NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

रविवार, ५ ऑक्टोबर, २०१४

काँग्रेसच्या भस्मासुराला हद्दपार करा

गेल्या ६० वर्षापासून जनतेला लुबाडणाऱ्या काँग्रेसच्या भस्मासुराला हद्दपार करा.. खा.राऊत


हिमायतनगर(अनिल मादसवार)काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच सरकार गोचीडप्रमाणे सत्तेला चिटकून बसले आहे. गेल्या १५ वर्षाच्या राजकारणी कारभारात शेतकर्यांना व सर्व सामान्यांना या सरकारने लुटलं, लुबाडला आहे. अश्या लबाड लांडग्याना सत्तेतून हद्दपार करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागाव. काँग्रेसच्या राक्षसरुपी भस्मासुराचा आगामी निवडणुकीत वध करून शिवसेनेच्या धनुष्य बाणाला विजयी करा असे आवाहन खा.विनायक राऊत यांनी केले. 

ते हिमायतनगर येथील शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित पहिल्या जाहीर सभेत बोलत होते. या सभेला हिमायतनगर तालुक्यातून अथांग जनसमुदाय उपस्थित झाल्याने विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू घसरल्याचे चित्र दिसून आले आहे. यावेळी मंचावर बबन थोरात, महिला आघाडीच्या प्रमुख लताताई फाळके, बाबुराव कदम कोळीकर, डॉ. संजय पवार, रामभाऊ ठाकरे, प.स.सभापती आडेलाबाई हातमोडे, हदगाव प.स.उपसभापती जयश्री देशमुख, जनाबाई कदम, माजी नगरसेविका शीलाताई गंधारे, अरुणा गिरी, विवेक देशमुख, बालाजी राठोड, राम राठोड, लक्ष्मण जाधव, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले कि, आघाडी सरकारने सत्ता असताना देखील शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव दिला नाही. परिणामी येथील शेतकरी शासनाच्या नाकर्तेपणामुळे आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांच्या न्यायाच्या संदर्भात शिवसेना जाहीर सभेच्या निमित्ताने सत्ता येताच पहिले काम म्हणजे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणे हे काम शिवसेना करणार आहे, असे अभिवचन त्यांनी दिले. शिवशाहीची राजवट शेतकरी, व सामन्यांना अभिमानाने जीवन जगत यावे यासाठीचे स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वप्न बघितले होते. साध्या सरपंचाला तीन वेळा आमदार, एक वेळा खासदार केले अश्यानी घाण  केली असे सांगत २० वर्ष सत्ता भोगून पक्षाशी गद्दारी करणाऱ्या सुभाष वानखेडे यांचा खरपूस समाचार घेतला. बाबासाहेबांच्या नावावर राजकारण करणाऱ्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडत या कपाळ करंटे राज्यकर्ते काँग्रेसला गाडून टाका. तसेच बाळासाहेबाच्या नावावर केंद्रात सत्ता मिळविणाऱ्या  मोदीच्या अच्छे दिनावर टीका केली. गत १९९५ साली झालेल्या निवडणुकीत मीच जिल्हा संपर्क प्रमुख होतो. त्याकाळाप्रमाणे यावेळी सर्व उमेदवारांचे डीपोजिट जप्त होऊन नागेश पाटील यांच्या लाखाच्या मताधिक्याने विजय होईल असा ठाम विश्वास बोलून दाखविला. यावेळी नागेश पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.. एकच वादा नागेश दादा अश्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दणाणून निघाला होता.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश  हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील १०१ काँग्रेस व राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाच्या भंपकबाजी कामकाजाला कंटाळून दि.०५ रोजी हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच बोरगाव ता. येथील सरपंच - उपसरपंच व सरसम येथील काही निष्ठावन्तानी नागेश पाटील यांच्या नेतृत्वाला मान्य करून भगवी दस्ति परिधान करून प्रवेश केला. यावेळी एकच वाद नागेश दादा..कोण आला रे कोण आला..शिवसेनेचा वाघ आला.. असा जयघोष झाला. यावेळी विनायक राउत, बबन थोरात, नागेश पाटील, बाबुराव कदम, लताताई फाळके, बालाजी राठोड, डॉ.संजय पवार, लक्ष्मण जाधव, प.स.सभापती आडेलाबाई हातमोडे, राम राठोड, विजय वळसे, शंकर पाटील यांच्यासह अनेक ठिकाणचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बंजारा टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष तथा पंचायत समितीचे सदस्य बालाजी राठोड यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यप्रणालीवर टीका करत हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या पुतळा महापालिकेच्या प्रांगणात बसविण्या ऐवजी बंदिस्त ठेवला आहे. कोन्ग्रेस च्या सरकारने बनाजरा समाजाला कायम उपेक्षित ठेवले असल्यामुळे समाजाचा सर्वांगीण विकास खुंटला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आपला सर्वांचा विकास होणार आहे. त्यामुळे बहुसंख्य समाज बांधवांनी शिवसेनच्या पाठीशी राहून युवा नेते नागेश पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.

माजी.जी.प.सदस्य बाबुराव कदम यांनी बोलताना सांगितले कि गत निवडणुकीत मी उमेदवार म्हणून उभा असताना आमच्यातीलच काही गद्दारांनी विरोधी पक्षाच्या नेत्यासोबत आर्थिक तडजोड करून मला पाडले. हदगाव - हिमायतनगर तालुक्याच्या विकासासाठी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणाऱ्या नागेश पाटील यांच्या रुपात तरुण तडफदार वाघाला शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षाशी गद्दारी करून विरोधकांचे उंबरवठे झिजविणार्या व जनतेशी गद्दारी करून स्वतःचे घर भरणार्यांना धडा शिकविण्यासाठी धनुष्यबाण या निशानिसामोरील बटन दाबून आष्टीकर  यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.  

प्रचार सभेत बोलताना महिला आघाडीच्या हदगाव तालुका प्रमुख लताताई फाळके म्हणाल्या कि, गत निवडणुकीत जनतेनी सहानुभूतीने हिमायतनगर हदगाव तालुक्यात काँग्रेसला निवडून दिले, मात्र तोच नेता असा बेवडा निघेल असे वाटले नव्हते. त्यांच्या या कारनाम्याच्या वास्तविकतेपासून सर्व जनता अन्नाभिन्न आहे. यांचे दाखविण्याचे वेगळे व खायचे वेगळे दात आहेत, त्यांनी विकासाच्या नावाखाली सरकारला अंधारात ठेवून आपलीच झोळी भरली आहे. हे ओळखून जनतेनी अश्या लुटारुणा धडा शिकवीत दूरदृष्टी नेतृत्व व विकासाभिमुक महाराष्ट्राचे बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी विधानसभेवर नागेश पाटील यांना मताधिक्याने पाठवावे असे आवाहन त्यांनी केले.

उमेदवार नागेश पाटील बोलताना म्हणाले कि, विद्यमान आमदारांनी पाच वर्षाच्या काळात एकदाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठविला नाही. हिमायतनगर तालुक्यातील बहुतांश गावे हि सिंचनापासून वंचित आहेत. शेती मालाला भाव मिळत नाही, त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी साहुकार व बैन्केच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. तर मनमानी पद्धतीने शेतीमाल खरेदी करीत असताना देखील कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी नागविल्या जात आहे. एवढे सर्व घडत असताना शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी साधा पाठपुरावा करण्याचे काम सुद्धा त्यांनी केले नाही. खालपासून ते वरपर्यंत त्यांचीच सत्ता असताना शेतकरी व बेरोजगार युवकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे सोडून केवळ स्वार्थासाठी रस्ते विकास कामाचा डांगोरा पिटला आहे. अश्या स्वार्थी व विकासाच्या नावाखाली भंपकबाजी करून स्वतःचा विकास करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला तुम्हे का म्हणून मतदान करणार..? असा सवाल करीत. मागील पाच वर्षाच्या काळात मी जर कोणते चांगले काम केले असे तुम्हाला वाटत असेल तर मला मतदान करा अन्यथा करू नका अशी भावनिक साद मतदारांना घातली. यावेळी एकच वादा... आता आमदार फक्त नागेश दादा..अश्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी शिवसैनिक व मतदार बंदहावांची प्रचंड गर्दीने मैदान फुलले होते.
टिप्पणी पोस्ट करा