NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०१४

जनतेची फसवणूकहदगाव - हिमायतनगर मतदार संघात झालेली कामे काही एकट्या आमदारांनी केले नसून, तो पैसा सरकारचा आहे. सरकारच्या तिजोरीत रक्कम जमा होती, शासनाच्या योजनेची कामे काळाप्रमाणे होणारच. मात्र याचे श्रेय स्वतःच घेऊन काँग्रेसच्या आमदारांनी विकासाचा डोंगर नावाची पुस्तिका काढून विकास केल्याचे दाखवीत जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. असा घणाघाती आरोप अल्पसंख्यांक सेलचे नांदेड जिल्हाध्यक्ष जाकेर चाऊस यांनी केला. ते हिमायतनगर येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी जी.प.सदस्य समद खान, सुभाष दरवांडे, मुख्तार जहागीरदार, गौतम कदम, प्रकाश कांबळे यांच्यासह अनेक समर्थक कार्यकर्ते, मतदार बांधव उपस्थित होते. 

त्याप्रमाणे निधी जिल्ह्यातील अनेक आमदारांनी आणून आपल्या तालुक्यात विकास केला आहे. परंतु हदगाव - हिमायतनगरच्या आमदारांनी विकासाच्या नावाखाली स्वतः, गुत्तेदार, चेल्या चपाट्यासह चांडाळ चौकडीचा विकास केला आहे. अगोदर तीन माणसे एक गाडी होती, आता तीन माणसासाठी सात गाड्या झाल्या हा स्वतःचा विकास नव्हे काय..? हदगाव- हिमायतनगर विधानसभा क्षेत्रात झालेली कामेसुद्ध बोगस व अत्यंत निकृष्ठ पद्धतीची झाली असून, त्याची चौकशी केल्यास विकासाचा डोंगर.. टेकडी सामानही दिसणार नाही. विद्यमान आमदार कधीही सामान्य जनतेच्या सुख दुखः त सहभागी झाले नाहीत असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
२५ वर्षापासून राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना एक वेळा निवडणूक लढविली त्याकाळी शिवसेनेच्या उमेदवाराला टक्कर देऊन दुसर्या क्रमांकाचे मते मिळविली होती. सन २००४ ला काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला मान्य करून प्रवेश केला. त्यावेळी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी म्हणजे अशोक चव्हाण यांनी दिलेले वचन पाळले नाही, अनेकदा याबाबतची विचारणा केली मात्र अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्षपदी निवड करून बोळवण करण्यात आली. अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मेळावे, प्रशिक्षण शिबीर घेऊन, गरजूंना कर्जपुरवठा करण्यापर्यंतचे समाजउपयोगी काम केले. परंतु सरकाच्या धीम्यागतीमुळे अनेक कामे अजूनही प्रलंबित राहिली आहेत. त्यामुळे अल्पसंख्यांक समाज हा विकासापासून कोसो दूर फेकल्या गेला असून, हि कामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी जनतेची सात हवी आहे.

१५ वर्षातून काँग्रेस पक्षाने अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाला उमेदवारीच दिली नाही. जर ओमप्रकाश पोकर्ण सारखा अल्पसंख्यांक समाजाचा माणूस आमदार होऊ शकतो, तर मुस्लिम समजाचा का..? होऊ शकत नाही. यासाठी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. एकाच पक्षात १० वर्ष काम करूनही न्याय मिळत नसेल तर त्या पक्षाचे काम करून काय फायदा. असे म्हणत उमेदवारी न दिल्यास ओबीसी, अल्पसंख्यांक, मायनारेटी, बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊ तथा विरोधात जाऊन अन्य पक्षातून म्हणजे " बि.एस.पी." च्या तिकिटावर २०१४ ची विधानसभा निवडणूक लढविणार आहे. यासाठी मी गत तीन महिन्यापासून हदगाव - हिमायतनगर मतदार संघात जनमताचा कौल घेत आहे. लाखोच्या संखेत प्रसिद्धी पत्रक काढले असून, निवडणूक लढवावी कि नाही हे जनताच ठरविणार आहे. आतापर्यंत हजारो मतदार बांधवांनी भ्रमण ध्वनिवरून गरिबांच्या हक्क व न्यायासाठी निवडणूक लढवावी असे सुचित केले. तर अनेकांनी प्रत्यक्ष संपर्क करून निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला आहे. निवडणुकीत नांदेड, हिमायतनगर, हदगाव येथील काँग्रेस मधील मात्तब्बर पुढारी, पदाधिकारी यासाठी माझ्या पाठीशी उभे असून, वेळ प्रसंगी त्यांची नावे जाहीर करेन असेही ते म्हणाले.

सन २००९ च्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत प्रचंड मते मिळवील त्यासाठी माझी टक्कर हि शिवसेना- भाजपशी होणार आहे. कारण काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा चौथ्या क्रमांकावर फेकला जाईल असा दावाही त्यांनी केला. मी काँग्रेस मध्ये दाखल झाल्यांनतर गरीब तळागाळातील लोकांना हक्क मिळवून देण्यासाठी व पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. परंतु पक्षाकडून नेहमीच मुस्लिम व अल्पसंख्यांक समाजावर अन्यायच होत आहे. अन्यायाचा प्रतिकार करत काँग्रेस विरोधात जावून निवडणूक लढवून गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढविल.

आजवर कधीच मैनेजचा कारभार केला नाही, मी पक्षश्रेष्ठी म्हणून चव्हाण साहेबांचा आदर करतो. मात्र समाजावर अन्याय होत असेल तर समजासाठी नेत्यांच्या विरोधात जाईल. या नेत्यांना केवळ मतदानासाठीच मुस्लिम समाज आठवतो, त्यानंतर मुस्लिम समाजच्या समस्या, गरजाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अल्पसंख्यांक, बहुजन, ओबीसी व तत्सम समजाच्या न्याय हक्कासाठी निवडनुकीच्या रिंगणात उभे राहील. मतदारांनी सुद्धा उमेदवाराची जात - पात न पाहता शिक्षण, रोजगार, शेतकरी, उद्योग संस्था यासह अन्य प्रश्न मार्गी लावणारा सुशिक्षित नेता पाहूनच निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.
अनिल मादसवार - हिमायतनगर
टिप्पणी पोस्ट करा