NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

रविवार, ८ जून, २०१४

शिक्षकाचा मृत्यू

नांदेड(अनिल मादसवार)हिमायतनगर तालुक्यातील पवना येथे पोहण्यासाठी विहिरीत उतरलेल्या एका शिक्षकाचा मृत्यू झाला हि घटना दि.०८ रोजी सायंकाळी ०६.३० वाजेच्या दरम्यान घडली आहे. 
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मुळचा मौजे पवना येथील रहिवाशी असलेला मयत शिक्षक मारोती भीमराव निलपवाड वय ४५ वर्ष हा माधवराव माने यांच्या शेतातील विहिरीत पोहण्यासाठी उतरला असता पाण्यात बुडून मरण पावला आहे. तो भोकर तालुक्यातील दिवशी कांदळी तांडा येथील शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे समजते. शिक्षक उतरलेल्या विहिरीत पाणी भरपूर असल्याने बुडालेल्या शिक्षकास काढण्याचे धाडस कोणीच केले नसल्याने शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. सदरील वृत्त लिहीपर्यंत घटनास्थळी पोलिस पोहोंचली असून, रीतशीर पंचनामा करून कार्यवाही करण्याचे काम सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील चव्हाण यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले.

सध्या उन्हाचा पर वाढला असून, तालुक्यात ४४.० अंश सेल्सियस पर्यंत तापमान गेले आहे. परिणामी सव सामान्य नागरिकांच्या नागाची लाही लाही होत आहे. या उकाड्यापासून दिलास मिळविण्यासाठी सदर शिक्षक हा पोहण्यासाठी विहिरीत उतरला असल्याचे घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा