NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, ३० जुलै, २०१४

वृद्धाश्रमाचा कलंक पुसून काढाहिमायतनगर(अनिल मादसवार)मातेची महंती महान आहे, काही वितुष्ठ पुत्रांनी माता - पित्यांसाठी वृद्धाश्रम चालाविण्यावर भर दिला आहे. परंतु वृद्धाश्रम म्हणजे समजाला लागलेला एक अभिशाप व मायबापाला मुलांनी लावलेला कलंक आहे, हा कलंक पुसून काढण्यासाठी सर्वांनी माता -पित्यांची सेवा करावी, कारण त्यांच्या सेवेत ईश्वराची सेवा केल्याची पुण्याई मिळते असेही आवाहन भागवत कथाकार डॉ.शिवयोगी कृष्णकांत स्वामी महाराज यांनी प्रबोधनातून स्पष्ठ केले. ते परमेश्वर मंदिरात आयोजित संगीतमय भागवत कथा प्रबोधन प्रसंगी उपस्थितांना संबोधित कताना बोलत होते.

यावेळी मंदिर समितीचे उपाध्यक्ष महाविराचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, प्रकाश शिंदे, विठ्ठलराव वानखेडे, संभाजी जाधव, सौ.मुलंगे ताई, राजेश्वर रायेवार, अक्कलवाड सर, प्रकाश चव्हाण, मीराताई बंडेवार, ज्योतीताई पार्डीकर, श्रीमती जन्नावार, सौ.पळशीकर, सौ.हरडपकर, सौ.रुघेबाई, सौ.मारुडवार, सौ.चिंतावार आदींसह हजारो महिला पुरुष श्रोतेगन उपस्थित होते. या प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले कि, भगवंतानी धारण केलेले दशावतार हे अंतर जगतातील असून, हे अवतार प्रत्येक मनुष्याच्या जीवनात अनुभवला येतात. पहिला अवतार गर्भ धारणेतील पहिल्या मासातून सुरु होतो. पहिला - मत्स्यावतार, दुसरा- कच्छ, तिसरा - वराह, चौथा - नृसिंह, पाचवा - वामन, सहावा - पशुराम, सातवा - राम, आठवा- कृष्ण, नववा - कलंकी, दहावा - मनुष्य या अवतारात बाहेर पडतो. जस जशी वाढ होते तश्यापद्धतीने हर मनुष्याला दशावताराची अनुभूती येते. असे सांगून भगवान श्रीकृष्ण लीलांचे वर्णन करीत जन्मापासून ते ग्राहस्ताश्रम प्रवेश पर्यंतचा वृतांत कथन केले. तसेच श्रावण मासात शिवाची आराधना केली जाते, जगात पिता मातृ शंभो भवानी...जगताची माता -पिता हे शंभू - भवानी आहे. त्यांच्या पुण्याईने मनुष्य जन्माला आले आहेत. शिवलिंगाची पूजा म्हणजे, जन्म देणारे आई - वडील संबोधून केली जाते असेही त्यांनी सांगितले. यावेळी आजच्या कार्यक्रमात राधा - श्रीकृष्णाची झाकी प्रस्तुत करण्यात आली. हे दृश पाहून उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.

दि. २९ मंगळवार पासून येथील परमेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्त सकाळी ९ ते ११ दुपारी ३ ते ६ पर्यंतच्या वेळेत संगीतमय भागवत कथा डॉ.शिवयोगी कृष्णकांत स्वामी महाराज मु.पो.शिंदी, जी.अमरावती यांच्या मधुर वाणीत सांगितली जात आहे. या भक्तिमय कार्यक्रमात दिवसेंदिवस भक्तांची मांदियाळी होत असून, भागवत कथासार प्रवचनाने शहरात मंगलमय वातावण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा