NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

गुरुवार, १० जुलै, २०१४

खरीप हंगामवर्ष सुख समृद्धीची प्रार्थना

आषाढी एकादशी निमित्ताने टाळ - मृदंगाच्या गजरात नगरप्रदक्षिणा दिंडी हिमायतनगर(अनिल मादसवार) शहरातील महिला - पुरुष विठ्ठल भक्तांनी आषाढी एकादशी उत्सवा निमित्ताने टाळ - मृदंग आणि विठू नामाच्या गजरात नगर प्रदक्षिणा दिंडी काढून पंढरपूरच्या पाई वारीचा आनंद घेतला. तसेच आगामी खरीप हंगामवर्ष सुख समृद्धीचा होओ, पाऊस पाणी होऊन दुष्काळाची छाया दूर कर... अशी प्रार्थना करून येथील परमेश्वर मंदिरातील श्रीचे व विठ्ठल रुखमाई चे दर्शन घेऊन पुण्यप्राप्त केले. 

दर वर्षी शहरातील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर व बोरगडी येथील विठ्ठल मंदिरात पंढरपूर यात्रा उत्सव आणि आषाढी एकादशी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. या निमित्ताने मागील चार दिवसापासून अखंड विना पारायण, हरिनाम व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरु आहे.  बोरगडी येथील माउली ज्ञानेश्वर महाराज यांच्या मधुर वाणी व मंदिर विश्वस्तांच्या उपस्थित शेकडो महिला, पुरुष, बालके, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करीत आहेत. साप्ताह दरम्यान आलेल्या आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी संप्रदायीक महिला - पुरुष, बालकांनी विठ्ठल नामाचा गजर करीत हातही भगव्या पताका घेऊन..विठूनामाचा गजर करीत, टाळ -मृदंगाच्या वाणीत हरिनामाचा गजर करीत वाढोणा शहराला नगर प्रदक्षिणा केली आहे. 

नगर प्रदक्षिणा दिंडीत शेकडो महिला व बालकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान शहरच्या गावाबाहेरील व शहरातील सर्व मंदिरातील देवी - देवतांचे दर्शन घेऊन पंढरपूर यात्रेला गेल्याचा काहींसा अनुभव दिंडीत सामील झालेल्यांनी घेतला आहे. पावसातही टाळ -मृदंगाच्या गजरात व भजनी मंडळाच्या आवाजाने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. आषाढी एकादशी दिनी नगर प्रदक्षिणा काढण्याची हि परंपरा मागील शेकडो वर्षापासून मंदिर समितीच्या पुढाकारातून  अविरतपणे सुरु असून, भजन गीते व प्रसाद वाटपाने दिंडीचा समारोप श्री परमेश्वर मंदिरात परत येउन करण्यात आला आहे. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची पालखी शोभा यात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून ढोल - ताश्याच्या गजरात काढण्यात येउन, महाप्रसाद, अन्नदानाच्या पंगतीने समारोप केल्या जाणार आहे.    
टिप्पणी पोस्ट करा