NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०१४

घटस्थापनाहिमायतनगर(अनिल मादसवार)नवरात्रोत्सवानिमित्त गत १५ दिवसापासून कालीन्का मंदिरात उत्सवाची करण्यात आलेली जय्यत तयारी आज संपुष्ठात आली असून अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १९३६ दि.२५ दुपारी १२ वाजता उदो.. उदो.. चा जयजयकार करत..भंडारा उधळीत पुरोहिताच्या मंत्रोच्चार वाणीत मंदिर समितीचे अध्यक्ष व सचिवाच्या हस्ते अभिषेक महापुजेने घटस्थापना करण्यात आली. तर याचा मंदिरात दुर्गा मातेच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना सुद्धा करण्यात आली आहे. यावेळी हजारोच्या संखेने महिला- पुरुष भक्तांची उपस्थिती लावली होती.

हिमायतनगर शहराच्या वैभवात भर पडणार्या माता कालीन्का मातेची महिमा अपरंपार आहे. नवसाला पावणारी कालीन्का अशी ख्याती सर्वदूर पसरली आहे. मातेची मूर्ती हि वाकाटक, चालुक्याच्या काळातील आहे. दैत्य राक्षसांनी देवतांसोबत मानवी जातींचा सुरु केलेला छळ थांबविण्यासाठी माता कालिंकेने महिषासुर मर्दिनीचे रूप धारण करून दृष्ठ राक्षसांचा संहार करून अपवित्र झालेले वातावरण पवित्र केले होते. त्याच अवतारातील कालिंका मातेची मूर्ती हिमायतनगर शहरात उभी असून, गत शेकडो वर्षापासून तमाम भक्तांना आशीर्वाद देत आहे. प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी मंदिरात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जात असून, गुरुवारी सकाळी मंदिराचे अध्यक्ष राजू रामदिनवार व सचिव रामकृष्ण मादसवार यांच्या हस्ते सपत्निक महाभिषेक व आरती करण्यात आली. यावेळी मंदिराचे अर्चक दत्ता महाराज भारती यांच्या उपस्थितीत पुरोहित साईनाथ बडवे यांच्या मधुर वाणीत मंत्रोचाराने विधिवत घटस्थापना करण्यात आली. दुपारी २ वाजता श्री प.पु. बालयोगी स्वामी गजेंद्र चैतण्यजी महाराज मधापुरी, जी.अकोला यांच्या मधुर वाणीतून संगीतमय देवी भागवत प्रवचनाला दुरुवात झाली आहे. भागवताचा कार्यक्रम सात दिवस दररोज दुपारी २ ते ६ दरम्यान चालणार आहे. यासह मंदिराच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक, स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा