NEWS FLASH लोकसभा विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड. चारुलता टोकास यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली, भाजप नेते माजी आ.रमेश कदम यांचा समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश, मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची जाणीव करून देण्यासाठी गुरुवारी पनवेल सावंतवाडी दरम्यान काँग्रेस पक्ष करणार सत्याग्रह आंदोलन, मुखेड नगरपरिषदेच्या घन - कचरा व्यवस्थापन टेंडर निविदा प्रक्रिया रखडल्याने जागोजाग घाण साचली, राम शिंदे यांना स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्राचे ब्रँड अम्बॅसेडर नेमा- सचिन सावंत **

२१ सप्टेंबर, २०१४

मतदार जागृती अभियान

मतदार जागृती अभियानाला प्रचंड प्रतिसाद


हदगाव(वार्ताहर)विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा यासाठी मतदार जन जागृती अभियान जिल्हाभरात राबविले जात असून, हदगाव तालुक्यात सुरु झालेल्या या कार्यक्रमास मतदारांचा उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. 

गत लोकसभा निवडणुकीत ज्या भागात कमी मतदान झाले अश्या हदगाव तालुक्यातील जवळपास २७ गावात स्वीप सेकंड अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्या सूचनेने हदगाव तालुक्यात, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष घाडगे यांनी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानुसार पथनाट्य, स्त्रियांसाठी स्पर्धा कार्यक्रम घेण्यात येत आहेत. ग्रामीण भागात या कार्यक्रमास विशेषतः स्त्रियांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. 


काँग्रेसचे माजी प.स.सदस्यासह अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

हदगाव(वार्ताहर)हदगाव तालुक्यातील तामसा सर्कलचे कॉंग्रेसचे माजी पंचायत समिती मेम्बर मुकुंद रावळे यांनी दि.२० रोजी नागेश पाटील यांच्या नेतृत्वाला मान्य करून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेनेची भगवी दस्ति परिधान करून जय महाराष्ट्राचे नारे दिले. जी.प.सदस्य रमेश घंटलवार, माधव नारेवाड, तेजस उंबरकर, सुरेश कोडगीरवार, बंडू पाटील, तामसा परिसरातील सर्कल प्रमुख यांच्यासह अनेक शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या नागेश पाटील यांनी जनसंपर्कात आघाडी घेतली असून, प्रत्येक गाव, वाडी तांड्यात त्यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांचा सत्कार व पुढील आमदार तुम्हीच व्हावे अशी इच्छा अनेक नागरिक बोलून दाखवीत आहेत. त्यामुळे गात पाच वर्षापूर्वी कॉंग्रेसच्या ताब्यात गेलेला शिवसेनेचा मतदार संघावर पुन्हा शिवसेना भगवा फडकेल अशा आत्मविश्वास नागेश पाटील यांनी उपस्थितांच्या सत्कार उत्तर देत बोलून दाखविले आहे.