NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, ६ ऑगस्ट, २०१४

दुकानदाराना २० लाखाचा चुना...

कारागिरांनी लावला दुकानदाराना २० लाखाचा चुना

रोख रक्कमेसह सोन्या - चांदीचा कच्चा माल घेऊन फरार.. हिमायतनगर(अनिल मादसवार)मागील सात वर्षापासून शहरातील सराफा बाजारात सोने - चांदीच्या कच्च्या मालापासून मनी, मंगळसूत्र, डिझाईन, पॉलीशचे काम करणाऱ्या कारागिरांनी येथील व्यापार्यांना चुना लावल्याची घटना दि.०५ रोजी घडली आहे. या घटनेमुळे ज्वेलरी व्यापार्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर येथील सराफा व्यापार्यांकडे  सोन्या -चांदीच्या कच्च्या मालाचे विविध प्रकारचे डिझायनिंग व पॉलीशिंगचे काम बंगाल राज्यातील चार युवक मागील सात वर्षापासून करत होते. त्यांनी सर्व व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन केल्यामुळे येथील सर्वच व्यापारी त्यांच्याकडे कच्चा माल देऊन विविध प्रकारचे साहित्य बनऊन घेत होते. नुकतेच  त्यांनी बहिणीचे लग्न आहे असे सांगून काही व्यापारी व मित्रत्वातील काही लोकांकडून चार ते पाच लाख रुपये नगदी स्वरूपात रक्कम जमा केली. तर गावाकडून येण्यास उशीर लागेल म्हणून शहरातील जवळपास १८ व्यापायांचा सोने - चांदी, असा कच्चा माल साहित्य बनून देण्यासाठी व्यापार्यांनी त्यांच्याकडे नुकताच दिला होता.  

जवळपास १५ लाखाचे सोने व ०३ लाखाची चांदी आणि नगदी रक्कम असे मिळून २० लाखाचा माल व स्वतःचे मशीन, काटा यासह स्वतःचे अन्य महागडे साहित्य घेऊन दि. ०५ रोजी सकाळी ०४ वाजता बंगाल येथील सोने कारागीर तथा प्रमुख आरोपी साजन इसूब मंडल वय २२ वर्ष व शेजमल उर्फ सोहेल इसूब मंडल वय ३० वर्ष पोबारा यांनी केला. 


तसेच गत दोन महिन्यापूर्वी सुरज वासुदेव पाल व अनिरुद्ध यानी काम सोडून देऊन गेल्याचे व्यापारी सांगतात. वरील सर्व आरोपी हे बंगाल राज्यातील असल्याने त्यांनी संगनमताने हे केले असल्याचा आरोप सराफा व्यापार्यांकडून करण्यात येत आहे. सदरील चारही युवकांचा भ्रमणध्वनी बंद येत असल्याने आपल्याला लुबाडण्यात आल्याचे लक्षात येताच, सराफा व्यापार्यांनी पोलिस स्थानकातून फिर्याद देणार असल्याचे सांगितले. सदरील वृत्त लिहीपर्यंत पोलिस डायरीत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया चालू होती. याबाबत पोलिसात विचारणा केली असता, या घटनेचा पंचनामा सुरु आहे, सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात येउन तपास केला जाईल असे पोलिस सुत्रानी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले.   
टिप्पणी पोस्ट करा