NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०१४

उमेदवारी दाखल

हदगाव(शिवाजी देशमुख) हदगाव -हिमायतनगर विधानसभा मतदार संघात शुक्रवार दि.२६ रोजी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी २५ हजार समर्थक शिवसैनिक व संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या प्रमुख उपस्थिीतीत मोठ्या जल्लोषपुर्ण व उत्साही वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याच बरोबर इतर पक्षाच्या उमेदवारांनीही आपआपले उमेदवारी अर्ज दाखल केले. हदगाव शहरात कधी नाही एवढी अभुतपुर्व शिवसैनिकांची अलोट गर्दी पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याची चर्चा ऐकू येत होती.

श्री दत्त संस्थान दत्तबर्डी येथे पुजा करुन निघालेली २५ हजार शिवसैनिक व समर्थकांच्या रॅलीने साम्म्पूर्ण हदगाव शहर दुमदुमुन गेले होते. आजची ही गर्दी पाहुन विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र दिसुन येत होते. अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी आगामी विधानसभेत नागेश पाटीलच आमदार म्हणुन गेले पाहीजेत असे आवाहन केले नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या छोटेखानी भाषणातुन आजची ही शिवसैनिकांची झालेली अलोट गर्दी पाहुन आपण भारावुन गेलेा असल्याचे नमुद करतांनाच येणार्‍या निवडणुकीत धनुष्यबाणासमोरील बटन दाबुन हदगाव /हिमायतनगर मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी असे भावनिक आवाहन केले.

यावेळी व्यासपीठावर माजी जी.प.सदस्य बाबुराव कदम कोहळीकर, शिवाजी देशमुख, माजी तालुका प्रमुख पाडुंरग कोल्हे, श्यामराव चव्हाण, पंचायत समितीचे सभापती बालासाहेब कदम, माजी सभापती दिलीपराव देबगुंडे, विवेक देशमुख, संभाराव लांडगे, हदगाव तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य, महिला आघाडीच्या प्रमुख लता फाळके, हिमायतनगरचे तालुका प्रमुख डॉ.प्रकाश वानखेडे, रामभाऊ ठाकरे, यांच्याश सर्व पदाधिकारी व असंख्य महिला व शिवसैनिकांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा