल्याचे चित्र बघावयास मिळाले आहे. यामुळे नागरिकही चांगलेच त्रस्त झाले असून, आभाळाच्या वातावरणाने होणार्या गर्मीने जिव कासवीस झाल्याने शीतपेयाची दुकाने खच्च खच्च भरल्याचे दिसून आले. एकूणच दिवसभर आभाळात ढगांची गर्दी राहिल्याने आजच्या तापमानात एकदम घसरण होऊन वातावरणात बदल झाल्याने काही अंशी का होईना उन्हाचा पारा कमी झाल्याने ढगांची गर्दी वाढत असल्यामुळे शेतकरी माजुरदाराणी अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तविली आहे.

६ मे, २०१४

सोन्याचे गूढ कायम..

नांदेड(अनिल मादसवार)हिमायतनगर तालुक्यातील मौजे पवना तांडा येथील शेतात सापडलेल्या गुप्त धनाचे गूढ उकलण्यात आले नसल्याने चार सोन्याच्या विटा जिरवण्याचा पोलिसांसह काही राजकीय व्यक्तींचा मनसुबा असल्याची चर्चा सर्व स्तरातून ऐकावयास मिळत आहे.

पवन तांडा येथील एका शेतात काम करता असताना राजू शंकर पवार या युवकास चार सोन्याच्या विटा सापडल्याची चर्चा आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने त्याने ह्या विटा त्यांच्या भावजीकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिल्या असल्याचे खुद्द राजू शकणार पवार याने पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. परंतु त्या मागण्यासाठी गेल्याने अर्जदाराच्या भावजीने भांडण करून माझ्याकडे काहीही नाही असे सांगत आहे. पुन्हा मागणी केल्यास विषारी औषध प्रश्न करून जीव देईन असे म्हणत असल्याने सदर प्रकरण गुंता गुंतीचे बनत चालले आहे. पोलिसांकडून मात्र या प्रकरणावर पडदा टाकून स्वार्थ साधण्याच्या हेतून त्याच्या संदुकात बांधकामच्या मातीच्या विटा असल्याचे सांगितले जात आहे. यातील एका पोलिस अधिकायाने जमादाराकरवी एक वीट फस्त केल्याची चर्चा असून, त्या तक्रारीच्या दुसर्या दिवशीपासून तो रजेवर गेल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी सदरचे प्रकरण एका विटी च्या सौद्यावर राफा - दफ करण्याचा प्रयत्न चालविल्याचे नाग्रीकातून बोलले जात आहे. कालपासून या प्रकरणाची चौकशी सुरु झाली असून, रात्रीला या गावात उपविभागीय पोलिस अधिकारी येउन गेल्याचे काही नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे या ठिकाणी सापडलेले गुप्त धनाच्या प्रकरणाचा परदा फाश होईल कि, याच ठिकाणी थांबविले जाइल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हल्ल्यात आठ शेळ्या ठार

लांडग्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार...हरणाचा कळप समोर आल्याने दुचाकीस्वार जखमी


हिमायतनगर( अनिल मादसवार)विदर्भ - मराठ्वाच्याच्या सीमेवरील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या डोळी शेत शिवारात चरण्यासाठी गेलेल्या शेळ्यांच्या कळपावर लांडग्याने अचानक हल्ला केल्याने आठ शेळ्या ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली, तर याच दिवशी सायंकाळी राज्य र्स्त्यवौन जाणार्या एका दुचाकीसमोर हरणाचा कळप आल्याने अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झाला आहे. या प्रकाराकडे वनविभागाने लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा तसेच मानवी वस्तीकडे फिरकणाऱ्या प्राण्यासाठी पानावठ्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

हिमायतनगर तालुक्यातील मौजे डोल्हारी येथील शेतकरी शिवाजी चंद्रभान भाटेवाड यांचे शेतात आखाडा आहे. ते नेहमीच आपल्या शेळ्या जनावरांसह शेतातील आखाड्यावर बांधतात. तसेच रात्रीला जगलीला जातात. दररोजप्रमाणे ०५ मी सोमावाई त्यांनी आपल्या शेळ्या चारून आखाड्यावर बांधल्या नि घराकडे परतले. त्या रात्रीला ते शेतात गेलेच नाही, त्यामुळे सायंकाळी बांधलेल्या शेळ्यांवर लांडग्यांनी अचानक हल्ला चढविला. यावेळी बांधलेल्या शेळ्यांना पळून जात आले नसल्याने वाण्याप्रण्याच्या हल्ल्यात त्या गंभीर रित्या जखमी झाल्या. लांडग्यांनी शेळ्यांच्या नद्यावर व पोटावर हल्ला करून चावा घेतल्याने जागीच तडफडून मरण पावल्या. दुसर्या दिवशी जेंव्हा सदर शेतकरी शेतात गेला असता त्या ठिकाणी आपल्या आठही शेळ्या मृत्युमुखी अवस्थेत आढळून आल्या. सदर शेत्कायाने तातडीने घटनेची माहिती वनविभागास देऊन कळविल्याने वनपाल बनसोडे व वनरक्षक सोनकांबळे  यांनी घटनास्थळी भेट देऊन शेळ्यांच्या मृत्यूचा पंचनामा करून सदर हल्ला लांग्याने केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अगोदरच शेतकरी हा शेतात झालेल्या नापिकीने त्रस्त असताना शेतीबोबर शेली पालनाचा जोड धंदा करण्यार्या शेतकयांच्या शेळ्या वन्यप्राण्यांनी हिरवल्याने नुकसानीत आला आहे. आठ शेळ्या दगावल्याने जवळपास ४५ ते ५० हजाराचे नुकसान झाले असून, या बाबत वनविभागाने नुकसान भरपाई मिळून द्यावी अशी मागणी पैस्रातील शेतकी वर्गातून केली जात आहे. 

जंगल परिसरातील पाणवठे कोरडे पडल्याने वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत असून, जंगलातील रोही, हरण, निळ, लांडगे, वानरे, रानडुकरे यांच्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. तसेच मुख्य रस्त्याने वाहन चालविताना दुचाकी स्वाराना वन्य प्राण्याच्या धडकीमुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. असाच एक अपघात नुकताच झाला असून, नांदेड न्युज लाइव्हचे छायाचित्रकार प्रकाश सेवाणकर यांच्या दुचाकीसमोर हरणाचा कळप आल्याने त्यांच्या चेहर्याला चांगलाच मार लागला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकुती स्थिर आहे. याबाबत वनअधीकार्यांशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.