NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

गुरुवार, ११ सप्टेंबर, २०१४

बंडाळीचे राजकारण...

उमेदवारांची नावे निश्चित नसल्याने मतदार संघात अंतर्गत बंडाळीचे राजकारण...


हिमायतनगर(अनिल मादसवार)संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात दोन्ही काँग्रेस - शिवसेनेच्या दावेदार उमेदवारांनी मतदारांच्या गाठी भेटीवर भर दिला आहे. निवडणुकीची लगीनघाई सुरु झाली असताना अद्याप कोणाचाच उमेदवार घोषित झाला नसल्याने उमेदवारीवरून दोन्ही पक्षात अंतर्गत बंडाळीचे राजकारण तापत असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. तर एकीकडे आ.जवळगावकरांना स्वकियांकडून ब्रेक लावण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे नागेश पटलासाठी युवा कार्यकर्ते घेत असलेले परिश्रम यावर दोन्ही पक्षातील उमेदवारांची नावे घोषित होण्याला कारणीभूत ठरणार आहेत.  

हदगाव - हिमायतनगर विधानसभा निवडणुकीची जागा हि खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी असल्यामुळे या ठिकाणी दोन्ही पक्षातून अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार माधव पाटील जवळगावकर हे दुसर्यांदा आपले नशीब अजमावण्याच्या तयारीने रस्ते, सभाग्रह, पूल आदींसह अन्य विकास कामाचे नारळ फोडत जोरदार तयारीला लागले आहेत. मात्र जवळगावकराकडून केल्या जाणार्या विकास कामे सर्व निष्ठावंताना डावलून मुठभर लोकांना देऊन स्वतःचा विकास साधत आहेत. तसेच जिन्य कार्यकर्त्यांना बाजूला सारत नव्या लोकांना जवळ करीत असल्याने अनेक निष्ठावंत नाराज आहेत. जनतेमध्ये विकास कामाचा डोंगर उभा केल्याचे दाखविण्याचा प्रयत्न कितपत साध्य होईल हे येणार काळात दिसून येणार आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेस मधील त्यांचेच स्वकीय तथा अशोक चव्हाण यांच्या जवळचे असलेले माजी जी.प. उपाध्यक्ष गंगाधर चाभरेकर यांनी सुद्धा मतदार संघाच्या भेटीवर भर दिला असून, गत निवडणुकीच्या वेळी आगामी पुढील उमेदवारीचे आश्वासन मिळालेले असल्याने जोरदार तयारी चालविली आहे. तसेच मुस्लिम समाज बांधवांच्या मताची फळी असलेले तथा अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकेर चाऊस यांनी सुद्धा १५ वर्षानंतर हा मतदार संघ मुस्लिम समाजाच्या उमेदवारास सोडवा अशी मागणी करून मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. तर अनिल पाटील बभालीकर यांनी सुद्धा आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरु केले असल्याचे राजीक्य गोटात बोलले जात आहे. काँग्रेस मधील आप्तस्वकीयांच्या दाव्याने जवळगावकरांची दोखेदुखी वाढली असून, त्यांच्या उमेदवारीला ब्रेक लागणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे. असे असले तरी त्यांच्या कामाची पद्धत पाहता दुसर्यांदा त्यांनाच उमेदवारी मिळेल असा अंदाज आहे. त्यावेळी मात्र इच्छुकांकडून बंडखोरी होऊन मतदार संघातील विकासाच्या डोंगराचा चिरफाड करीत ती साधी टेकेडीही नाही हे सिद्ध करण्याची तयारी अनेकांनी चालविली आली आहे.

तर २००९ मध्ये शिवसेनेत दाखल झालेल्या नागेश पाटलांनी शिवसेनेची मजबूत फळी तयार करून निवडणुकीच्या आखाड्यात सर्व तयारीनिशी उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. गात लोकसभा निवडणुकीत माजी ख.सुभाष वानखेडे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले, मात्र काँग्रेसने केलेल्या डम्मी सुभाष वानखेडे नावाच्या खेळीमुळे अल्पश्या मतांनी पराभव पत्करावा लागला. परंतु  यामुळे नाराज न होता सुभाष वानखेडे यांनी नागेश पाटील यांना दिलेले वचन पाळण्यासाठी स्वतः नांदेडमधील उत्तर विधानसभेतून लढविण्याची तयारी सुरु केली आहे. परिणामी हदगाव- हिमायतनगर विधानसभा निवडणुकीत नागेश पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित असून, त्या दृष्टीने गात पाच वर्षापासून त्यांनी सामन्यांच्या सुख- दुख:त सहभागी होऊन भेटीगाठी घेऊन युवकांचे संघटन वाढविण्यावर भर दिला आहे. दर आठ दिवसात काँग्रेसला कंटाळलेले पदाधिकारी, युवक, कट्टर समर्थक कार्यकर्ते शेकडोच्या संखेने नागेश पाटील यांच्या नेतृत्वाचा स्वीकार करीत शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली येत आहेत. त्यामुळे देशभरात मोदी लाट तर हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात नागेश पाटील आष्टीकर या नावाची लाट असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र काही आप्त विघ्नसंतुष्ठानी त्यांच्या उमेदवारीला ब्रेक लावण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केल्याचे दिसत असले तरी ते विघ्न गणपती बाप्पांनी दूर केल्याचे बोलले जात आहे. म्हणूनच कि काय शुक्रवारपासून शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबन थोरात हे मतदार संघाच्या सर्कलनिहाय भेटीगाठी घेणार असल्याचे समजते.    
टिप्पणी पोस्ट करा