NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

मंगळवार, ८ जुलै, २०१४

नुकसान भरपाईची मागणी

पावसाअभावी पिके वाळल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी 


हिमायतनगर(अनिल मादसवार) पहिल्या पावसावर पेरलेले बियाणे उगऊन वळून गेल्यामुळे नदीकाठावरील शेतकरी हवालदिल झाला असून, या नुकसानीचा सर्वे करून भरपाई मिळून द्यावी अशी मागणी शेतकर्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पाऊस पडत नसल्याने पहिल्या पावसावर पेरणी केलेली पिकांची उगवण होऊन पावसा अभावी वाळून गेली, आता शेतकर्यांना दुबार पेरणी शिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. खेप हनागामाच्या पेरणीची वेळ निघून गेल्याने, आता कपाशीची लागवड केली, तरी दीड महिना उलटून गेल्याने पिकाचे उत्पादन मिळणे अवघड आहे. पुन्हा पेरणी करण्यासाठी खते बियाणे कुठून आणायची या विवंचनेने शेतकरी हतबल झाला आहे. वरून राजाच्या अवकुपेमुळे तथा अस्मानी संगतामुळे झालेल्या नुकसानीची दखल शासनाने घेऊन तातडीने नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट हेक्टरी ३५ हजार रुपयाची मदत जाहीर करून हाथभार लावावा अशी मागणी वारंगटाकळी, मंगरूळ, धानोरा, बोरगडी, पळसपूर, कोठा, एकंबा, डोल्हारी, सिरपल्ली, हिमायतनगर, घारापुर, दिघी, खडकी बा, टेंभूर्णी, सरसम, कारला, परिसरातील शेतकरी व शेतमजुरांनी केली आहे. तातडीने नुकसानीचा सर्वे झाला नाही तर सर्व शेतकरी लोकशाही मार्गांनी असत्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. आणि होणार्या परिणामाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा वरील गावकर्यांनी दिला आहे.  

मनरेगाची कामे सुरु करून, ..जनावरांसाठी चारा छावण्या उभारा ..मागणी   

खरीप हंगामाला सुरुवात होऊन दीड महिना लोटला मात्र पाऊस बेपत्ताच आहे. पाऊस पडत नसल्याने अनेक भागातील पेरण्य खोलंबल्या आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नसल्याने ऐन पावसाळ्यात मजुरांवर उपासमारीची वेळ आली. तसेच पाऊस पडत नसल्याने पावसाबरोबर आता चारा तंचैची समस्या निर्माण झाली आहे. यातून सावरण्यासाठी शेतमजुरांच्या हाताला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून द्यावीत तसेच जनावरांसाठी चार छावण्या उभारून शेतकऱ्यांची परवड थांबवावी अशी मागणी टेंभूर्णी येथील उपसरपंच प्रल्हाद पाटील यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे. 
टिप्पणी पोस्ट करा