NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, २० जून, २०१४

बोगस मतदान..!

हिमायतनगर(अनिल मादसवार)विधान परिषदेसाठी औरंगाबाद - ५ पदवीधर मतदार संघातून उमेदवार निवडीसाठी दि.२० रोजी मतदान होत असताना एका शिक्षक मतदाराच्या नावे कोण्यातरी अज्ञाताने मतदान प्रक्रियेचे सोपस्कार पार पाडून मतदान करून गेल्याची घटना हिमायतनगर येथील जी.प.शाळेवरील मतदान केंद्रावर घडली आहे.

शुक्रवार दि. २० रोजी तालुक्यातील सर्व पदवीधर मतदारान मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जी.प.हायस्कूल येथील मतदान केंद्रावर मतदान पार पडले. या केंद्रावर राजा भगीरथ विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक यु.एम.जाधव पसंतीच्या क्रमाने मतदान देण्यासाठी केंद्रावर गेले असता त्यांच्या नावाने कोण्यातरी अज्ञात व्यक्तीने मतदान केल्याचे उघड झाले. मूळ मतदानाचा हक्क हिरावल्या जाऊ नये म्हणून मतदान केंद्राधिकारी यांनी प्रदत्त मतदान देण्याची व्यवस्था करून मतदानाचा हक्क अबाधित ठेवला. मात्र सुशिक्षित समजल्या जाणार्या मतदार संघात बोगस मतदान झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. बोगस मतदाराने निवडणूक आयोग व एका गुरुजीस मामा बनविले याची चर्चा होत आहे. आपल्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणण्यासाठी मतदाराच्या एका गटाने हे कुट्या केले असावे अशी शंका व्यक्त केली जात आहे. बोगस मतदान करणारा कुणीतरी जाधवच होता काय..? हा प्रश्न अजून तरी अनुत्तरीत आहे. दरम्यान सायंकाळी ३.३० वाजता या बंदोबस्तासाठी नियुक्त उपविभागीय पोलिस अधिकारी श्री औटे यांनी भेट देऊन पाहणी केल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी मतदान केंद्राधिकारी यु.ए.सय्यद यांच्याशी संपर्क साधला असता नाव साधर्म्यामुळे असा प्रकार झाल्याचे सांगून, प्रदत्त मतदान करण्यात आल्याचे संगितले.

हिमायतनगर केंद्रावर ५० टक्के मतदान

दि.२० जून २०१४ रोजी पार पडलेल्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद हायस्कूल हिमायतनगर येथे मतदान झाले असून, यात ४५३ पैकी २७६ मतदान ४९.९० टक्के झाले आहे. यात २५६ पुरुष मतदार व २० महिला पद्विधार्मातादारणी हक्क बजावल्याची माहिती केंद्राधिकारी यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा