NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शनिवार, ६ सप्टेंबर, २०१४

घाणपाणी न्यायालयात

ग्रामपंचायतीचा गलथान कारभाराने घाणपाणी न्यायालयाच्या आवारात 


हिमायतनगर(वार्ताहर)स्थानिक ग्रामपंचायतीकडून नाल्याचे व्यवस्थापन केल्यागेले नसल्याने नाल्याचे घाणपाणी थेट कोर्टाच्या आवारात घुसल्याने उपस्थित कर्मचार्यांना व वादी- प्रतीवाद्याना दुर्गंधीयुक्त वातावरणात काम करावे लागत आहे.

हिमायतनगर शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला असून, लवकरच या ठिकाणची ग्रामपंचायत संपुष्ठात येउन नगर पंचायतीच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे शहरातील सफाई, स्वच्छतेकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष करून, स्वार्थ असलेल्या रस्ते विकास कामाकडे लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील नाल्याचे व्यवस्थापन व्यवस्थित केल्या गेले नसल्याने घाण पाण्याचा संचय होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील अनेक चौका- चौकात व मुख्य रस्त्याच्याकडेला घाण, कचर्याचे ढिगारे जश्यास तसे ठेवले जात असल्याने तीचघाण उन्हामुळे वाळून हलक्याश्या हवेने नागरिकांच्या नाका - तोंडात व पुन्हा नालीत जात आहे. याचा प्रत्यय पादचार्यांना व वाहनधारकांना येत असताना नुकत्याच झालेल्या हलक्याश्या पावसाने नाल्या तुंबलेल्या असल्या कारणाने वार्ड क्रमांक ३ मधील अनेक घरात पाणी शिरल्याचे दिसून आले आहे.

तसेच परमेश्वर मंदिर ते आंबेडकर रस्त्यावरील कोर्ट न्यायालय परिसरातील नाल्या जाम झाल्यामुळे नाल्याचे घाणपाणी थेट आवारात जमा झाल्यामुळे तलावाचे स्वरूप आल्याचे चित्र दिसून आले आहे. बरेच तास न्यायालयाच्या आवारात दुर्गंधीयुक्त घाणपाणी साचून राहिल्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागला. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधीसमोर ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

या बाबत ग्रामसेवक शंकर गर्दसवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, या बाबतची माहिती मला न्यायालयातून मिळाली आहे, या ठिकाणी संचय होणार्या पाण्याची विल्हेवाट लाऊन तात्काळ परिसर स्वच्छ करण्यासाठी कर्मचार्यांना पाठविणार असल्याचे सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा