NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०१४

गुरुवारपासून नवरात्रोत्सवाची धूम...

हिमायतनगर(अनिल मादसवार)प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी येथील जाज्वल्य माता कालिंका देवी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा दि.२५ सप्टेंबर पासून नवरात्रोत्सवाची धूम सुरु होणार आहे. या कार्यक्रमात तमाम महिला, पुरुष भक्तांनी सहभागी होऊन शोभा वाढवावी असे आव्हान मंदिर कमेटीच्या वतीने नांदेड न्युज लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १९३६ दि.२५ गुरुवारी माता कालिंका देवीचा महाभिषेक व अलंकार सोहळा सकाळी १० ते २ या वेळेत मंदिर कमेटीचे अध्यक्ष राजेंद्र रामदिनवार व सचिव रामकृष्ण मादसवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तसेच दररोज रात्री ७ ते ८ या वेळेत या ठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या माता दुर्गादेवीची महाआरती केली जाणार आहे. तसेच सात दिवस दररोज दुपारी २ ते ६ दरम्यान संगीतमय देवी भागवताचे प्रवचन होणार आहे.

दि.२७ शुक्रवारी रात्री ०८ वाजता संत माउली वारकरी प्रतिष्ठान एकंबा या भजनी मंडळाचे लेक वाचवा अभियान व व्यसनमुक्ती या विषयावर जनजागृती कार्यक्रम संपन्न होणार आहे. दि. २८ रोजी नवरात्र व दुर्गा देवी निमित्त महिलांसाठी संगीत खुर्चीचे कार्यक्रम रात्री ८ ते १० या वेळेत संपन्न होणार आहे. यात विजेत्या महिलांना प्रथम १००१ रुपये, दुसरे ५०१ व तिसरे ३०१ रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच दि.२९ रोजी रात्री ८ वाजता महिलांसाठी मटकी फोडो कार्याक्रमचे आयोजन करण्यात आले असून, यातील विजेत्या महिलांना प्रथम १००१, दुसरे ५०१ रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

दि.०३ अक्टोबर रोजी माता कालिंका देवीला प्रसन्न करण्यासाठी सकाळी ७ ते १२ वाजेच्या दरम्यान होमहवन व पूर्णाहुती कार्यक्रम व दुपारी ३ ते ५ या वेळेत विजयादशमी(दसरा) मिरवणूक ढोल तश्याच्या गजरात काढली जाईल. या वर्षी नवमिसह दसरा एकाच दिवशी आल्याने या वर्षीचा नवरात्रोत्सव नऊ दिवसाचा आला आहे. दि.०४ अक्टोबर रोजी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित केली असून, यात प्रथम क्रमांकास १००१ रुपये, द्वितीय क्रमांकास ५०१, तृतीय क्रमांकास ३०१ रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त येथील कालिंका देवी मंदिरात दि.२५ गुरुवार पासून दि.०१ बुधवार पर्यंत दररोज दुपारी २ ते ६ या वेळेत श्री प.पु.बालयोगी स्वामी गजेंद्र चैतण्यजी महाराज मधापुरी, जी.अकोला यांच्या मधुर वाणीतून संगीतमय देवी भागवताचे वाचन, प्रवचन केले जाणार आहे. याकामी ऑर्गन वादक - अरुण लकडे, पेटीमास्तर - दीपक मालवे, गायक - उमेश आजनकर, तबलावादक - मनोज संपळे, मायनर वादक - सुधीर खवले, झांकी सजावट - विशाल धनेगावकर आदि संगीत संच साथ देतील. तसेच दि.०२ गुरुवारी सकाळी १० ते ०१ वाजेच्या दरम्यान बाल कीर्तनकार विवेक महाराज भोकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन भव्य महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. या भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन कै. निवृत्तीराव पवार यांच्या स्मरणार्थ तालुक्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवात संपन्न होणार्या या कार्यक्रमाचा लाभ सर्व महिला - पुरुष भक्तांनी घ्यावा असे आव्हान मंदिर कमेटीचे अध्यक्ष राजेंद्र रामदिनवार, उपाध्यक्ष दिलीप पार्डीकर, सचिव रामकृष्ण मादसवार, गजानन तीप्पणवार, ज्ञानेश्वर पंदलवाड, संजय मारावार, धर्मपुरी गुंडेवार, शरद चायल, नारायण गुंडेवार, विठ्ठल मादसवार, जीवन घोगारकर, ज्ञानेश्वर शिंदे, शिवाजी भंडारे, राजू जैस्वाल, आशिष सकवान, विजय मादसवार, व समस्त गावकरी मंडळीनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा