NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, २ जुलै, २०१४

अधिकार्याकडून पंचनामे

अखेर पळसपूर शिवारातील रेती साठ्यांची उपविभागीय अधिकार्याकडून पंचनामे....


हिमायतनगर(अनिल मादसवार) पळसपूर शिवारातील पैनगंगा नदीवून हजारो ब्रास रेतीचा अवैद्य उपसा होत असल्या प्रकरणी व शासनाचा लाखोचा महसूल रक्षणकर्ते तलाठी कसा गिळंकृत करतो या विषयीचे वृत्त नांदेड न्युज लाइव्हने लाऊन धरले होते. अखेर दि.०२ जुलै बुधवारी हदगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री दीपक घाडगे यांनी अविद्या रेतीसाठ्याचे पंचनामे करून गुन्हे दाखल करण्याच आदेश मंडळ अधिकार्यांना दिले तर तलाठ्यावर कार्यवाही करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

हिमायतनगर तालुक्यातील घारापुर, रेणापूर (बेचिराख), पळसपूर, कोठावाडी, कामारी, सिरपल्ली, धानोरा, वारंगटाकळी, येथील रेती पेंडावर हजारो ब्रास रेतीचा अवैद्य रित्या उपसा करून शासनाला तलाठ्याच्या साक्षीने गंडविले जात आहे. या वर्षी घरापुर वगळता अन्य ठिकाणच्या  निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतु पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने पळसपूर, रेणापूर सह अन्य   ठिकाणचा लिलाव झाला नाही. याचाच फायदा घेत महसुलचे तलाठी यांना हाताशी धरून वाळू दादांनी हजारो ब्रास रेतीची चोरी करून शासनाला लाखो रुपयाच्या महसुलाला चुना लावला आहे. पळसपूर सज्जाचे तलाठी तानाजी सुगावे यांनी आपले उखळ पांढरे करून रेती तस्करांना अभय देत रेती चोरीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. 

याबाबतचे वृत्त नांदेड न्युज लाइव्हने लाऊन धरत तलाठी सुगावेच्या तडजोडीच्या अनेक घटनांची उकल केली. परंतु कुंभकर्णी झोपेतील प्रशासनाच्या चालढकल कार्यामुळे बातम्यांनी माझे काही वाकडे होणार नाही, अश्या कितीही बातम्या पत्रकारांनी लिहिल्या तरी मी वरिष्ठ स्तरावर खुलासा सदर करून बाहेर पडेल, अशी भाषा वापरून आपला लाचखोरीचा कारभार सुरूच ठेवल्याने वाळू दादांनी नदी पत्रातील वाळूची चोरी करून शेत शिवार व परिसरात मोठ मोठे ढिगारे लाऊन ठेवला आहेत. शेवटी नांदेड न्युज लाइव्हच्या बातम्यांची दखल घेत दि.०२ जुलै बुधवारी उपविभागीय अधिकारी दीपक घाडगे यांनी सदरील प्रकारांची पत्यक्ष नदी काठावर जाऊन पाहणी केली. यावेळी परिसरातील सहा ठिकाणी १२८ पेक्षा अधिक ब्रास रेतीचे ढिगारे लावल्याचे आढळून आले. तसेच नदी पत्रात ब्लास्टिंग द्वारे दगडाचे उत्खनन केल्याचे सुद्धा दिसून आले आहे. सदरचा रेती साठ जप्त करून पंचनामे करण्यात आले. तसेच या प्रकरणी संबंधित संशयित माफियावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मंडळ अधिकारी सय्यद इस्माईल यांना देण्यात आले. यावेळी पत्रकारांनी व काही पर्यावरण प्रेमी नागरिकांनी तलाठी तानाजी सुगावे यांच्या मस्तवालपणा नजरेस आणून दिला. संबंधित तलाठ्यावर कार्यवाही करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले. परंतु सुगावे यांच्यावर कोणती कार्यवाही करण्यात येणार हे अद्याप सांगण्यात आले नसल्याने याकडे पर्यावरण प्रेमी नागरिकांचे लक्ष लागले आहे.         
टिप्पणी पोस्ट करा