NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, ९ जुलै, २०१४

पोलिसांची दुकानदारी बंद....?

हिमायतनगर(अनिल मादसवार)अवैद्य धंदेवाल्यांना सुतासारखे सरळ करणाऱ्या अनिलसिंह गौतम यांची हिमायतनगर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक नियुक्ती झाल्याने अवैद्य धंदेवाल्यासह किरकोळ प्रकरणात एन.सी.खतवून तोडपानी करत फिर्यादी आणि आरोपीची हिवशी करणाऱ्या पोलिसांची आता गौतमच्या येण्याने दुकानदारी बंद होणार आहे.

मागील काळात हिमायतनगर पोलिस स्थानकात काही दिवसासाठी रुजू झालेले पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी शहरातील अवैद्य वाहतुकीला शिस्त लावत अवैद्य धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. फिर्याद खोटी आहे कि खरी..? हे तपासूनच योग्य प्रकारे प्रकरण हाताळण्यात निष्णात असलेल्या अनिलसिंह गौतम यांची अवघ्या दहा ते पंधरा दिवसातच राजकीय वरदहस्त असलेल्या अवैद्य धंदेवाल्यांनी आपले वजन वापरून बदली करण्यास भाग पडले होते. त्यामुळे येथील नागरिकांच्या रोषाचा सामना जिल्हास्तर पर्यंतच्या प्रशासनाला सामना करावा लागला होता. परंतु " देर आये दुरुस्त आये " या म्हणी प्रमाणे अवैद्य धंदेवाल्यांचे कर्दनकाळ म्हणून सुपरिचित असलेले दबंग इन्स्पेक्टर गौतम यांच्या हिमायतनगर येथे पुनश्च येण्याने अवैद्य धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. यामुळे " तुम्हीहि फिर्याद द्या "असे सांगून साठ - गाठ करून प्रकरण निकाली काढणाऱ्या पोलिसांची दुकानदारी बंद होणार हे मात्र तेवढेच खरे..!

येणाऱ्या पोलिस निरीक्षक अनिल सिंह गौतम यांच्याकडून शहरात चालविले जाणारे अवैद्य धंदे, अवैद्य प्रवाशी वाहतूक, घरपोच मिळणारे देशी दारू व महिला - मुलींची सुरक्षा यावर अंकुश ठेऊन जनतेचे समाधान कण्याच्या आशा शहर व तालुका वासियांना लागल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा