NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

मंगळवार, ५ ऑगस्ट, २०१४

रस्ता बनला खड्डेमय

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील मौजे पोटा खु.रस्त्याची मागील वर्षापासून अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, पाचवी ते बारावीच्या शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी - विद्यार्थीनीना या खडतर रस्त्याचा सामना करत शिक्षण घ्यावे लागत आहे. तर कधी कधी पावसामुळे वाहने अडकली कि खुद्द विद्यार्थ्यांना वाहने ढकलून मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र आहे. 

नांदेड - किनवट राज्य रस्त्यावर असलेल्या पोटा खु.येथून तीन कि.मी.अंतरावर असलेल्या पोटा खु.रस्ता चिखलमय झाला आहे. परिणामी या रस्त्यावर पडलेल्या टोंगळा भर खड्ड्यामुळे विद्यार्थ्यांना पाई चालून रजया रस्ता गाठावा लगत आहे. या गावातील जवळपास ३० ते ४० विद्यार्थी हे येथून १८ कि.मी.अंतरावरील असलेल्या हिमायतनगर येथील शाळा - कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. मात्र दयनीय रस्त्यामुळे शिक्षणासाठी जाताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथून जाणारी वाहने हि खड्डेमय व चिखलातील रस्त्यात अडकून बसत असल्याने अक्षरश्या विद्यार्थ्यांना वाहने ढकलून काढण्याची वेळ येत आहे, या प्रकारामुळे वेळेवर शाळेवर पोहोन्चू शकत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. एवढेच नव्हे तर हा रस्ता अत्यंत खराब झाला असून, गंभीर रुग्ण अथवा गरोदर महिलेला उपचारासाठी आणण्यासाठी बैलगाडी अथवा खाटेचा वापर करावा लागत आहे. 

या भागातील जी.प.सदस्या ह्या अशिक्षित व आडाणी असल्यामुळे केवळ स्वार्थ असलेल्या बंधारे, सिमेंट रस्ते या कामात जास्त लक्ष देऊन निवडणुकीतील खर्च काढण्यावर भर देत आहेत. परिणामी सामान्य जनता व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीकडे त्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप समस्येनी त्रस्त झालेल्या जनतेतून केला जात आहे. या रस्त्याच्या कामाकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दयनीय अवस्था सुधारावी अशी मागणी ग्रामस्थामधून केली जात आहे. 

दुधड - कामारी गटातील बंधारे, सिमेंट रस्त्याची कामे निकृष्ठ... 

दुधड - कामारी गटाच्या जी.प.सदस्याच्या स्वार्थी वृत्तीमुळे दुधड, वाळकेवाडी, पारवा खु., वडगाव, टाकाराळा, कांडली तांडा, दाबदारी, कामारवाडी यासह या गटातील व गणातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. परंतु सदरची कामे हि अंदाजपत्रकाला बगल देऊन अभियंत्याच्या संगनमताने केली जात आहेत. सदर कामात निकृष्ठ पद्धतीचा दगड, माती मिश्रीत रेती, कमी ग्रेडचे सिमेंट व मोठ मोठे टोळक्या दगडाचा वापर करून केले जात आहे. त्यामुळे सदरची कामे हि अल्पावधीतच मातीत मिसळणार असून, या निकृष्ठ कामाची चौकशी वरिष्ठांनी करून गुत्तेदाराना दंड लावावा. तसेच कामाचा दर्जा सुधारून शासन निधीचा परीसरतील विकासापासून वंचित गावांना फायदा करून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.
टिप्पणी पोस्ट करा