NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

सोमवार, ७ जुलै, २०१४

शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण

हिमायतनगर(वार्ताहर)हालाकीच्या परिस्थितीत इयत्ता पाचव्या वर्गातून शिष्यवृत्ती परीक्षा देऊन विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या एका शिक्षकाच्या सालगड्याचा मुलगा साखरामचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

मूळगाव इटग्याळ ता.मुखेड येथे जगणे कठीण झाल्याने लक्ष्मण कोठारे या मजुराने गाव सोडून पोट भरण्यासाठी हिमायतनगर शहर गाठले. तेंव्हापासून शिक्षक श्री शिरफुले यांच्या शेतात तो सालगडी म्हणून काम करत आहे. तारेवरची कसरत, गरीबीचे चटके सहन करीत जीवन जगत असताना, दोन मुलीनंतर मुलगा झाला. लहानपणा पासूनच मूलच्या अंगी जिद्द चिकाटी असल्याने त्यास शिक्षणाची ओढ लागली होती.

मुलास शिक्षण देण्यात गरिबी अडसर ठरत होती, मात्र शिक्षक मालकाच्या सहाय्याने तथा अन्य लोकांकडून मिळालेली जुनी पुस्तके घेऊन मुलगा सखाराम इयत्ता पाचव्या वर्गापर्यंत गेला. शाळेत साधा गणवेश सुद्धा मिळत नव्हता तरी, लहान पानापासून हुशार असलेला सखारामने जिद्द चिकाटी सोडली नाही. घरच्यांची खर्च करण्याची परिस्थिती नसताना देखील त्याने पळसपूर येथील दोन कि.मी.वरून ये - जा करीत शाळा सुरु ठेवली. पाचवी नंतर स्पर्धा परीक्षाची सुरुवात होत असल्याने त्याने या स्पर्धेत उतरण्याचा मानस आई - वडिलाना बोलून दाखविला. पैश्याची चनचन असतांना देखील हिमायतनगर येथील जी.प.शाळेत इयत्ता पाचवी वर्गात शिक्षण घेताना ०८ फेब्रुवारी २०१४ रोजी केंदीय माध्यमिक विद्यालय बोर्डा मार्फत झालेली शिष्यवृत्तीची परीक्षा देऊन विशेष प्राविण्य मिळविले. या परीक्षेत शेकडो शिक्षक, नौकरदार, अधिकारी, पदाधिकार्यांची मुले होती. मात्र या सर्व मुलांना मागे टाकून हिमायतनगर तालुक्यातून एकमेव सखारामने शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविल्याने, जवाहर नवोदय विद्यालय, शंकरनगर बिलोली, जी.नांदेड येथे इयत्ता सहावी प्रवेशासाठी निवड करण्यात आल्याचे पत्र प्राचार्य जी. रमेशराव यांनी दिले आहे.

अगदी लहान वयात गरिबीतून मिळविलेल्या यशाबाबत विचारण केली असता सदर मुलाने गरिबीतून आई - वडिलांची मिळालेली प्रेरणा व मालक शिरफुले सर यांना देऊन यांच्या मार्गदर्शनाने यशाचे शिखर गाठल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर पुढे शिक्षण घेऊन आय.आय.टी.करून इंजिनियर होण्याचा मानस त्याने बोलून दाखविला आहे.

टिप्पणी पोस्ट करा