NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

रविवार, २४ ऑगस्ट, २०१४

अण्णाभाऊ साठें

अण्णाभाऊ साठेंचे नाव मुंबई विद्यापीठाला देऊन गौरव करावा...प्रा.पंजाब शेरे
हिमायतनगर(वार्ताहर)अण्णभाऊ साठे यांनी फक्त दीड दिवसाच्या शालेय शिक्षणावर साहित्याच्या विश्वात आपले नाव कोरले. अण्णाभाऊची साहित्य चळवळ हि मानव मुक्तीसाठी होती. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अक्षाला गवसणी घालणारी साहित्य निर्मित्ती, तळागाळातील गरीब, कष्ठकारी, कामगाराच्या उत्थानासाठी भरीव कामगिरी करतानाच अण्णाभाऊनि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार भारताबाहेर रशियात व सातासमुद्रापार केला. प्रस्थापित व्यवस्थेला चिरून टाकणारी साहित्य निर्मित्ती करताना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे, अश्या साहित्य विश्वातील विश्वरत्नाचे नाव मुंबई मुंबई विद्यापीठाला देऊन कार्याचा गौरव करावा असे प्रतिपादन प्रा.पंजाब शेरे यांनी व्यक्त केले. ते हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी बा.येथील मंडळाच्या वतीने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ९४ वि जयंती प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मंचावर हिमायतनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव तथा नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कानबा पोपलवार, दलित महासंघाचे अध्यक्ष दत्ता शिराणे, प.स.सदस्य लक्ष्मीबाई भवरे, तालुका काँग्रेस सचिव दिलीप शिंदे, धम्मपाल मुनेश्वर आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमच्या सुरुवातीला अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. दुपारी दोन वाजता गावातील मुख्य रस्त्यावरून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचीत्राची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा.सोनकांबळे म्हणाले कि, अण्णाभाऊ साठे यांनी अपार कष्ठाने मानव मुक्ती व कल्याणासाठी प्रतिभाशाली साहित्य निर्मित्ती केली. त्यांच्या साहित्य मानवाच्या जगण्या - मारण्यावर आधारित होते. कल्पनेचे पंख घेता भरारी मारणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेने अण्णाभाऊच्या साहित्याची दखल घेतली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. समारोप अध्यक्षीय भाषणात पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम म्हणाले कि, साहित्यरत्न अण्णाभाऊसाठे यांनी मानवाच्या कल्याणासाठी साहित्याची निर्मित्ती केली. त्यांचे पोवाडे, लावण्या आदींसह कादंबर्यांचे वाचन करून थोर महापुरुषाचे विचार आत्मसात करून, आपल्या भावी जीवनात प्रगती साधावी असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सरपंच पांडुरंग गाडगे, उपसरपंच रामराव कावळे मुन्ना खडकीकर, मुजीब सर, अनिल पवार, नामदेव सातलवाड, लक्ष्मण पाटील, शंकर कलाले, बंडू पाटील, विजय जाधव, नथु गाडगे, आदींसह मोठ्या प्रमाणात महिला - पुरुष नागरिक, जयंती मंडळाचे युवक उपस्थित होते. 
टिप्पणी पोस्ट करा