NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, ११ जुलै, २०१४

टोळी सक्रिय..?

नीळ हरणाच्या हत्येची शंका..
गंभीर हरणास उपचारासाठी नांदेडला हलविले..
शव विच्छेदन न करताच प्रेताची विल्हेवाट 

हिमायतनगर(अनिल मादसवार)नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील कारला पाटीच्या फाट्या जवळ दि.११ शुक्रवारी सकाळच्या प्रहरी एक वर्षीय हरणाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले असून, हत्या करून अपघात दाखविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत वनविभागाकडून वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु मृत हरणाच्या अंगावरील कातडी व मास काढून केवळ सांगाडा घटनास्थळी आढळून आल्याने हरणाचा गूढ मृत्यू वन्यप्रेमी नागरिकांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. याच परिसरात काही तासात आणखी एक हरीण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सर्व घटनेवरून हरणाची शिकार करणारी टोळी तालुक्यात सक्रिय झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

हिमायतनगर - इस्लापूर जंगल परिसरात हरीण - नीळ, रोही, नील गाय, ससे, घोरपड, राष्ट्रीय पक्षी मोर यासह अन्य वन्य प्राण्यांची संख्या लक्षणीय आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला असून, म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने पाणी व खाद्याच्या शोधत हरणाचे कळपे मानवीवस्ती व पाणी - पिके असलेल्या शेत - शिवाराकडे धाव घेत आहेत. अश्याच परिस्थितीत आलेल्या वन्य प्राण्यांच्या कळपावर पिछोंडी, हिमायतनगर, सवना, कारला परिसरात काही शिकार्यांनी जाळे पसरविले आहे. धावणाऱ्या कळपावर लाठ्या काठ्यांनी हल्ला करून जखमी करून त्यांची शिकार केली जात असल्याची चर्चा आहे. एवढेचे नव्हे तर काही शिकार्यांनी तर खवय्यांसाठी हरण व मोरांचे मांस १०० ते १५० रुपये किलो दराने विक्री करीत असल्याचे आजच्या घटनेतून बोलले जात आहे. 

मागील तीन वर्षापूर्वी पिछोंडी परिसरातील रेल्वे पट्टीवर हरणाची हत्या करून खाद्य बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हि बाब काहींही पाहतच हरणाचे शव त्यच ठिकाणी ठेऊन शिकारी फरार झाले होते. तर नांदेड - किनवट राज्य रस्त्याजवळ हिमायतनगर शिवारात हरणाचे शीर खड्ड्यात फेकून धड गायब करण्यात आले होते. तर कारला शिवारात एकाच दिवशी ५० ते ३५ मोराची कत्तल केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर हिमायतनगर तालुक्यात वन्य प्राण्यांची कत्तल होत असल्याचे वृत्त आम्ही प्रसिद्ध केले होते. परंतु वनविभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष न देत अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच कि काय पुन्हा तालुक्यात शिकारी सक्रिय झाल्याचे आजच्या घटनेतून दिसून येत आहेत. अश्या प्रतिक्रिया घटनास्थळावर उपस्थित काही वन्यप्रेमी नागरिकांनी विचारल्या आहेत. त्यामुळे कि काय..? प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून वनविभागाने नीळ हरनाच्या मृत्यूचा आपल्याच अखत्यारीत पंचनामा करून परस्पर प्रेताची विल्हेवाट लावली आहे. आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत नर जातीच्या हरणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र हरणाचा मृत्यूचे नेमके कारण अद्याप गूढ आहे. 

जखमी हरीण पुढील उपचारासाठी नांदेडला 

वन विभागाच्या कर्मचार्यांनी शव विच्छेदन न करताच हरणाचे प्रेत जाळून नष्ठ केले आहे. त्याच्या काही वेळानंतर याच परिसरात हरणाची शिकार करणारी टोळी कारला येथील काही युवकांना दिसली, त्यांचा पाठलाग करताच त्यांनी एका जखमी हरणास झुडपात लपऊन ठेऊन पळ काढला आहे. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर त्या जखमी हरीनास ताब्यात घेऊन येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यास गंभीर दुखापत झाली असून, समोरील डावा पाय तुटला तर कम्ब्रेतही चांगलाच मार लागल्याने उठून उभे राहणे कठीण असून, मृत्यूशी झुंज देत असल्याने पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी नांदेडला नेण्याचा सल्ला वनकर्मचार्यांना दिला आहे. 


हरणाच्या मृत्यूची चौकशी व्हावी... पाटील 

हरणाची कातडी काडलेली दिसते आणि त्याच्या अंगावरचा मास काढून या हथ्याखोरांनी खालेले आहे, मृत हरणाचे तोंड सुस्थितीत आहे. हा प्रकार हत्येचाच आहे. हे वानविभागवाले असेच म्हणणार आहेत. कारण त्यांना काम लागते ना.. परंतु याची चौकशी वनविभागाने केली पाहिजे खरे हत्येखोर कोण आहेत, हरणाचे प्रेत जाळून टाकण्यात वनपाल, वनरक्षकाने घाई का केली..? हे वन विभागाने समोर आणले पाहिजे अशी मागणी पर्यावरण व वन्यजीव संरक्षण संस्थेचे विनोद कुटे पाटील यांनी केली आहे.
याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी श्री वाकोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, वनविभागा एवढीच वन्यप्राणी सुरक्षेची नागरिकांचीही जबाबदारी असल्याचे सांगत शिकारी सापडले तर कार्यवाही निश्चित करण्यात येईल, परंतु सदरील घटना हि अपघात असल्याचे सांगून शिकारी सक्रिय असल्याच्या वृत्तास नकार दिला. 
या बाबत एका वन कर्मचार्याशी खाजगीत बातचीत केली असता ते म्हणाले कि, कदाचित शिकारी टोळी पाठीमागे लागली असेल, त्यामुळे सैर वैरा पळणार्या हरणाच्या काळापा पैकी एक हरीण वाहनाच्या धडकेने मरण पावला. तरी देखील शिकार्याने हरणाचे मास व कातडी कडून नेली असल्याने प्रेताची अवस्था अशी झाली असावी अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली. 

टिप्पणी पोस्ट करा