NEWS FLASH लोकसभा विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड. चारुलता टोकास यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली, भाजप नेते माजी आ.रमेश कदम यांचा समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश, मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची जाणीव करून देण्यासाठी गुरुवारी पनवेल सावंतवाडी दरम्यान काँग्रेस पक्ष करणार सत्याग्रह आंदोलन, मुखेड नगरपरिषदेच्या घन - कचरा व्यवस्थापन टेंडर निविदा प्रक्रिया रखडल्याने जागोजाग घाण साचली, राम शिंदे यांना स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्राचे ब्रँड अम्बॅसेडर नेमा- सचिन सावंत **

३१ मार्च, २०१४

नववर्षाची मुहुर्तमेढ

गुढया-तोरणे बांधुन बळीराजाने केली नववर्षाची मुहुर्तमेढ


हिमायतनगर(अनिल मादसवार)नांदेडजिल्ह्यातील ग्रामीण परिसरात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बळीराजाने पारंपारिक पद्धतीने काळ्या आईची पूजा अर्चना करून नववर्षाची मुहूर्तमेढ रोऊन शेती कामांना प्रारंभ केला. तर ग्रहीनिनी घरी उंच गुढी उभारून घरा - दाराला आंब्याचे तोरण बांधून शेजारच्यांना गोड जेवण देवून वनभोजनाचा आनंद लुटल्याचे चित्र, चैत्र शुद्ध एकादशी दि.३० मार्च रोजी सर्वत्र दिसून आले आहे.

भारत हा कृषीप्रधान देश असुन, या देशातील शेतकरी कष्टकरी असल्याने सर्वात जास्त धान्याची संपत्ती असलेला देश म्हणुन ओळखला जातो. वयोवृद्द जानकारच्या रुढीपरंपरेनुसार व श्रीरामाने रावणाचा वध करुन मिळवीलेला विजय व आयोध्येला परत आलेला दिवस म्हणुन गुढीपाढवा सन होय. 14 वर्षाच्या वनवासनंततर प्रभुरामचंद्र घरी परतले म्हणन तमाम जनतेनी घरो-घरी गुढया तोरणे उभारुन मोठ्या उत्साहात स्वागत केले, तोच दिवस गुढीवाडवा म्हणुन आजही साजरा केला जातो. या नवीन वर्षात शेतकरी आपल्या शेतीच्या अवजारांची पुजा करुन सर्व कामाला सुरुवात करतात. चैत्र शुध्द प्रतीपदेला शेतातील धन-धान्य घरात आल्याच्या आनंदाने घरा-घरात गुढ्या तोरणे उभारुन गृहलक्ष्मीच्या हस्ते गुढीची पुजा केेली जाते.साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त असल्यामुळे अनन्य साधारण मंहत्व असलेल्या मराठी नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात यशश्री, आरोग्य, मांगल्य, माधुर्य, वैभव, सामर्थ, संकल्प, सौभाग्य, सिध्दी, स्थैर्याची गुडी - तोरणे उभारुन बळीराजाने मुहुर्तमेढ साधल्याचे चित्र हिमायतनगर शहर व ग्रामीण परिसरासह नांदेड जिल्हयात पहावयास मिळले.

इतीहासाच्या काळात शालीवाहन नावाच्या कुंभार समाजाच्या राजाने मातीचे सैनीक तयार केले. सैनीकांत रणशींग फुंकुन परकीय आक्रमकांना पिटाळुन लावले, त्यांच्या नावे शालीवाहनशके सुरु झाले. तो दिवस म्हणजेच गुढीपाडव्याचा दिवस होय? असा उल्लेख इतिहासात असुन हा राजा मराठावाड्यातील पैठण येथील असल्याचाही उल्लेख केल्याचे दिसते. त्यामुळे हिंदु संस्कृतीच्या शालीवाहनशके अनुसार भारतीय नववर्षाची कालगनणा सुरुवात झाली. या दिवशी शेतकरी आपल्या शेतीच्या कामास प्रारंभ करण्यापुर्वी शेजारी - पाजारचे शेतकरी व कुटुंबांना आमंत्रन देऊन काळ्या आईची पुजा- अर्चना, नैवेद्या दाखऊन गोडजेवन देतात. तसेच शेती कामांना आडच्या दिनी तास करुन सुरुवात करतात. याच दिवशी आरोग्याच्या दृष्टीने लाभादायक ठरावे म्हणुन कडु - गोड औषधी चांगली असते. म्हणुनच कडुलिंबाचा फुलोरा, कैरी, चिंच, गुळ, जिरे आदिचे मीश्रण करुन जेवनाअगोदर सेवन केले जाते. गुढीपाढव्याच्या महुर्तावर उन्हाची तिव्रता वाढली असली तरी, इश्वर भक्तीच्या ओढीने महीला-पुरुष भावीक-भक्तांनी उन्हाची तमा न बाळगता शहरातील मंदिरांना हजेरी लाऊन दर्शन घेतले.

या मराठी नववर्षाच्या दिवसापासुन रामनवमी, हनुमान जयंती, महाविर जयंती आदिंसह विविध मराठी सनांची रेलचेल सुरु होते.तसेच वसंत ऋुतुच्या आगमनाने जंगल परिसरातील झाडांची पानगळी होऊन वृक्षांना नवी पालवी फुटते. परिसरातील काही वृक्ष नव्या पालवीने बहरल्यामुळे ते वृक्ष वाटसरुंचे लक्ष वेधुन घेत आहेत. तसेच चाफा, गुलमोहर, काटशेवरी, पळसफुले, गणेरी, शेवंती, पांगरा, गुलाब आदिंसह रंगीबेगंरी फुलांची झाडे बहरल्यामुळे वसंत ऋतुने भर-भरुन निघल्याचे चित्र पाढव्याच्या मुहुर्तावर दिसुन आले आहे.​

" गुढीपाडवा " दिनी रंगला टेंभीत डाव

अतिवृष्टी, नापिकी, गारपिटीचे दुखः विसरून शेतकर्यांनी रंगविला कुस्त्यांचा फड
" गुढीपाडवा " दिनी रंगला टेंभीत डाव

हिमायतनगर(अनिल मादसवार)गुढीपाडवा म्हणजे शेतकऱ्यांचे नवीन वर्ष... या दिवशी काळ्या आईची पूजा करून शेतकरी नवीन वर्षात शेती कामाला लागतात. याच दिवशी शेतात पुरण पोळीचे जेवण बरेच शेतकरी देतात. हीच प्रथा खेडे गावातील असो व शहरी भागातील शेतकरी आजही परंपरे नुसार जगतो. हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेंभी येथे सालाबाद प्रमाणे शेतातील तसा झाले कि, रंगतो तो.." कुस्त्यांचा डाव " निसर्गाने केलेला कोप असो..वा कर्जाचा सावकारी फास ...हि सारी दुखः विसरून कुस्त्यांच्या आखाड्यात आज शेतकरी रममाण झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

टेंभी हे गाव तसे आदर्श सर्व जाती धर्माचे लोक येथे आनंदाने व गुण्यागोविंदाने नांदतात. धार्मिक सन, उत्सव येथे विना पोलिस पार पडतो. गणपती उत्सव असो, मोहरम असो वा भीम जयंती सर्व समाजातील नागरिक एकमेकांच्या कार्यक्रमात उत्सफुर्थपणे सहभाग नोंदवितात. कारण येथील गुरुदेव सेवा मंडळाचे परमेश्वर अक्कलवाड यांचा सार्वजनिक कार्यक्रमात हिरीहीने सहभाग असतो. अन तुकडोजी महाराजांच्या विचारांचा पगडा गावागावाशी जागवा... भेद भाव समूळ मिटवा... उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे... या विचाराने पेरीत होऊन गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांसह तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात प्रभावित असल्याने कोणत्याही धार्मिक उत्सवात कोणाचीही तक्रार नसते.

गुढीपाडवा शेतकऱ्यांचे नवीन वर्ष आज प्रारंभ झाले...याच दिवशी टेंभी येथे रंगला तो कुस्त्यांचा डाव आपले दुखः आपल्या वेदना विसरून येथील तरुणाई रंगते ते कुस्त्यांच्या आखाड्यात एकीकडे राजकीय आखाड्यात चालू असलेले रणकंदन येथे मात्र त्याचा मागमुसही दिसून येत नाही. पंचक्रोशीतील पैलवानांनी मात्र आज कुस्त्यांचा आनंद लुटला आणि नवीन वर्षाची सुरुवात केली ति कुस्त्यांच्या आखाड्यातून.

३० मार्च, २०१४

लोकसभेची उमेदवारी हीच कार्यवाही काय.. नरेंद्र मोदी

अशोक चव्हाणांवर लोकसभेची उमेदवारी देणे हीच कार्यवाही काय.. नरेंद्र मोदी 


नांदेड(अनिल मादसवार)आदर्श घोटाळ्यातील अशोक चव्हाणांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस सरकारने दिले होते. परंतु त्यांना लोकसभेचे तिकीट देणे हिच कार्यवाही आहे काय..? देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानाच्या विधवा महिलांच्या नावे आलेली घरे लुटून आपली तुंबडी भरली. या महिला व जवानांना लुटणाऱ्या आरोपींना आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर कोणताही भेदभाव न करता दोषी व भ्रष्ठ आमदार - खासदारांवर कडक कारवाई केली जाईल. असे अभिवचन श्री गुरु गोविंदसिंग यांच्या पावन भूमीची शपथ घेऊन पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी दिले. ते नांदेड लोकसभा उमेदवार डी.बी.पाटील व हिंगोली लोकसभा उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारार्थ गुरुगोविंद सिंघ स्टेडीयमच्या मैदानावर आयोजित सभेत बोलत होते. यावेळी मंचावर गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, रिपाई नेते रामदास आठवले, खा.चंद्रकांत खैरे, खा.रावसाहेब दानवे, खा.सुभाष वानखेडे, डी.बी.पाटील, आ.संजू उर्फ बंडू जाधव यांची उपस्थिती होती. 

पुढे बोलताना ते म्हणाले कि, काँग्रेसचा काळा पैसा विदेशातील बैन्केत आहे. ते काळेधन परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि ज्यांनी नियमित कर भरला असेल त्यांना काळ्यापैशातील थोडी रक्कम बक्षिस म्हणून देण्यात येईल. काँग्रेस दिल्लीला बलात्काऱ्यांची राजधानी बनवत आहे. निर्भया योजनेसाठी तरतूद करण्यात आलेला पैसा महिलांसाठी खर्च करण्याचे सांगून, काँग्रेस या रक्कमेची लूट करत आहे. म्हणून सुजन मतदारांनी देशाला लुटणाऱ्यांना साफ करून शेतकरी, मजूरदार, युवकांसह देशहितासाठी महायुतीला मतदान करा असे अवाहणहि त्यांनी केले. यावेळी मोदींचे भाषण ऐकण्यासाठी नांदेड, हिंगोली जिल्यातील ग्रामीण भागातून लाखोच्या संखेने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित झाले होते. एका एका वाक्यानंतर मोदी..मोदी... असा नावाचा जय जयकार करण्यात आल्याने संपूर्ण नांदेड परिसर दणाणून निघाला होता.

२९ मार्च, २०१४

आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे

उमेदवारांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे
केंद्रीय निवडणूक निरीक्षक नवीन राज सिंह यांचे आवाहन


नांदेड (मिडिया सेंटर)नांदेड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवार व त्‍यांच्‍या प्रचारकांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करुन निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे. निवडणूक काळात असलेल्‍या वेगवेगळ्या चिंतांची यादी करुन माझ्याकडे द्यावी. त्‍यावर योग्‍य तो निर्णय घेतला जाईल. मतदानासाठी मतदान यंत्र तयार करण्‍याची सूचना सर्व उमेदवारांना लेखी कळविण्‍यात येईल. मतदान यंत्र तयार करताना उमेदवार किंवा त्‍यांचे प्रतिनिधी यांनी स्‍वतः व्‍यक्‍तीशः हजर राहावे, असे आवाहन केंद्रीय निवडणूक निरीक्षक नवीन राज सिंह यांनी निवडणूक लढवणा-या उमेदवारांच्‍या आयोजित बैठकीत केले.

जिल्‍हा निवडणू‍क निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी धीरजकुमार यांनी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्‍या उपस्थितीत निवडणूक लढवणा-या उमेदवार व त्‍यांच्‍या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक परमजीतसिंह दहिया, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, आचारसंहिता कक्ष प्रमुख राजेंद्र खंदारे, निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी संतोष पाटील, प्रचार खर्च विभागाचे लेखाधिकारी पाचंगे यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी बोलताना श्री. सिंह म्‍हणाले, निवडणूक लढवणा-या उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेदरम्‍यान जी चिंता आहे, त्‍याची लेखी स्‍वरुपात यादी (वरी लिस्‍ट) तयार करुन जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच माझ्याकडे द्यावी. उमेदवारांच्‍या सर्व शंकेचे समाधान करता येईल. सर्व उमेदवारांनी निवडणूक शांतता, निर्भय व मुक्‍त वातावरणात होण्‍यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्‍यांनी केले.

जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी धीरजकुमार यांनी उमेदवारास मार्गदर्शक सूचना केल्‍या. उमेदवारांनी आचारसंहिता भंगाबाबत तक्रार असेल तर 02462-247247 या क्रमांकावर संपर्क करावा. प्रचारासाठी आवश्‍यक असलेल्‍या सर्व परवानग्‍या वेळेत दिल्‍या जातील. त्‍यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयात मनपा क्षेत्रासाठी तसेच संबंधित पोलिस ठाण्‍यात एक खिडकी कक्ष सुरु करण्‍यात आला आहे. मतदान प्रक्रिया संपण्‍याच्‍या 48 तास अगोदर अर्थात दि. 15 एप्रिल 2014 रोजी सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचार बंद करावा लागणार आहे, असे त्‍यांनी सांगितले. याप्रसंगी उमेदवारांनी उपस्थित केलेल्‍या विविध शंकेचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक तसेच जिल्‍हा निवडणूक अधिका-यांनी निरसन केले

अमावश्या तारणार का..?

अडचणीतील डी.बीं.ना अमावश्या तारणार का..?

नांदेड(प्रतिनिधी)लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या देशातील ठिकठिकाणच्या सभा गाजत असताना नांदेड येथे रविवारी होणार्‍या मोदींच्या सभेसाठी स्थानिक पातळीवर कुठल्याच प्रकारचे नियोजन नसल्यामुळे या सभेच्या यशस्वीतेबाबत भाजपाप्रेमींत संभ्रम निर्माण होत आहे. भर अमावश्येत होणारी ही महत्त्वपूर्ण सभा सर्वच आघाड्यावर अडचणीत आलेल्या भाजप उमेदवारासाठी राजकीयदृष्ट्या तारक ठरणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डी.बी.पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही स्थानिक पातळीवर पक्षाचा ‘प्रचार आणि प्रसार’ गतिमान केला नाही. देशभरात मोदी लाटेचा उदोउदा होत असताना जिल्ह्यात मात्र मोदींचा नामोल्लेखही दिसून येत नाही. भाजप प्रचाराचे नियोजन करण्यासाठी पक्षप्रवक्ते माधव भंडारी तसेच प्रभारी आ. विजय गव्हाणे शहरात तळ ठोकून असले तरी त्यांच्याही नियोजनाचे तीनतेरा झाल्याचे दिसते. उद्या रविवारी नरेंद्र मोदी नांदेडात दाखल होत असून त्यांची जाहीर सभा गुरुगोविंदसिंग स्टेडियमवर होत आहे. ही सभा यशस्वी झाली तरच जिल्ह्यातील भाजपा उमेदवाराचे भवितव्य ठरणार असताना या सभेच्या यशस्वीतेसाठी मात्र भाजपातच अलबेल वातावरण आहे. प्रचाराचा कारभार कोणाकडे? नियोजन कोणाकडे? यासह वाहनांची व्यवस्था, गर्दी जमविण्याची जबाबदारी याबाबत कुठलेच नियोजन दिसत नाही. महायुतीतील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही विश्वासात घेतले जात नसल्याच्या तक्रारी असल्याने शिवसेना, रिपाइं (आठवले) गटाचे कार्यकर्तेही प्रचारासाठी फिरताना दिसत नाहीत.
शहरासह ग्रामीण भागातही अद्याप मोदींच्या सभेची माहिती पोहोचली नाही. ग्रामीण भागातील कार्यकर्ते अंग झटकून कामाला लागले नसल्याने मोदींच्या सभेला ग्रामीण भागातून गर्दी खेचण्यात स्थानिक नेत्यांना यश मिळेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

देशात निर्माण झालेली भाजपची हवा जिल्ह्यात कायम राहील असे वाटत असताना भाजपच्या नियोजन -शून्यतेमुळे व एकाचा पायपोस एकाला राहिला नसल्यामुळे भाजपचा प्रचार कोणत्या मार्गाने सुरु आहे, याचा थांगपत्ता राहिला नाही. मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी राष्ट्रीय पातळीवरील भाजप नेते एक-एक जागा महत्त्वाची मानत असले तरी नांदेडमध्ये रविवारी होणारी सभा यशस्वी ठरेल, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.रविवारी भर अमावश्येत मोदींच्या सभेचा मुहूर्त असल्यामुळे हा मुहूर्त भाजप उमेदवारासाठी राजकीय दृष्ट्या तारक ठरतो की मारक याबाबत उत्स्कुता लागली आहे. 

२८ मार्च, २०१४

मिरवणुकीत फटाके उडविणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले

अशोकराव चव्हाण यांच्या मिरवणुकीत फटाके उडविणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले
मनपाच्या सहाय्यक आयुक्तांनी केली होती तक्रार

नांदेड(प्रतिनिधी)अशोकराव चव्हाण यांच्या रॅलीतील दाखल झालेला गुन्हा एक अजब पद्धतीने दाखल करण्यात आला असला तरी यातील आरोपींना शोधून त्यांना अटक करू असे अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांनी सांगितले.

26 मार्च रोजी लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अशोकराव चव्हाण यांनी वर्कशॉप कॉर्नर ते जुना मोंढा अशी रॅली काढली.या रॅलीला मुख्य रस्त्यावरून विशेष करून शिवाजीनगर उड्डाण पुलावरून परवानगी मिळाली हा एक वेगळा विषय आहे.या रॅलीत कॉंगे्रस कार्यकर्त्यांनी उत्साहात ठिकठिकाणी फटाके वाजविले.

वजीराबाद भागात एक 45 वर्षीय महिला निर्मलाबाई नामदेव कोटुरवार यांच्या डोळ्यात एक फटाका लागला त्यामुळे त्यांच्या डोळ्याला इजा झाली.त्यांच्यावर उपचार झाले आणि त्या घरी गेल्या.अशोकराव चव्हाण यांची मिरवणूक जुना मोंढा येथे सभा झाल्यावर जवळपास दुपारी 3 वाजता संपली.त्यानंतर रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी वजीराबाद पोलिस ठाण्यात मनपाचे सहाय्यक आयुक्त अविनाथ उमाकांत अटकोरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 55/2014 दाखल झाला.या तक्रारीत असे म्हटले आहे की,श्री.अशोकराव चव्हाण यांचे उमेदवारी निमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीत तीन ते चार अज्ञात इसमांनी सार्वजनिक ठिकाणी,निष्काळजीपणे नागरिकांना अपाय होईल अशा पद्धतीने फटाके वाजविले.त्या एक महिला जखमी झाली आहे.हा गुन्हा दाखल होवून तपास पोलिस उपनिरीक्षक तात्या भालेराव यांच्याकडे देण्यात आला. 

या गुन्ह्यात सर्वात मजेशीर बाब अशी आहे की,ज्या निर्मलाबाई कोटुरवार जखमी झाल्या आहेत त्यांचा जबाब सुद्धा प्रथम खबरी अहवालासोबत जोडण्यात आला आहे.त्यात निर्मलाबाई कोटुरवार आपल्याला झालेल्या जखमेबाबत कोणालाही दोषी मानत नाहीत.हा जबाब कोणी घेतला,कधी घेतला याची काहीच नोंद त्या जबाबावर नाही.27 मार्च रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत या गुन्ह्या संबंधाने विचारणा केली असता अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांनी सांगितले होते की,या प्रकरणातील आरोपींना शोधून आम्ही पकडू असे सांगण्यात आले होते.

त्यानुसार आज वजीराबाद पोलिसांनी अमोल केशव वाढवे,शेख सादुल्ला शेख अमीर आणि संतोष धोडींबा गाजेवार या तीन आरोपींना पकडले असून,या गुन्ह्यातील कलम 285,337 हे जामीनपात्र कलम असल्याने त्यांना जामीन पण देण्यात आला आहे.

या प्रकरणातील जमखी महिला तक्रार नाही असे म्हणत असतांना मनपाचे सहाय्यक आयुक्त खोटे ठरू नयेत म्हणूनच या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असावी अशी चर्चा होत आहे.अशोकराव चव्हाण यांच्या मिरवणुकीतील हा प्रकार कागदोपत्री आणून निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांच्या गळ्यात ही घंटा टाकून टाकली असे मानले जात आहे.

काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार

ताईंच्या आदेशाशिवाय घड्याळाचा गजर नाही....
काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार.. हिदायत खां पठाण

तामसा(देविदास स्वामी/अशोक गायकवाड)राष्ट्रवादीच्या नेत्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील यांचे आदेश येई पर्यंत हिंगोली लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवाराचा प्रचार करणार नाही असा स्पष्ट शब्दात नकार राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष हिदायत खां पठाण यांनी दिला. ते तामसा येथे आयोजित राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बैठकीत थेट उमेदवाराच्या समक्ष बोलत होते.

दि.२८ शुक्रवारी हदगाव तालुक्यातील तामसा येथील सरपंच प्रभाकर महाजन यांच्या निवासस्थानी हिंगोली लोकसभा निवडणूक २०१४ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राजीव सातव यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील, माजी सभापती बाळासाहेब कदम आदींसह अनेकांची उपस्थिती होती. या बैठकीत प्रचाराबाबत चर्चा सुरु असताना श्री पठाण म्हणाले कि, आ.जवळगावकर यांनी यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेवून त्यांना बरोबरीचा मान - सन्मान देवू असे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी निवडून आल्यानंतर आघाडीचा धर्म पाळला नाही. तसेच तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते बोटावर मोजण्याइतकेच आहेत असे वक्तव्य करून एक प्रकारे अवहेलना केली होती. मित्र पक्ष असलेल्या बुद्धिवान नेत्यांकडून मिळालेली वागणूक हि स्वतःचे अकलेचे तारे तोडणारी आहे. त्यामुळे पक्षाच्या पदाधीकार्यात व कार्यकर्त्यात नाराजीचा सूर आहे. आम्हीही मानेस आहोत, आम्हाला सुद्धा मान - सन्मान आहे. त्यामुळे आम्ही होऊ घातलेल्या हिंगोली लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराचा प्रचार करणार नाही जोपर्यंत आमच्या नेत्या सूर्यकांताताई आम्हाला आदेशित करणार नाहीत तोपर्यंत आम्ही व आमचा एकही कार्यकर्ता प्रचारात उतरणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष किशनराव पवूळ माजी जी.प.सदस्य शंकरराव गायकवाड, माजी सरपंच खंडेराव आगलावे, प्रभाकर महाजन, श्रीकांत मेहेत्रे, मुबीन खान पठाण, बालाजी जाधव, दत्ताराम माने, बापूराव घरके, संतोष पवार, आदींसह राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निवडणुकीतील उमेदवारांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता.

काँग्रेसला करावी लागणार कसरत

लोकसभा उमेदवाराची खर्या अर्थाने सध्या प्रचाराला सध्या तरी सुरुवात झाली नसली तरी, हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मनधरणी करण्यसाठी काँग्रेसच्या उमेदवाराची दमछाक होत असल्याचे चित्र यावरून तरी दिसून येत आहे. अश्या संधीचा फायदा घेण्यात शिवसेनेच्या उमेदवारच हातखंड असल्यामुळे काँग्रेसपक्षाला मोदीच्या वादळात हि निवडणूक जिंकण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

२७ मार्च, २०१४

३० रोजी मोदीची सभा

नांदेड लोकसभा महायुतीचे उमेदवारच्या प्रचारार्थ ३० रोजी मोदीची सभा

नांदेड(खास प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार तथा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची नांदेड येथे गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमवर ३० मार्च रोजी दुपारी १२ वाजता प्रचंड जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्र परिषदेत दिली.

नांदेड लोकसभा महायुतीचे उमेदवार डी.बी. पाटील, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुभाष वानखेडे, लातूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. गायकवाड , परभणीचे उमेदवार बंडू जाधव या चार महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची सभा नांदेड येथे आयोजित करण्यात आली असून या सभेसाठी किमान दोन ते अडिच लाख नागरिक उपस्थित राहतील अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीकडून बाळगली जात आहे. शहर व ग्रामीण मधून नागरिकांना या सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत असून घरपोच निमंत्रण पोहंचण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

शहरामधील विशिष्ट व अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी व्हीआयपी पासेस देण्यात आल्या असून त्यांना विशेष अतिथीकक्ष निर्माण करण्यात येणार आहे. मोदींची सभा यशस्वी व्हावी यासाठी १५ ते १६ विविध समित्या काम करत आहेत. २००९ मध्ये मोदींची सभा नांदेड जिल्ह्यात देगलूर येथे घेण्यात आली होती. त्यावेळीचे मोदी आजच्या मोंदीमध्ये जमिन आसमानचा फरक आहे. मोंदीबद्दल देशभरात गत पाच वर्षात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतातील कुठल्याही स्थळी त्याची सभा घेतल्यास प्रचंड जनसमुदाय उपस्थित राहत आहे. त्यामुळे विशेष व्यवस्था या सभेमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मोंदीच्या व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, खा. गोपीनाथ मुंडे, उमेदवार डी.बी.पाटील, सुभाष वानखेडे, बंडु जाधव, डॉ. सुनिल गायकवाड यांची उपस्थिती राहणार आहे. नांदेड जिल्ह्यात ४ ते ६ हजार विशेष निमंत्रण पत्रीका काढण्यात आल्या असून त्या घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ३० जानेवारी रोजी मोदींच्या तीन सभा होणार आहेत. अमरावती, अकोला, नांदेड त्यानंतर कर्नाटकमध्ये बेळगाव, बागलकोट या दोन ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होणार असल्याचे सांगितले.

बिहार मधील मोदींची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आहे. यावरुनच लक्षात येते की, त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्यामुळे असा प्रकार ते करत आहेत. या सभेवर हल्ला होणे म्हणजेच भाजपच्या यशाचे गमक असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. २००९ मध्ये मोदींची ज्यावेळी सभा झाली होती त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारास पराभव पत्करावा लागला परंतु यावेळी याच सभेमुळे ७५ हजाराने झालेला पराभव किमान लाखाच्या लिडने भरुन निघेल आणि भाजपचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेस प्रदेश सचिव सुरजितसिंघ ठाकूर, राम पाटील रातोळीकर, डॉ. अजित गोपछडे, प्रविण साले, व्यंकटेश साठे, देविदास राठोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

काँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

अज्ञात ३ ते ४ काँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)शहरात नामांकन अर्ज भरण्याच्या वेळी काही अतिउत्साही कांग्रेस कार्यकर्त्यांनी आवडत्या नेत्यांच्या मिरवणुकीत फटक्याची आतिषबाजी केल्याने एका महिला जखमी झाली, याबाबत मनापा आयुक्त यांच्या तक्रारीवरून ३ ते ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी दि.२६ रोजी हजारो कार्यकर्त्यांना घेवून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दुपारी ११.३० ते २.३० च्या सुमारास भव्य अशी मिरवणुकी काढण्यात अली होती. यावेळी कांग्रेसच्या काही अति उत्साही कार्यकर्त्यांनी निष्काळजी पणाने सार्वजनिक रस्त्यात ठीक ठिकाणी कुठेही फटाक्यांच्या लडी लावत होते. त्यात भोकर येथील महिला निर्मलाबाई नामदेवराव कोटूरवार रा.दिलीपसिंग कॉलनी, गोवर्धन घाट नांदेड यांच्या डोळ्यांना फटक्यांची उडालेली जळती कानडी लागून डोळ्याला इजा होऊन जखमी झाली. किती तरी वेळ ही मिरवणूक चालल्याने रहदारीला वारंवार अडथळे होत होते. त्यामुळे सामान्य नागरिकांना पोलीस अडवत असल्याने मुख्य रस्ता सोडून गल्लीबोळातून मार्ग काढावा लागत होता. परंतु तिथेसुद्धा गर्दी होत असल्याने सदर महिला हि रस्त्याने जात असताना फाटाक्याचा फटका त्यांना बसला होता. याबाबत मनपा आयुक्त अविनाश उमाकांत अटकोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलिस स्थानकात ३ ते ४ अज्ञात काँग्रेस कार्यकर्त्यांवर कलम २८५, ३३७ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्री भालेराव हे करीत आहेत.

२६ मार्च, २०१४

बोगस रस्त्याच्या कामाची चौकशी गुलदस्त्यात

आचारसंहितेला केराची टोपली दाखून शहरात विकासाची कामे सुरु...
बोगस रस्त्याच्या कामाची चौकशी गुलदस्त्यात....

हिमायतनगर(वार्ताहर)लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हिमायतनगर आचारसंहितेच्या नियमन बगल देत एका ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गुत्तेदाराणे निकृष्ठ तथा बोगस मटेरियल वापरून काम करीत असल्याची तक्रार याच भागातील काही नागरिकांनी गटविकास अधिकारी व ग्रामपंचायतीकडे केली होती. त्यावरून वृत्त प्रकाशित होताच गुत्तेदाराचे धाबे दणाणले असून, या कामाची चौकशी करण्याच्या सूचना संबंधिताना देण्यात आल्या आहेत. परंतु संबंधितानी त्या कामाची पाहणी जायमोक्यावर जाऊन न करताच कार्यवाही गुलदस्त्यात ठेवून बिल काढण्याचा खटाटोप सुरु केला आहे. या कामाची गुणनियंत्र मापक मशीनद्वारे चौकशी करून बोगस काम करणार्याची देयके थांबवावी अशी मागणी होत आहे.

हिमायतनगर ग्रामपंचायती अंतर्गत शहरात ०१ कोटी ०५ लक्ष रुपयाच्या निधीतून विविध वार्डात सिमेंट रस्ता व मजबुतीकरणाचे कामे निवडणुकीच्या धामधुमीत जोरात सुरु आहेत. सदरची कामे मिळविण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीत कार्यरत पांढर्या वेशातील गुत्तेदाराणी टक्केवारी देवून कामे पदरात पडून घेतली आहेत. त्यामुळे शासनाची लाखो रुपायची कामे हि अर्ध्या किमतीत करून रातोरात मालामाल होण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निकृष्ठ दर्जाच्या कामावरून दिसून येत आहे.

यापैकी पोलिस कॉलनी जी.प.शाळा ते जुनी जिनिंग फैक्टरी या ५ लक्ष रुपयाच्या रस्त्याच्या कामास ऐन आचारसंहितेच्या काळात सुरुवात करण्यात आली असून, या कामात विहिरीचा मुरुमाड हिरव्या रंगाचा दगड, निकृष्ठ दर्जाचे सिमेंट व माती मिश्रीत रेतीचा वापर, कुरिंग केली जात नाही. त्यावेळी येथील काही नागरिकांनी गुत्तेदारास निकृष्ठ साहित्य वापण्यास विरोध केला. सांगूनही ऐकत नसल्याने अखेर त्यांनी ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्याकडे रीताशीर तक्रार दिली. तरी सुद्धा संबंधितानी सदर गुत्तेदाराला अभय देवून काम पूर्णत्वास नेवून मार्च एंड पूर्वी बिल काढण्याचा प्रयत्न अभियांत्याशी मिलीभगत केली आहे. या बाबतचे वृत्त वर्तमान पत्रातून प्रकाशित होतच संबंधितांचे धाबे दणाणले असून, वरिष्ठांनी या कामची चौकशी करण्याच्या सूचना दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

याबाबत पंचायत समितीचे शाखा अभियंता बसीद आली यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले. कि, तक्रार कर्त्यांचा फोन आला होता, लवकरच जावून चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.

भीषण अपघात ...

नांदेड - किनवट राज्यरस्त्याच्या मसोबा नाल्यावर भीषण अपघात ...
गंभीर दोघांची मृत्यूशी झुंज....ऑटोचालक फरार हिमायतनगर(वार्ताहर)शहरापासून चार कि.मी. अंतरावर असलेल्या खडकी बा.फाट्यानजीकच्या मसोबा नाल्याजवळ दुचाकी व ऑटोचा भीषण अपघात होवून दोन जन गंभीर तर तीन जन किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवार दि.२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. 

बुधवारी हिमायतनगर येथील आठवडी बाजार असल्याने सोनारी फाट्यावरून - हिमायतनगर कडे भरधाव वेगात येणाऱ्या अवैध्य प्रवाशी वाहतुकीच्या विना क्रमांकाचा ऑटो व हिमायतनगरकडून - भोकरकडे जाणार्या दुचाकीक्रमांक ए.पी.१५ - ए.बी.७०५८ ची समोरासमोर जबर धडक बसली. या भीषण अपघातात सदर ऑटोमध्ये चालकाजवळ बसलेला करंजी येथील प्रवाशी भगवान यादवराव जाधव रा.करंजी हे जमिनीवर आपटून पडले. तर दुचाकी स्वार खंडू शिळबे वय ३६ वर्ष रा.लोखंडवाडी यास सुद्धा  जबरमार बसला. या घटनेत डांबरी रस्त्यावर पडलेल्या भगवान जाधव वय ५५ वर्ष या प्रवाश्यास जबर मार लागल्याने रक्तस्त्राव झाला. तर अज्ञात दुचाकीस्वार हि या घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याच्या चेहऱ्यास मार लागून भेग पडली होती. तातडीने रस्त्यावरून जाणार्या पत्रकार तथा काही नागरिकांनी अपघात ग्रस्तांना पोलिसांच्या मदतीने १०८ नंबरच्या रुग्ण वाहिकेतून येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.स्मिता पेडगावकर यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून दोघांना नांदेडला हलविले आहे. तर किरकोळ जखमी यांची मलम पट्टी करून घरी पाठविण्यात आले आहे. वृत्त लिहीपर्यंत दोघेही मृत्यूशी झुंज देत असल्याचे समजले.

अपघात स्थळी बघ्यांची गर्दी जमली होती, तर या भीषण अपघातामुळे राज्य रस्ता तासभर जाम झाला होता. घटनास्थळी अक्षरश्या रक्ताचा सडा पडल्याने अनेकांची मने हेलावून गेली होती. घटना घडताच सदर ऑटो चालकाने त्या ठिकाणाहून पलायन केले असून, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी बसवून वाहतूक केली जात असताना रस्त्यातील खड्डा चुकाविताने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्ष दर्शिनी सांगितले.     

२५ मार्च, २०१४

महीला सक्षमीकरण कागदोपत्रीच ?

पद महिलांचे कारभार पुरुषांचा ; महीला सक्षमीकरण कागदोपत्रीच ?

हिमायतनगर(अनिल मादसवार)हिमायतनगर तालुका अतिमागस असुन, या भागात सर्वच समाजातील लोक वास्तव्य करतांत त्यामुळे सध्य परिस्थीतील महीलांची संख्या राजकारणात वाढत असतांना तालुक्यातील अनेक पदावर महीला सदस्य व सरपंच, सदस्य काम पहातात. परंतु त्यांच्या भोळ्या स्वभाव व आडाणी पनाचा फायदा घेत काही नौरोबा व पुत्र स्वत:च काम पहात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पदभारी महीलांच्या बोगस स्वाक्षर्‍या करुन स्वत:मान मिळवीत असल्याचे चित्र दिसत आहे.यावरुन पद महीलांचे कारभार पुरुषांचा अशी अवस्था झाल्याचे दिसुन येत आहे. परिणामी शासनाचा महीला सक्षमीकरण उद्देश केवळ कागदावर पुर्ण होत आहे काय? असा सवाल सर्व सामान्य नागरीकांतुन समोर येत आहे.

हिमायतनगर तालुक्यात 52 ग्रामपंचायती असुन, 6 पंचायत समीतीचे गण तर 3 जिल्हा परिषदेचे गट आहेत. यामध्ये जवळपास 55 टक्के पदावर महीलांचे वर्चस्व आहे. परंतु महीलांनी फक्त चुल आणि मुल हीच कामे पहावयाची असतात असा समज आजही ग्रामीण भागातील पांढर्‍या पोषाखातील पुरुषांचा आहे. शासन विविध प्रकारातुन महीलांना प्रथम प्राधान्य व संधी मिळावी या उद्दात हेतुने महीला सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. तर आजघडीला विवध क्षेत्रात महीलांसाठी जागा आरक्षण करुन त्यांच्या हाती सत्ता दिली जात आहे. त्याचेच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी प्रतीभाताई पाटील ह्या महीलाच विराजमान झाल्या होत्या. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे आज देश- विदेशात महीलांची मान उंचावली आहे. हिमायतनगर तालुक्यातील राजकीय व सामाजीक क्षेत्रात ही महीलांची संख्या वाढली असून, सरपंच, उपसरपंच व ग्रा.प.सदस्य, तसेच पंचायत समीती व जिल्हा परिषद सदस्य पदीही महीलांचीच वर्णी लागलेली आहे. हिमायतनगर ,कामारी, सरसम बु, सावना ज, येथील प.स.व जी.प. पदे त्यांच्या हातात आहेत. मात्र ही सत्ता कागदोपत्रीच असुन, त्यांचे पतीराज व काही ठिकाणी पुत्रच चालऊन आपला रुबाब दाखवीत अधिकार गाजवीतांना दिसतात. कोनत्याही कामासाठी पदावर असलेल्या महीलांकडे जायचे असल्यास त्यांच्या पर्यंन्त लाभार्थी पोहोंचु शकत नाही त्याअगोदर त्यांचे पतीराज्यांच्याकडे जाऊनच आपले गार्‍हाने मांडावे लागत आहे. यामुळे सर्वसाधारण लाभार्थ्यांची पिळवणुक व महीला सक्षमीकरणावर गदा येत आहे. महीलांच्या पतीचा रोजेशाही थाट दिसु लागलस्याने प्रशासनाची यंत्रनाही चक्राऊन गेली आहे. पुर्वी शिक्षकांच्या बायकोला मास्तरीनबाई, डॉक्टराच्या बायकोला डॉक्टरीनबाई, म्हंटले जायचे मात्र आता नेमकी उलटी परिस्थीती निर्माण झाली असुन, पत्नीच्या पदाचा रुबाब पतीराज दाखवत असल्यामुळे त्यांना काय म्हणावे..? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. या बाबीची महिला आयोगाने दाखल घेवून महिलांचे हक्क हिराऊन घेऊ पाहणाऱ्या पतीराजांवर कार्यवाहीचा बडगा उगारावा अशी रास्त अपेक्षा महिला वर्गासह सामान्य जनतेतून होत आहे.

चव्हाणांना काँग्रेसची उमेदवारी

अशोक चव्हाणांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर

नवी दिल्ली(खास प्रतिनिधी)नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेड मधून उमेदवारी जाहीर करून काँग्रेस पक्ष श्रेष्टीने विरोधकांना मिरीन्डाचा झटका दिला आहे. उद्या अशोक चव्हाण हे हजारो कार्यकर्त्यांच्या शक्ती प्रदर्शनात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून नांदेडमधून कोणाला उमेदवारी द्यावी याची जोरदार चर्चा सुरू होती. पुण्यातून सुरेश कलमाडी यांचे तिकिट कापण्यात आल्याने अशोक चव्हाणांना उमेदवारी नाकारली जाईल अशी स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान विद्यमान खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी निवडणुकीतून माघार घेत अशोक चव्हाण यांच्यासाठी वाट मोकळी करून दिली होती. त्यानंतर नांदेड मधून अशोक चव्हाण किंवा त्यांच्या सुविद्ध पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. तर दि.२५ रोजी अमिता चव्हाण व डी.पी.सावंत यांच्या नवे नामांकन दाखल केले होते. त्यानंतर सायंकाळी पक्ष श्रेष्टीने सर्व संभ्रम दूर करत अखेर अशोक चव्हाण यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण हे पुनश्च राजकारणात सक्रिय होणार असून, या संधीचा फायदा ते कश्या पद्धतीने घेतील हे आगामी काळात दिसून येणार आहे.

पक्षश्रेष्टींचा निर्णय मान्य - चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)नांदेड लोकसभा मतदार संघातून अत्यंत निर्णायक क्षणी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्‍वास टाकला आणि उमेदवारी जाहीर केली. मतदारांच्या विश्‍वासावर आणि विकास कामाला प्राधान्य देत आपण मतदारां समोर सामोरे जाऊ अशी प्रतिक्रिया अशोकराव चव्हाण यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना व्यक्त केली. २५ वर्षापूर्वी आपण निवडणूक लढवली होती. आणि आमचे चव्हाण घराणे नेहमीच कॉंगेसशी एकनिष्ठ राहिले आहे. माझी उमेदवारी हा मी त्याचाच एक सन्मान मानतो असेही त्यांनी म्हटले आहे.त्यांच्या उमेदवारी मुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, अनेकांनी फाटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला आहे.

मुलीची छेड काढल्यावरून तणाव

मुलीची छेड काढल्यावरून तणाव..
दुचाकी जाळून संतप्त युवकांनी बाजारपेठ केली बंद


हदगाव(वार्ताहर)शिकवणी वर्गाहून गावाकडे परत जात असलेल्या एका शाळकरी मुलीची दोन मुस्लिम युवकांनी दुचाकीवरून येवून भररस्त्यात छेड काढल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला होता. यावरून छेड काढणाऱ्या त्या दोन टपोरींना येथील युवकांनी मुख्य बाजार पेठेत मारहाण करून दुचाकी पेटवून दिली. याघटनेमुळे हदगाव मध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मुलीची छेड काढल्यावरून तणाव निर्माण झाला होता. या दहशतीने सर्व बाजारपेठ बंद करण्यात आली होती.तणाव निवाळण्यासाठी हदगाव येथे उपविभागीय पोाीस अधिकारी दत्तात्र्य कांबळे यांनी येवून भेट देवून शांततेचे आवाहन केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हदगाव शहरात विविध महाविद्यालये, शिकवणी वर्ग असल्याने या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आस पासच्या खेडातील मुळे - मुली दररोज ये - जा करीत असतात. काही शिकवणी वर्ग हे सायंकाळी होत असल्याने या शिकवणी वर्गासाठी खेडातील मुालि मोठ्या प्रमाणात शहरात येतात. परंतु शिकवणी वर्गासाठी जातांना व येतांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. शिकवणी वर्गात जात असतांना या अगोदर सुद्धा अनेक मुलींची टवाळखोरी करणाऱ्या टपोरि मुलांनी छेड काढल्याच्या घटना घडल्या होत्या. परंतु त्यानंतरही येथील पोलिसांनी मुलींच्या सुरक्षेसाठी चिडीमार पथके काही दिवस ठेवून पुन्हा बंद केली.

त्याचाच फायदा घेत पुन्हा शहरात टवाळखोरी करणे व धूम स्टाईलने गाड्या पळविणारे सक्रिय झाले आहे. अशीच एक घटना आज डी.२५ मंगळवारी हदगाव शहरातील मुख्य बाजार पेठेत घडली. सायंकाळो शिकवणी वर्ग करुन गावाकडे जात असतांना मुख्य बाजारपेठेत असलेल्या हनुमान मंदिराच्या परिसरामये दुचाकीवर दोन मुस्लीम युवकांनी येऊन शाळकरी मुलीच्या समोर दुचाकी आडवी लावुन तीची छेड काढाली असता आजूबाजूला असलेल्या युवकांनी सदरील प्रकार आपल्या डोळ्याने पाहिल्याने त्यांचा राग अनावर झाला. आणि संतप्त युवकांनी दुचाकीवर आलेल्या सदरील मुस्लिम युवकास पकडुन पोलीस स्थानकात नेले. यावेळी त्यांच्यापैकी एक युवक पळुन जाण्याश यशस्वी झाला. त्यानंतर सदरील घटने बद्दल संतप्त युवकांनी दुचाकी जाळून हदगाव येथील बाजारपेठ बंद केली. या घटनेमुळे हदगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हि घटना शहरात वार्‍यासारखी पसरल्याने चौका - चौकात नागरीक या घटनेची चर्चा करू लागले होते.

शहरातील तणावपूर्ण वातावरण निवळण्यासाठी उपविभागीय पोलिस आधीकारी सिद्धार्थ कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. वृत्त लीहीपर्यंत हदगाव पोलिस स्थानकात कोणत्याही प्रकाराचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

मुलीची साक्ष महत्वपूर्ण

विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी नवऱ्याला 5 वर्ष सक्तमजुरी
स्वत:च्या मुलीची साक्ष महत्वपूर्ण ठरली

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)लग्नानंतर 3 अपत्य असणाऱ्या विवाहितेने केलेल्या आत्महत्येप्रकरणी तिच्या नवऱ्यास येथील तिसरे जिल्हा न्यायाधीश आनंद यावलकर यांनी 5 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रूपये रोख दंड ठोठावला आहे.

दि.14 मार्च 2012 रोजी मध्यरात्री नांदेड-लातूर रस्त्यावरील नवीन पुलावरून उडी मारून एका 35 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली.तिचे नाव आशा रोहिदास चित्ते असे होते.ती बळीरामपूर येथील राहणारी होती.15 मार्च 2012 रोजी तिचे वडील सेवानिवृत्त वाहन नागोराव मल्हारी भुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आशाचे लग्न 1995 मध्ये रोहिदाससोबत झाले होते.लग्नानंतर सिमा,आकाश व विकास अशी तीन अपत्ये झाली.नवरा रोहिदास नेहमीच त्रास देत असे.अनेक वेळेस अनेक नातलगांनी समजावून सुद्धा रोहिदासच्या वागण्यात फरक पडत नव्हता.आशा सुद्धा आपला संसार गाढा चालवत असतांना अनेक गोष्टींना दुर्लक्षित करत होती.

दरम्यान रोहिदासने आपली बहीण प्रयागबाई मनोहर गायकवाड यांच्याकडून बांधकामासाठी घेतलेले 13 हजार रूपये आशाच्या वडिलांनी परत करावेत अशी रोहिदासची इच्छा होती.आशाचे वडील नागोराव भुरे यांनी आशाच्या हाताने ते 13 हजार रूपये प्रयागबाईला देण्यास लावले.त्यानंतर एकदा मनोहर गायकवाडने 6 हजार रूपये आशाने प्रयागबाईला दिल्याचे रोहिदासला सांगितले.त्यावरून घरात भांडण सुरू झाले आणि रोहिदास आशाला मारहाण करू लागला.14 मार्च 2012 रोजी पैसे दिल्याबाबत खोटे खरे करण्यासाठी आशा प्रयागबाईच्या घरी गेली पण ती तिला भेटली नाही.ती परत बळीरामपूरकडे येत असतांना तिने या जाचाला कंटाळून नवीन पुलावरून उडी घेवून आत्महत्या केली.

नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात याप्रकरणी रोहिदास जळबाजी चित्ते (45),नारायण जळबाजी चित्ते (50) आणि प्रयागबाई मनोहर गायकवाड (60) या तिघांविरूद्ध भादंविच्या कलम 306,34 नुसार गुन्हा दाखल झाला आणि पोलिस उपनिरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी तिघांविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.न्यायालयात या प्रकरणी 6 साक्षीदार तपासण्यात आले.सर्वात महत्वपूर्ण साक्ष आशा व रोहिदासची मुलगी सिमा हिची ठरली.तिने 14 मार्च 2012 रोजी घडलेला मारहाणीचा प्रकार न्यायालयाच्या समक्ष कथन केला.

उपलब्ध पुराव्या आधारे न्यायाधीश यावलकर यांनी या प्रकरणातील आशाचा नवरा रोहिदास चित्ते याला 5 वर्ष सक्तमजुरी व 5 हजार रूपये रोख दंड ठोठावला आहे.दंडाची 5 हजार रूपये रक्कम भरली तर मयत आशाचे वडील नागोराव भुरे यांना देण्यात यावी असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ऍड.डी.जी.शिंदे यांनी मांडली.

अमिता चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज

नांदेड मधून सौ.अमिता चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल...

नांदेड(प्रतिनिधी)काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण..? याकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या असताना दि.२५ मंगळवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सुविध्या पत्नी सौ. अमिता अशोक चव्हाण यांनी नांदेड मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या बरोबर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री डी. पी. सावंत यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नांदेडमधला काँग्रेसचा उमेदवार अजून जाहीर झाला नसल्याने काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीचा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत कोणच्या उमेदवारी अर्जाला काँग्रेस पक्षाचा बी फॉर्म लावला जाणार याची उत्सुकता

मागील अनेक दिवसापासून नांदेड मधील काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण..? या घोषणेकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत. लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या बुधवार दि.२६ दुपार पर्यंतची अंतिम वेळ दिलेली आहे, तरी सुद्धा नांदेड मधून काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण हे जाहीर झाला नसल्याने उमेदवाराचे नाव अजूनतरी गुलदस्त्यात आहे. परंतु ऐन वेळेला पक्षाच्या हायकमांड कडून उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज पत्नी अमिता चव्हाण आणि पालकमंत्री डी.पी. सावंत यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. यापैकी काँग्रेस पक्षातील उमेदवारी कोणाला दिली जाईल हे अजूनही कोड्यात ठेवण्यात आले आहे. उद्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणच्या उमेदवारी अर्जाला काँग्रेस पक्षाचा बी फॉर्म लावला जाणार याची उत्सुकता पक्ष कार्यकर्त्याबरोबर आता मतदारांना सुद्धा आहे. वरील दोघांची उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सुद्धा शेवटच्या क्षणी अशोक चव्हाण उमेदवारी दाखल करू शकतात अशी चर्चा सुरु आहे.

शेतकरी आत्महत्या

नापिकी - कर्जबाजारीला कंटाळून हिमायतनगरात आणखी एका शेतकरयाची आत्महत्याहिमायतनगर(अनिल मादसवार)सततची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून शहरातील एका ३५ वर्षीय युवा शेतकर्याने विषारी औषध प्राषण करून आत्महत्या केल्याची घटना दि.२४ सोमवारी रात्री घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांवर डोंगर कोसळला असून, त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

शहरातील बजरंग चौक परिसरात राहणारा मयत शेतकरी गणेश शंकरराव कदम(कोरडे) वय वर्ष ३५ याने बैन्केचे कर्ज कडून खरीप हंगामात पेरणी केली होती. परंतु जुलै - ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सर्वच पिके उध्वस्त झाली. परंतु शासनाची तुटपुंजी मदत शेतकर्याचे नुकसान भरून काढू शकली नाही. खरीपातील झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून काढण्यासाठी सदर शेतकर्याने गहू, हरभऱ्याची पेरणी केली होती. परंतु काढणीला आलेली पिके हाती येण्यापुर्वीच वादळी वारे व गारपिटीने सर्व पिके आडवी झाली. पावसाने भिजलेली पिके पूर्णतः काळी पडून कोम्बे फुटल्याने पेरणीसाठी केलेला खर्च सुद्धा निघाला नाही. तेंव्हापासून तरुण शेतकरी आर्थिक विवंचनेत होता. आगमी काळातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च, गरजा कश्या भागवायच्या व खाजगी बैन्केचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत होता. अखेर सोमवारी संध्याकाळी बजरंग चौकातील राहत्या घरी कोणते तरी विषारी औषध प्राषण केले. हि बाब घरच्यांच्या लक्षात येताच तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु परिस्थिती गंभीर बनल्याने नांदेड येथील गुरु - गोविंदसिंग रुग्णालयात भरती करण्यात आले होते, येथे उपचार सुरु असताना सोमवारी रात्री तरुण शेतकर्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून, त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे त्यांच्या पत्नीला मानसिक धक्का बसला असून, उपचारासाठी त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात भारती करण्यात आले आहे. 

मंगळवारी दुपारी १ वाजता शहरातील हिंदू स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी शहरासह तालुका परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. या घटनेतून सावरण्यासाठी शासनाने तातडीने शेतकऱ्याच्या कुटुंबास आर्थिक मदतीचा हाथभार लावावा अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

२४ मार्च, २०१४

बोगस बिले उचलण्यासाठीचे प्रयत्न

मार्च अखेर बोगस बिले उचलण्यासाठीचे प्रयत्न सुरु...चौकशीची मागणी

हिमायतनगर(अनिल मादसवार)हिमायतनगर तालुका अतिमागास तालुका म्हणुन सर्वदुर परिचीत आहे.या भागातील उत्तरेस अदिवासी बहुल भाग असल्याने 75 टक्के जनता अशीक्षीत आहे तर पुर्व, पश्‍चीम, दक्षीण भागातही आर्ध्याच्या वर अशीक्षीत लोकांची वस्ती आहे.या सर्व गावामध्ये शासनाच्या वतीने विविध योजनेच्या माध्यमातुन गाव विकास, लोकसहभागातुन करण्यात आलेल्या पाणीटंचाई विहीरी, तसेच मानव विकास मिशअंतर्गतचे करण्यात आलेले बंधारे, सिमेंट रस्ते, अंगणवाडी, किचन शेड, शाळाखोली बांधकाम आदींसह अनेक कामे पुर्ण झाल्याचे दाखऊन बोगस बिले काढली जात आहेत की काय? असा सवाल विकास प्रेमी जनतेतुन केला जात आहे. कारण सध्य स्थितीत पंचायत समीतीसह जिल्हा परीषद बांधकाम विभागातील अभीयंत्यांच्या मागे गुत्तेदार दिसत असुन, टक्केवारी घेऊन बोगस बीले काढली जाण्याची शक्यता वर्तवीली जात आहे. तेंव्हा अशा पध्दतीने काढन्यात येत असलेल्या बीलाच्या कामाची गुननियंत्रन मपक मशीनव्दारे चौकशी करुन खर्‍या अर्थाने पुर्ण झालेल्या कामाची बीले काढण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांतुन जोर धरत आहे.

हिमायतनगर तालुक्यात मानव विकास मिशनमधुन पाणी आडवा - पाणी जिरवा हा उद्दात हेतु ठेऊन तालुक्यात सिमेंट बंधारे,नाला सरळीकरण, अंगण्ावाडी इमारत, उपआरोग्य केंद्राची दुरुस्ती, जिल्हा परीषद अंतर्गत दलीत वस्तीतील सिमेंट रस्ते, नाली बंाधकांम, शाळा खोली बांधकाम आदिंसह अन्य कामे करण्यात आली. यामधील अनेक कामे हालक्या प्रतीचे करन्याच्या उद्देशाने लोकल कंपनीचे 32 ग्रेडचे सिमेंट, मातीमीश्रीत नाल्याची रेती,तसेच क्युरींगसाठी पाण्याचा कमी वापर यामुळे जवळपास 70 टक्के कामे निकृष्ट व हलक्या दर्जाची झाली आहेत. ही संबंधीत अभीयंता व गुत्तेदार, ग्रामसेवक, सरपंच यांनी संगनमत करुन बोगस पध्दतीने केली अहेत.त्यामुळे सध्य परिस्थीतीत यातील अनेक बंधारे फुटली, इमारतींना भेगा पडल्या, तर पावसच्या पाण्याने नाले पुन्हा भऱल्या गेल्याचे चित्र प्रथ्यक्ष कामावर दिसते. यावरुन संबंधीतांनी केलेल्या कामाचा दर्जा व निकृष्टपना स्पष्ट दिसुन येतो. तसेच काही गावातील स्वजलधारा योजनेच्या विहीरी, ग्रामसडक योजनेचा रस्ता, पांदण रस्ते आदिंसह इतर कामे पंचायत समीती अंतर्गत करण्यात आलेली सर्व कामाची वाट लाऊन अनेकांनी आपलीच तुबंडी भरण्याचा सपाटा लावला होता. हि सत्य परिस्थीती असतांना न झालेल्या कामाचीही बिले काढली जात असल्याचे अधिकार्‍यांच्या मागे फिरत असलेल्या पॉंढर्‍या कपड्यातील गुत्तेदाराच्या वृत्तीवरुन दिसुन येत आहे. तर जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असलेली पंतप्रधान सडक योजनेची, आणि अदिवासी गावांना मुख्य रस्त्यावर जोडणारी रस्त्याची झालेली व सुरु असलेली कामे पुर्णताह बोगस झली असुन, महीन्यापुर्वीच्या केलेल्या कामावर मोठ - मोठे खे पडल्याचे दिसुन येत आहे.

काही अधिकारी पदाधीकारी तर आठवडी बाजाराच्या दिवशी सुध्दा आपल्या कार्यालयीन वेळेत खुर्चीवर न दिसता घरी बसुन मार्च अखेरची कामे पुर्ण करत असल्याचे विश्वसणीय वृत्त एक कर्मचा-यांनी नाव न छपन्याच्या अटिवर गोदतीरशी बांलतांना दिली आहे.तसेच शेतकर्‍यांच्या शेतमालाचा जाहीर लिलाव करुन बिट पध्दतीने मालांची खरेदी झाली नसल्यामुळे स्थानीक व्यापार्‍यानी शेतकर्‍यांची पिळवणुक करुन शेतीमाल मनमानी भावाने ख्ारेदी केला.परंतु या खरेदीवरील कर कृषी उत्पन्न बाजार समीतीने पुर्णपने वसुल केला की नाही..? याबाबत शंका व्यक्त होत आहे.मोठया व्यवहारातुन व्यापार्‍याकडुन आकारण्यात येणारी कर वसुली मोठ्या प्रमाणात झाली काय?याचा आढावा मार्च अखेर दाखवीण्यात यावा अशी मागणीही शेतकरी वर्गातुन जोर धरत आहे.तेंव्हा या वर्षी काढन्यात येत असलेली बीले व खर्चाचा आढावा कामाची योग्य ती चौकशी करुनच काढन्यात यावी.अशी मागणी विकास व लाभापासुन वंचीत असलेल्या लाभार्थी, शेतकरी व गावकर्‍यांमधुन समोर आली आहे.

आहो आश्चर्यम

आहो आश्चर्यम आडीच महीन्याचे शेळीचे पिलु देतेय दिड ग्लास दुध

मनाठा(विजय वाठोरे)आहो आश्चर्यम आडीच महीन्याचे शेळीचे पिलु चक्क दिड ग्लास दुध देत आहे. हि घटना हदगाव तालुक्यातील मनाठा येथील एका शेतकर्याच्या घरी उघडकीस आली आहे.

हदगांव तालुक्यातील मनाठा येथील शेतकरी बाबुभाई भांडेवाले यांच्याकडे अडीच महीन्यापूर्वी बकरीनेे एका पील्याला जन्म दिला बरेच दिवस त्या पिल्याच्या जांगेत लहाण पणापासुन एकप्रकारचा गडउा असल्याचे बाबुभाई भांडेवाले यांच्या लक्षात आले. हा प्रकार काय ..? हे पाहन्यासाठी भांडेवाले याने पील्याला पकडुन आपल्या जवळ घेतले. बघतो तर काय ..! त्या पील्याच्या दुग्धग्रंथी मधे दुध साठलेले दिसून आले. त्याने दुधाची धार ग्लासमधे मारायला सुरवात केली बघता बघता ग्लासभर दुध काढले हा काय प्रकार आहे. कोनाच्याही लक्षात येत नव्हता.
जन्मताच शेळीचे पीलु दुध देते. अजब दुनीया दुनीया बदल गयी ज्याच्या त्याच्या तोंडून असे वाक्ये ऐकीवास एवू लागली आहेत. हि वार्ता सर्वत्र पसरली असून, सर्वांनी एकमेकात सांगायला सुरवात केली, त्यानंतर बघ्याची संख्या दिवसेनदिवस वाढायला लागली आहे. अडीच महीन्याचे पीलु दुध देते हि वार्ता वा-या सारखी गावभर पसरली.

याबाबत पशुवैधकीय अधिकारी डॉ.एस.जी.सोनारीकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्या कडुन कळाले की जन्मताच अधीक हार्मोन्स आसल्यामुळे अश्या प्रकारची परीस्थीती निर्माण होत असते. निसर्गाच्या लिला आपण अनेकांनी पाहील्यात गायीच्या पाठीवरती दोन पाय, म्हशीला दोन तोंड, दोन षरीर एकत्र असलेले बरेचषे उदाहरन आपल्या समोर आहेत त्यातलाच हा प्रकार असल्याचे त्यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सागींतले.

कामगाराचा गुदमरून मृत्यू

शौचालयाचे टैन्क सफाई करणाऱ्या कामगाराचा गुदमरून मृत्यू


हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील मौजे पोटा बु. येथील एका शौचालयाचे टैन्क सफाई करण्यासाठी उतरलेल्या एका कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला तर एक जन गंभीर झाल्याची घटना दि.२४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील मौजे पोटा बु.येथील एका नागरिकाच्या घरातील शौचालायचे टैन्क सफाईची ठेका आंध्रप्रदेशातील भंगी समाजच्या दोघांनी घेतला होता. नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजल्यापासून त्या दोघांनी कामास सुरुवात केली. सफाईचे काम सुरु असताना दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घाण बाहेर काढताना मयत व्यंकटी नर्सिमुलु जगवंदम वय ३० वर्ष रा.व्यंकटपती नगर, मंडल मनगुरु जी.खम्मम आंध्रप्रदेश हा पाय घसरल्याने शौचालयाच्या टैन्कमध्ये पडला. हि बाब त्याचा साथीदारास समजताच त्याने टैन्कमध्ये पडलेल्यास काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो टैन्कमढील गाळात फासल्याने त्यासा बाहेर काढताना हा सुद्धा त्यात अडकला. या घटनेत सुरुवातीला आत पडलेल्या व्यंकटी याचा शौचालयाच्या टैन्कच्या दुर्गंधीमुळे गुदमरून जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या साथीदारास दुर्गंधीयुक्त वासने श्वास घेणे अवघड बनले. हि बाब लक्षात येताच पोटा बु. येथील नागरिकांनी दुसऱ्यास तातडीने उपचारासाठी भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याची स्थिती गंभीर असल्याने तेथून नांदेडला रेफर करण्यात आले असून, तो सुद्धा मृत्यूशी झुंज देत असल्याचे समजते. वृत्त लिहीपर्यंत दुसर्या गंभीर युवकाचे नाव समजू शकलेनही. याबाबत पोटा बु.येथील पोलिस पाटील नंदकिशोर आराध्ये यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस डायरीत आकस्मिक मृत्यू कलम १७४ सी.आर.पी.सी.अनुसार नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कदम हे करीत आहेत.

डी.बी.पाटील यांची उमेदवारी दाखल

हजारो समर्थकांच्या साक्षीने महायुतीचे उमेदवार डी.बी.पाटील यांची उमेदवारी दाखल


नांदेड(अनिल मादसवार)प्रचंड घोषणाबाजी, ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून हजारो समर्थकांच्या साक्षीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डी.बी.पाटील यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी जुना मोंढा येथे झालेल्या सभेत नांदेड लोकसभा मतदारसंघात कमळ ङ्गुलविण्याचा निर्धार करण्यात आला.

उमेदवारी मिळाल्यानंतर डी.बी.पाटील यांनी जिल्हाभरात दौरे सुरु करून झंझावती प्रचार दौरा सुरु केला. गारपीटग्रस्त भागात दौरे करून त्यांनी शेतकर्‍यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात मोदी लाट असल्यामुळे यावेळी नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपाचे कमळ ङ्गुलणार या विश्वासाने त्यांनी लोकसभेची उमेदवारी दाखल केली. सोमवारी सकाळपासूनच अनेक वाहनांतून जुना मोंढा येथे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची गर्दी जमू लागली. तेथे झालेल्या सभेत नांदेड नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी व देशाच्या विकासासाठी विजयी करण्याचे आवाहन अनेक नेत्यांनी केले. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत अनेक नेत्यांनी मार्गदर्सन केल्यानंतरभारतीय जनता पार्टींचे नांदेड प्रभारी तथा प्रदेश चिटणीस विजय गव्हाणे यांच्या विशेष उपस्थितीत भव्य मिरवणुकीद्वारे डी.बी.पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यावेळी कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह जाणवत होता. भगव्या टोप्या, भगवे रुमाल परिधान करून असंख्य कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे परिसर दुमदुमन गेला होता. शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आल्यामुळे जिल्ह्यात एकसंघ भाजपा असल्याचे वातावरण निर्माण झाले होते. सर्वच नेते व पदाधिकारी एकत्र आल्यामुळे उमेदवार डी.बी.पाटील यांच्या चेहर्‍यावरील उत्साह द्विगुणीत झाला होता. यावेळी रामपाटील रातोळीकर, डॉ. धनाजीराव देशमुख, माजी आ. अनुसयाताई खेडकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हेमंत पाटील, प्रकाश कौडगे, चैतन्य देशमुख, महेश उर्ङ्ग बाळू खोमणे, प्रविण साले, विजय सोनवणे, गौतमकाळे, शिवाजी भालेराव, प्रल्हाद इंगोले, गोविंदराव सुरनर, रामचंद्र येईलवाड,श्रावण पाटील भिलवंडे यांच्यासह महायुतीचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

२३ मार्च, २०१४

९ लाखाची बेहिशोबी मालमत्ता पकडली

हदगाव येथे वेगवेगळ्या घटनेत ९ लाखाची बेहिशोबी मालमत्ता पकडली

हदगाव(वार्ताहर)लोकसभेची रणधुमाळी सुरु असून, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक आयोगाने प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिस अधीक्षक यांनी चेक नाका उभारला आहे. या नाक्यावरून दोन वेगवेगळ्या घटनेत कार मधून ९ लाखाची रोख रक्कम घेवून जात असताना दि.२२ च्या रात्री उमरखेड फाटा येथे पकडण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, दि.२२ मार्च च्या रात्रीला १०.३०च्य सुमारास नांदेडहून उमखेडकडे लाल रंगाची हुंडाई कार एम.एच.२९-ए.डी.३००८ हि उमरखेड ती पोईंट या चेक नाक्यावर थांबविण्यात आली. कारची चेकिंग करताना यामध्ये २ लाख ७० हजार अशी नगदी रक्कम डीक्कीमध्ये काळ्या रंगाच्या बैगमध्ये आढळून आली. या बेहीधोबी रक्कमेची सविस्तर चौकशी केली असता सदरील रक्कम यवतमाळ अर्बन को-ओप.बैंक लि.गंगाखेड येथून आणल्याचे साग्न्यात आले. परंतु या व्यवहाराचे बैन्केने कोणतेही कागद पत्रे सादर केले नाही. सादर रक्कमे बाबत अधिक विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतेही ठोस पुरावे मिळत नसल्याने सादर रक्कमे बाबत संशय निर्माण झाला. त्यातच आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केल्यचे निष्पन्न झाले. या कारणावरून हदगाव येथील नायब तहसीलदार वसंतराव माणिकराव नरवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बळीराम चव्हाण, संतोष राठोड, निरंजन चव्हाण, सर्व रा.जमुनातंडा ता.उमरखेड जी.यवतमाळ तसेच अमोल शंकर जगताप रा.फैट्री पुसद रोड उमरखेड व चालक परमेश्वर दारूसिंग चव्हाण रा.जवाहर वर्द उमरखेड यांच्या वर मुंबई पोलिस एक्त नुसार कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येउन त्यांना अटक केली आहे.

तर दुसर्या घटनेत याच ठिकाणी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास व्हिस्टा कंपनीची संशयित कार क्रमांक एम.एच.२९- ए.डी.१५९९ थांबविण्यात आली. या कारची झडती घेतली असता कारच्या डिक्की मध्ये करड्या रंगाच्या कापडाच्या बैगमध्ये नगदी ६ लाख ६८ हजाराची रक्कम आढळून आली. विचारपूस कसली असता सदरील रक्कम आनंद ट्रेडिंग कंपनी नांदेड येथून गहू विक्री करून आणल्याचे सांगण्यात आले. परंतु त्या बाबतची कागदपत्रे सादर केली नसल्याने रक्कमेवर संशय घेवून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी फिर्यादी साहेबराव गंगाराम वानखेडे विस्तार अधिकारी(कृषी) प.स.हदगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अनुप अनिल मामीडवार, चालक गौसखां बिस्मिल्लाखां पठाण दोघे रा. ढाणकि, ता.उमरखेड, जी.यवतमाळ यांच्यावर हदगाव पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हि कार्यवाही पोलिस अधीक्षक परमजीतसिंह दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील, पंचायत समिती व पोलिस प्रशासन विभागाचे पोलिस निरीक्षक अरुण बसते, जोंधळे, धोंडू गिरी, गायकवाड, खुपसे, गिरबिडे, कांबळे, शिंगणकर, शीतले, जुडे यांनी केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना लुभाविण्यासाठी पैश्याचा पुरवठा केला जात होता काय..? अशी शंका आम नागरीकातून उपस्थित केली जात आहे.

धाडसी दरोडा..

हिमायतनगर शहरात धाडसी दरोडा.. 
१० लाखाच्या सोन्या - चांदीचा ऐवज लंपास  हिमायतनगर(अनिल मादसवार)पोलिस स्थानकापासून ३०० मीटर अंतरावर असलेल्या एका भाजपच्या नेत्याच्या घराचे कुलूप तोडून तब्बल १० लाखाच्या सोन्या - चांदीचा ऐवज लंपास केल्याची घटना दि.२२ शनिवारच्या मध्यरात्री घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, सामान्य नागरिकांत सुरक्षेची चिंता वाढली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाहणी करून ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. सायंकाळी भोकरचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ कांबळे यांनी भेट देवून पाहणी केली. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शहरातील भाजपचे कार्यकर्ते राजीव उर्फ व्यंकटेश बंडेवार हे दि.२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता नांदेड येथे शिक्षणसाठी राहणाऱ्या मुला - मुलीना भेटण्यासाठी घराला कुलूप लाऊन गेले होते. यच संधीचा फायदा घेवून शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच घरातील बेडरूमला लावलेले कुलूप लोखंडी रोड व स्क्रू ड्रायवरच्या सहाय्याने तोडून आतमधील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडले. त्यातील लोकर मध्ये असलेले सोन्या - चांदीचे दाग - दागिने व नगदी रक्कम लंपास केली. एवढेच नव्हे देवघरातील आल्मारीची तोड फोड करून समान असता व्यस्त फेकून दिले. त्या कपाटातील चिल्लर दागिने व नगदी रक्कम कडून घेवून चोरट्यांनी हात साफ केला. तसेच घरफोडीसाठी वापरण्यात आलेले साहित्य त्याच ठिकाणी ठेवून चोरट्यांनी पलायन केले आहे. 

दुसर्या दिवशी बंडेवार नांदेडहून परत आले, दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घरी गेले असता दर उघडे दिसले, आत पाहताच बेडरूम व देवघरातील अलमारीची तोड फोड झालेली व त्यातील लोकर रिकामे  आढळून आले. हि सर्व प्रकार त्यांनी पोलीस्ना सांगितला. घटना स्थळावर पोलिस निरीक्षक सुरेंद्र  सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील चव्हाण, पोलिस जामदार अप्पाराव राठोड यांनी घटन्साठ्ली भेट देवून पाहणी केली. तसेच चोरीचा तपासाची चक्रे गतीने फिरविण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. सायंकाळी उशिरा श्वान पथक शहरात दाखल झाले असून, या ठिकाणी असलेल्या साहित्याच्या वासावरून घराच्या अस पास फिरून शेजारच्या पडक्या घरातून चोरटे फिरल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर शहरातील बाजारपेठ, बसस्थानक व अन्य गल्ली बोळात फिरविले. शेवटी शहराबाहेर माग काढला, आणि मुख्य रस्त्याच्या ठिकाणी जाऊन श्वान थांबल्याने चोरटे कोण्यातरी अज्ञात वाहनाने पसार झाल्याचे संकेत दिले आहे.

घटनेच्या पंचनाम्यात घरातील कपाट असलेले एक किलो चांदी ४० हजार, २० ग्रेम सोन्याचे पेंड ५४ हजार रुपये,  ४० ग्रेम सोन्याची दोन चैन ८० हजार रुपये, ६० ग्रेम सोन्याचे गंठन ०१ लाख २० हजार रुपये,  १२० ग्रेम सोन्याच्या पाटल्या व बांगड्या ०२ लाख ४० हजार रुपये, ४० ग्रेम सोन्याचा राणी हार ८० हजार रुपये, ३० ग्रेम सोन्याचे नेकलेस ६० हजार रुपये व २० हजार नगदी रक्कम असा एकूण ७ लाख ९४ हजाराचा जुन्या किमतीनुसार सोन्या - चांदीचा ऐवज लंपास केल्याचा पंचनामा पोलिसांनी केला आहे. तर सध्याच्या बाजारातील किमतीनुसार जवळपास १० लाखावून अधिकचा दरोडा चोरट्यांनी टाकल्याचे दिसून येते. या चोरीच्या घटनेमुळे शहर व परिसरात एकच खळबळ उडाली असून, शहरात पुन्हा चोरट्यांची टोळी सक्रिय झाली कि काय..? अशी शंका नागरीकातून व्यक्त केली जात आहे. घटनेचे वृत्त लिहीपर्यंत अज्ञात चोरट्यांनी केलेल्या चोरीच्या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

पोलिस गस्तीच्या कमतरतेमुळे चोरट्यांचे फावले..? 

मागील काही महिन्यापासून चोरीच्या घटना थांबल्यामुळे पोलिसांच्या गस्तीत कमतरता आल्याचे  दिसून येत आहे. तर सकाळच्या रामप्रहरी यच पोलिसांची गाडी बेधुंद वेगात रेल्वे स्थानक ते शहर अशी पळविली जात आहे. रात्रीला गस्तीच्या कमतरतेचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून १० लाखाचा हा धाडसी दरोडा टाकल्याची चर्चा घटनास्थळावर उपस्थित नागरिकांच्या तोंडून समोर आली आहे. 

मागील वर्षात चिट्ठी करणे केले होते नागरिकांना हैराण

मागील दोन वर्ष सतत एका चिट्ठी चोरट्याने शहरवासियांना हैराण करून सोडले होते, तर त्या चोरट्याच्या पाळतीवर असलेल्या पोलिसांना सदर चोरट्याने आव्हान देवून एकाच दिवसही तीन ते चार ठिकाणी चोऱ्या केल्या. त्यास जेरबंद करण्यासठी तीन वेळा श्वान पथकाला पाचारण केले. तर दोन वेळा त्यास पकडताना चोर - पोलिसांचा पळा - पळीचा खेळ खेळून जेरीस आणले. परंतु अद्याप त्या चिट्ठी चोरट्याचा पत्ता हिमायतनगर येथील पोलिस लाउ शकली नाही. त्यामुळे आज घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेचा तपास हिमायतनगर येथील पोलिस लावेल काय..? असा प्रश्न नागरीकातून विचारला जात आहे.      

सागवान तस्करांचे " जंगल में मंगल "

वनविभाग अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाने सागवान तस्करांचे " जंगल में मंगल "   हिमायतनगर(अनिल मादसवार)अंतरराष्टीय(जागतिक)वनदिनानिमित वृक्ष लागवड करून झाडे लावा - झाडे जगवाचा संदेश वनक्षेत्र कार्यालयाच्या वतीने जिल्हाभरात दिला जात आहे. परंतु हिमायतनगर येथील प्रभारी वन अधिकार्यांनी केवळ चार माणसाना सोबत घेवून छायचित्र काढून वनदिन साजरा केल्याचे दाखविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांच्या या प्रकारामुळे ज्या भागात वनदिन साजरा झाल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला, चक्क त्याच वनविभाग अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाने सागवान तस्करांचे " जंगल में मंगल " होत असल्याने वृक्ष तोडीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे सर्वत्र जागतिक तापमान वाढत असल्याचे संकट उभे असताना, दुसरीकडे मात्र लाकूड तस्करामुळे जंगल भुई सपाट होण्याच्या मार्गावर आहे. तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी पी.बी.ठाकूरवार यांच्या काळात हिमायतनगर वनपरिक्षेत्रात वृक्ष लागवड करून, वृक्ष जोपासना करीत वृक्ष तोडीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात होते. त्यामुळे गत दोन वर्षात हिमायतनगर तालुक्यातून सागवान, गहरी, धावंडा, बारतोंडी, खैर, मोहफुल या झाडांच्या कत्तलीवर विशेष नियंत्रण ठेवून वनपरिक्षेत्र वाढविण्यावर भर दिला होता. तसेच उन्हाळ्यात वन्य प्राण्यांच्या सोयीसाठी पाणवठे तयार करून तहान भाग्विलीहोती. यामुळे ऐन उन्हाळ्यात सुद्धा जंगल परिसर हिरवागार दिसत असल्याने मानवी वस्तीकडे येणाऱ्या प्राण्यांची संख्या कमी झाली होती. या भागाची नागपूर येथील अप्पर प्रधान वनसंरक्षक श्री सर्वेशकुमार व मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) औरंगाबाद येथील श्री मेई पोक्कीम अय्यर, नांदेड वनविभागाचे जिल्हा उपवनसंरक्षक जी.पी.गरड, सहाय्यक वनसंरक्षक(तेंदू) नांदेड येथील बी.एस.घवले यांच्यासह त्यांच्या शिष्टमंडळाने पाहणी करून हिमायतनगर तालुक्यातील वनपरीक्षेत्राला भेट देऊन वनविभागाचे मुक्त कंठाने कौतुक केले होते. परंतु त्यांच्या बदलीनंतर या वनपरीक्षेत्राची वाताहत झाली आहे. परिणामी दरेसरसम, दुधड, पवना, वाशी, एकघरी, टाकराळा, दरेगाव, दाबदरी, वाई, आदी वन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड केली जात आहे. हि बाब संबंधित विभागाला माहित असताना वनसंरक्ष करणारे अधिकारी कर्मचारी नांदेड, भोकर सारख्या शहराच्या ठिकाणी राहून उंटावरून शेळ्या हाकत आहेत. त्यामुळे परिसरातील सागवान तस्कराने जाळे पसरविले आहे. त्यामुळे आंध्रप्रदेश - मराठवाड्याच्या सीमेवरील जंगल भकास होत असून, आत्ता तर वाळवांटासारखी परिस्थिती दिसून येत आहे. येथील तीन वनपाल, १० वनरक्षक कार्यरत असताना, संबंधितांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे जंगलात सर्रास वृक्ष तोड होत असल्याचे दिसून येत आहे.     

याबाबत प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री केंद्रे यांच्याशी संपर्क साधून वरील प्रकाराबाबत विचारणा केली असता, बैंका फोडल्या जातात, ए.टी.एम.फोडल्या जातात, माणसे असताना घरे फोडली जात आहेत. हे तर जंगल आहे, वृक्ष तोड होणे हे साहजिकच आहे, असे बेजबाबदार वक्तव्य करून एक प्रकारे सागवान तस्करीला मूक संमती असल्याचे निदर्शनास आणून दिले.  

२२ मार्च, २०१४

शौच्चालय बांधकामाचा निधी मिळेना

दारीद्रय रेषेतील लाभधारकांना शौच्चालय बांधकामाचा निधी मिळेना
लोकप्रतिनिधीची उदासीनता व प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार

हिमायतनगर(अनिल मादसवार)जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून दारीद्रय रेषेखालील लाभधारकांना वैयक्तिक शौच्चालय बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या योजने अंतर्गत लोकवाटा भरून योजना पदरात पाडून घेवून स्वच्छता अभियानाला चालना देण्याची तरतूद आहे. परंतु योजनेत समाविष्ठ करण्यात आलेल्या निधी मंजूर होऊनही स्थानिकाचे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे लाभधारकांना बांधकामाचा निधी मिळत नसल्याने खड्डे खोदूनही शौच्चालायाची कामे अधांतरी असल्याने, सदरची योजना दारीद्रय रेषेतील योजना लाभाधार्कांसाठी कि अधिकारी - पदाधिकार्यांसाठी असा प्रश्न वंचित लाभार्थ्यामधून केला जात आहे.

हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर, सरसम बु सह तालुक्यातील १९ गावात दारीद्रय रेषेतील लाभधारकांना वैयक्तिक शौच्चालय बांधकाम योजनेचा लाभ मिळवून देवून गाव स्वच्छतेकडे नेण्यासाठी लोकवाटा वसूल केल्या गेला आहे. त्या त्या गावातील गरम पंचायती अंतर्गत हि योजना राबविली जात असून, हि योजना पूर्णत्वास नेण्यासाठी मुख्यत्त्व ग्रामसेवक महाशायाची जबाबदारी आहे. परंतु संबंधित गावातील ग्रामसेवकांनी या योजनेत कमालीची उदसिनता दाखविली आहे. तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती पैकी केवळ १९ ग्रामपंचायतीने या योजनेचा लोकवाटा जमा करून त्यासंबंधीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविले आहे. आजपर्यंत अन्य ३३ गावाचे प्रस्ताव जी.प.कडे गेले नसल्याने ग्रामसेवकाची याबाबत काम्लीची उदासीनता असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

ग्रासेवक हा ग्राम विकासाचा कणा म्हणून ओळखला जातो. परंतु बहुतांश ग्रामसेवक हे " दिन जाव पगार आव " या ब्रीदवाक्या प्रमाणे सेवा बजावताना दिसून येत आहे. परिणामी ग्राम विकासाचे तीन - तेरा वाजत आहेत. तालुक्यात कार्यरत असलेले बहुतांश ग्रामसेवक हे नांदेड, भोकर, हदगाव सारख्या सोयीच्या ठिकाणी राहून उंटावरून शेळ्या हाकत आहेत. हि बाब पंचायत समितीचे सभापती, उपसभापती यांना माहित असताना मिलीभगत करून मैनेजमेंट करीत असल्यामुळे ग्राम सेवक महाशय स्वैर झाले आहेत. त्यातच खुद्द गटविकास अधिकारी स्वतः नांदेडला राहून ये - जा करीत असल्याने त्यांची वचक कार्यालयातील कर्मचाऱ्याबरोबर ग्राम सेवक महाशायांवर राहिली नाही. प्रशासकीय यंत्रणा व सर्वाधिक लोकप्रतिनिधींचा मीच फिक्सिंगचा कार्यक्रम उघडपणे चालविला जात असल्याने जनतेच्या अपेक्षांचे पानिपत झाले आहे. गोरगरिबांच्या जिव्हाळ्याच्या अनेक योजना राबविण्यात उदासीनता दाखविली जात असल्याने शासकीय योजनांचा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. मागील सहा महिन्यापूर्वी वरील योजनेचा लोकवाटा संबंधित लाभधारकांनी ग्रामपंचायतीला जमा केला आहे. परंतु अद्याप पर्यंत संबंधित लाभधारकांना वैक्तिक शौच्चालयाचा निधी मिळाला नाही. निधी मिळणार या आशेने बहुतांश लाभार्थ्यांनी शौच्चालायाचे खड्डे करून ठेवले, मात्र निधी उपलब्ध होत नसल्याने हि कामे रखडली आहेत.

नुकतेच जी.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी येथील पंचायत समिती कार्यालयास भेट देवून प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी साहेबराव नरवाडे यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी श्री काळे यांना शौच्चालयाची निधी मिळत नसल्याने रखडलेली कामे पूर्ण करण्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी नांदेड न्युज लाइव्ह्चे संपादक अनिल मादसवार, साप्ताहिक वारसदार चे संपादक त्रिरत्नकुमार भवरे, कानबा पोपलवार, शे.इस्माईल, परमेश्वर गोपतवाड, गंगाधर वाघमारे, दत्ता शिराणे, संजय मुनेश्वर, धम्मपाल मुनेश्वर, राजेश कवडे आदींसह गटविकास अधिकारी विठ्ठल सुरोशे, विस्तार अधिकारी क्षीरसागर यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी सीईओ यांनी या समस्येकडे लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याने वंचित लाभधारकांच्या आशा उंचावल्या आहेत. यासह हिमायतनगर तालुक्यात बहुतांश कामे अश्याच हलगर्जी कारभारामुळे रखडली असून, या बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष देवून कामे पूर्णत्वास नेवून शासनाच्या योजना राबवाव्यात अशी मागणी होत आहे.

ग्राहकानो सावधान..

ग्राहकानो सावधान..
निनावी कॉल येताच गायब होतेय एटीएम खात्यातील रक्कम

हिमायतनगर(अनिल मादसवार)तुमचे कार्ड ब्लॉक झाले आहे, चालू करावयाचे असले तर एटीएम. कार्डचा सिरियल नंबर व पासवर्ड सांगा..असा निनावी फोन अनेकांना येत आहेत. त्यावरून माहिती दिल्यानंतर काही वेळातच तुमच्या खात्यावरील रक्कम गायब होत आहे. त्यामुळे एटीएम.धारकांनी सावधान राहून आपल्या खात्यावरील रक्कम सुरक्षित ठेवावी असे सांगण्याची वेळ बैन्केच्या शाखाधीकारयांवर आली आहे. असाच काहींसा प्रकार हिमायतनगर शहरातील ग्राहकासोबत घडल्याने एकच खळबळ उडाली असून, सदर ग्राहकाने या बाबत हिमायतनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

सध्या बैन्केतील खात्यात रक्कम असलेल्या ग्राहकांच्या मोबाईल नंबरवर निनावी फोनद्वारे कोल येत आहे. कोल रिसीव्ह करताच हैलो मै... एटीएम कंपनी से बोल रहा हूं... क्या आप एटीएम का उपयोग करते हैं.. असा प्रश्न निनावी कोलद्वारे केला जातो. तुम्ही हां म्हणाले कि, लगेच पुढचा प्रश्न कौनसे बैंक का.. तुम्ही बैन्केचे नाव सांगताच, तो म्हणतो कि तुम्हारा एटीएम कार्ड ब्लॉक कर दिया गय हैं... का..? असा प्रश्न विचारताच कंपनी कि और से एटीएम कार्ड व्हेरिफिकेशन किया जा रहा हैं... आप हमेशा एटीएम का उपयोग नही करते हो.. अगर उसे शुरू राखना हैं तो... एटीएम कार्ड के १६ से १९ नंबर के आकडे बताओ... असे सांगून नंबर घेवून, लागलीच कार्ड ऐक्तीवेट करण्यासाठी पासवर्ड(पिन नंबर) मागितला जातो... अन्यथा तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक होईल असे संगितले जाते. त्यामुळे सहजरीत्या ग्राहक आपल्या सोयीचा कोल समजून माहिती देतात. यावरून कोणत्याही बैन्केचे एटीएम असेल तरी त्या बैन्केतून बोलतो असे सांगून ग्राहकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उघड होऊ लागले आहे. ज्या एटीएम धारकांना निनावी फोन आला त्यांनी जर कार्ड क्रमांक व पासवर्ड सांगितला कि काही वेळातच तुमच्या खात्यावरील रक्कम गायब झालेली दिसून येत आहे.

असाच कांहीसा प्रकार हिमायतनगर येथील शे.फय्याज शे.इब्राहीम रा. यांच्या सोबत घडला आहे. त्यांच्या भारतीय स्टेट बैन्केतील खात्यातून ४ हजाराची रक्कम दि.१४ मार्च रोजी गायब झाली आहे. हि बाब दि.२१ रोजी येथील बैंक शाखेत रक्कम काढण्यासाठी गेला असता त्यांच्या लक्षात आली. त्यांनी शाखाधिकारी जैन यांना विचारणा केली असता सदरची रक्कम तामिळनाडू येथील बँक शाखेच्या एटीएम मधून एकच दिवशी दि.१४ मार्च रोजी प्रथम १०००, दुसर्यांदा १५०० व तिसर्यांदा १५०० अश्या पद्धतीने तीन वेळा रक्कम काढण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे सदर ग्राहकास धक्का बसला व आपली फसवणूक झाल्याचे त्यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले.

रक्कम गेल्याचे कळताच सदर ग्राहकाने अन्य नंबरवरून संपर्क केला असता तो कॉल उचलला गेला नाही. पुन्हा काही वेळाने संपर्क केला असता एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगण्यात आले. तुमचे नाव काय असे म्हणताच बैंक ऑफ इंडिया मुंबई शाखेच्या एटीएम कॉल सर्विस मधून बोलतो असे सांगण्यात आले. पुन्हा संपर्काचा प्रयत्न केला असता फोन बंद असल्याचे आपली फसवणूक झाल्याचे ग्राहकाने सांगितले.

याबाबत येथील बैन्केचे शाखाधिकारी किशोरचंद जैन म्हणाले कि, अश्या पद्धतीचा फोन आल्यास ग्राहकांनी आपली कोणतीही माहिती सांगू नये. या बाबत माहिती असल्यास थेट बैन्केशी संपर्क साधून शंकेचे निरसन करून घ्यावे असणे आवाहनही त्यांनी केले.

सदर तक्रारी बाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, हा प्रकार बाहेरील आहे, तसेच बैन्केच्या अंडरमधील आहे. त्यामुळे आम्ही यात काही करू शकत नाही, तरी सुद्धा सदरचा नंबर कुठला आहे. हे शोधून काढून देवू शकतो असे त्यांनी सांगतले.

२१ मार्च, २०१४

आचारसंहितेला केराची टोपली

आचारसंहितेला केराची टोपली दाखून शहरात विकासाची निकृष्ठ कामे सुरु...

नांदेड(प्रतिनिधी)लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हदगाव - हिमायतनगर तालुक्याच्या आमदारांनी नारळ फोडण्यावर भर दिला देवून, उद्घाटन, भूमिपूजन करून, विकास कामाच्या नावाखाली प्रसिद्धी मिळविण्यावर जोर दिला आहे. परंतु बहुतांश विकास कामाचे नारळ फोडून वर्षानुवर्ष लोटली ती कामे अजूनही जैसे थेच असून, नव्याने उपलब्ध झालेल्या निधीची कामे आचारसंहितेच्या नियमन बगल देत गुत्तेदार करवी सुरु आहेत. हा आचार संहितेचा भंग नव्हे काय...? असा सवाल सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. विकास कामाचा दिखावा करून मते मिळविण्याची धडपड सत्ताधारी पुढार्यांकडून केली जात असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय क्षेत्र व सामान्य नागरीकाच्या चर्चेतून पुढे येत आहेत.

तालुक्याचा कारभार सांभाळल्या पासून मागील चार वर्षाच्या काळात एवढे नारळ कधीही फोडले नाही. तेवढे नारळ ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एका दिवसात ७ ते १० ठिकाणचे नारळ फोडून उद्घाटन, शुभारंभ करून कामाला सुरुवात केली आहे. उद्घाटनानंतर लगेच ०५ मार्च रोजी राज्यभरात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली. परंतु नांदेडला राहून दलाली करणाऱ्या त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी गुत्तेदारी घेतलेल्या गुत्तेदाराकडून मोठ्या प्रमाणात टक्केवारी वसूल केली अश्या प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर काही गुत्तेदाराने दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर गुत्तेदारांकडून जाहिरातीच्या नावाखाली लाखो रुपये उधळून शासनाच्या निधीतील कामे निकृष्ठ दर्जाची करण्यास एक प्रकारे चालना दिली आहे. या मध्ये अधिक तर हदगाव -हिमायतनगर शहरातील जवळच्या दलाल कार्यकर्त्यांचा समावेश असून, मंजूर कामातून टक्केवारी काढली जात असल्याने रस्ते विकास कामाची पुरती वाट लागत आहे. परिणामी नुकत्याच झालेल्या कामावर अल्पावधीत खड्डे पडून पाणी साचु लागलेल्या कामाच्या दर्जावरून स्पष्ठ होत आहे. हा सर्व प्रकार वरिष्ठ स्तरावरून निधी खेचून आणणाऱ्या विद्यमान आमदार महोदयांना माहित असताना ईश्त्याकच्या दलाली कारभाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याच्या प्रतिक्रिया त्यांच्याच गोटातील काहींच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे. याचा परिणाम आगामी निवडणुकीत होऊन नुकसानदाई ठरेल अश्या संतप्त प्रतिक्रिया अंतर्गत गटबाजी करीत असलेल्या कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.

सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीला आणखीन आठ ते नऊ महिन्याचा कालावधी शिल्लक असून, आत्तापासूनच विधासभेची तयारी जवळगावकर यांनी केल्याचे दिसत आहे. केवळ उद्घाटने करून कोट्यावधीचा निधी खेचून आणल्याचे दाखवून सामान्य जनतेची मने वाल्विण्याबरोबर मताधिक्य वाढविण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला कि काय..? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार निवडून येवो अथवा न येवो आपली आमदारकी मात्र टिकली पाहिजे या विचाराने हा सर्व खटाटोप केला जात असल्याचे आरोप विरोधी पक्षातून केला जात आहे.

मागील २० दिवसापूर्वी शहरात ०१ कोटी ०५ लक्ष रुपयाच्या निधीतून विविध वार्डात सिमेंट रस्ता व मजबुतीकरण कामाचे उद्घाटने करण्यात आली. हि कामे आपल्यालाच मिळावी म्हणून यथील ग्रामपंचायत सदस्यानि गुत्तेदारी करण्यावरून ओढा-ताण सुरु केली होती. म्हणून हि कामे आदर्श आचारसंहितेपूर्वी सुरु होऊ शकली नाही. आचारसंहिता लागू झाल्यानंतर १० दिवसांनी कामे सुरु झाली असून, यापैकी पोलिस कॉलनी जी.प.शाळा ते जुनी जिनिंग फैक्टरी या रस्त्याच्या काम सध्या सुरु आहे. या कामात विहिरीचा मुरुमाड हिरव्या रंगाचा ठिसूळ दगड, ढक्कन नावाच्या कंपनीचे निकृष्ठ दर्जाचे सिमेंट व माती मिश्रीत रेतीचा वापर केला जात आहे. सदर रस्त्याचे काम हे एका ग्राम पंचायत सदस्या कडून केले जात असून, मागील निवडणुकीत झालेला खर्च भरून काढण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाची क्यूरिंग व कामाचा दर्जा अंदाजपत्रकानुसार केला जात नसून, पाच लाख रुपयाच्या निधीचे काम अर्ध्या किमतीत रातोरात पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. त्यमुळे रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत असून मार्च एंड पूर्वी बिल काढण्याचा प्रयत्न अभियंत्याच्या संगनमताने गुत्तेदाराने सुरु केला आहे. याचा अंदाज लागताच काही ग्रामस्थांनी सदर रस्त्याचे काम निकृष्ठ होत असल्याची तक्रार गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. परंतु कामाची चौकशी तर सोडा साधी पाहणी सुद्धा या महाशयांनी केली नाही, उलट संबंधिताने गुत्तेदाराला अभय देवून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. परिणामी अल्पावधीतच रस्त्याच्या कामाची वाट लागून मोठ - मोठे खड्डे पडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या सर्व प्रकाराकडे निवडणूक आयोग व बांधकाम खात्याने लक्ष देवून आचारसंहितेच्या काळात विकास कामे करून निवडणूक आयोगाच्या सूचनेला केराची टोपली दाखून आचारसंहितेचा भंग तर केला जात नाही ना..? अशी शंका नागरिकांच्या तोंडून व्यक्त होत आहे.

शहरात सुरु असलेल्या कामाबाबत ग्राम विकास अधिकारी आडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, मिळालेल्या तक्रारीवरून अभियंता श्री बसीद यांना कळविले आहे. ते उद्याच या कामाची पाहणी करणाय आहेत. सध्या सुरु असलेले काम हे अगोदरच मंजूर झाले असल्याने पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न गुत्तेदार करीत आहे. याच्या अधिक माहितीसाठी अभियंत्याशी संपर्क साधण्याचा सल्ला त्यांनी दिला. पंचायत समितीचे अभियंता श्री बासीद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच केल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याने, या कामांना आळा बसावा म्हणून खासदार, आमदार यांच्या विकास निधीबाबतच्या सूचना निवडणूक आयोगाने केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव, योजना अंमलबजावणी विभागाचे सचिव, सर्व राज्यांचे मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी यांना दिल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या भागातील लोकसभा, राज्यसभेचे सदस्य यांचा निधी वितरित करू नये. त्याचबरोबर निवडमूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्याचबरोबर विधानसभा, विधान परिषदेचे आमदार यांचा विकास निधी नव्याने वितरित करू नये, अशा सूचना निवडणूक आयोगाने कळविले आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या या आदेशामुळे हदगाव - हिमायतनगर तालुक्यात निवडणुकीच्या तोंडावर सुरु केलेल्या व करू पाहणाऱ्या कामांचे काय..? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत असताना मात्र संबंधितांकडून आचार संहितेच्या सूचनेला झुगारून कामे केली जात असल्याने हा आचारसंहितेचा भंग नव्हे काय..? असा प्रश्न सामन्यांमधून विचारल्या जात आहे.