NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, ४ जुलै, २०१४

पतीकडून बेदम मारहाण..

स्वस्तधान्य दुकानदाराची तक्रार करणाऱ्यास सरपंच महिला व पतीकडून बेदम मारहाण..हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील मंगरूळ येथील स्वस्तधान्य दुकानदाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी तक्रार देणाऱ्या एका नागरिकास येथील सरपंच महिलेच्या उचापती नवर्याने बेदम मारहाण केल्याची घटना तीन दिवसापूर्वी घडली आहे. या मारहाणीत गिरीश कुंजरवाड याचा हात मोडला असून, युवकाच्या फिर्यादीवरून आरोपी सरपंच महिला व तिच्या पतीवर हिमायतनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि हिमायतनगर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील स्वस्त धान्य दुकानदार नियमित व नियमानुसार धान्याचे वितरण करत नसल्याची तक्रार येथील युवक गिरीश  याने तहसीलदार यांच्याकडे केली होती. हि माहिती समजताच तक्रार करणाऱ्या युवकास तू दुकानदाराची तक्रार का करतोस व तुझ्याने काय होते ते करून घे.. असे म्हणत स्वस्त धान्याचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदारास पाठीशी घालत आरोपी सरपंच सौ.शामलबाई नारायण गुंटेवाड, नारायण नामदेव गुंटेवाड, सुरेश नारायण गुंटेवाड यांनी संगनमताने तक्रार करणाऱ्या गिरीश कुंजरवाड या युवकास जबर मारहाण करीत हात मोडला असून, युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिस डायरीत वरील आरोपीवर कलम ३२५, २२३, ५०४, ५०६, ३४ भादवी अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल दोन दिवसानंतर आज दि.०४ रोजी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजार केल्याची माहिती तपासिक अंमलदार बी.यु.जाधव यांनी दिली. 

दुकानदाराचा परवाना निलंबित करा..

मौजे मंगरूळ येथील स्वस्त धान्य दुकानदार हे मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्याचा काळा बाजार कित असून, धान्य नियतनाप्रमाणे वितरीत करीत नसल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. स्वस्त धान्याचा काळा बाजार करून लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवण्यार्या दुकानदारास लोकांनी लोकांच्या हितासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच पाठीशी घालत असल्यामुळे काळाबाजार करणार्यांचे मनसुबे वाढत आहे. सदरील दुकानदाराचा परवाना निलंबित करून स्वयं सहायता बचत गाताना देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. टिप्पणी पोस्ट करा