NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, २३ मे, २०१४

बसस्थानक केंव्हा होणार...?

हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरासारख्या तालुक्याच्या ठिकाणी मागील ५५ वर्षापासून बसस्थानक नसून प्रवाशांना बसण्यासाठी प्रवाशी निवारा तर सोडा, साधे टीन शेडही नाही. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय तर सोडाच बसेस येण्या-जाण्याचे साधे वेळपत्रकही या ठिकाणी लावलेले नाही. मंदिराच्या मैदानात असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली व समाधीच्या ओट्यावर उन्हात व पावसात बसून प्रवाश्यांना बसची वाट बघावी लागत असल्याचे साध्यचे चित्र आहे. परिणामी श्रीक्षेत्र असेलल्या परमेश्वर नगरीत ये - जा करणार्यांना अनंत अडचनीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात सत्ताधारी पुढारी असताना सुद्धा हा प्रश्न अजूनही रेंगाळत असून, हि प्रलंबित मागणी कधी पूर्ण होईल..? असा सवाल जनता विचारावत आहे. 

तालुका तिथे आगार..या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी मागील सात वर्षाच्या काळात सर्वत्र झाली. त्यावेळी नांदेड जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात बसस्थानका बरोबर आगाराचाही प्रश्न निकाली काढल्या गेला होता. मात्र नव्याने तालुका होऊन १५ वर्ष लोटलेल्या हिमायतनगर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी आगार तर नाहीच...परंतु साधे बस स्थानक सुद्धा बांधण्यात आले नाही हि खेदाची बाब आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून हिमायतनगर शहरातील सी परमेश्वर मंदिराच्या मैदानात बसेस उभ्या केल्या जातात. या ठिकाणाहून विदर्भ - आंध्रप्रदेश - मराठवाडा आदी ठिकाणच्या गाड्यांची वर्दळ नेहमीच सुरु असते. तसेच रेल्वे रुंदीकरणानंतर एक्सप्रेस व पैसेंजर रेल्वगाड्या ह्या सकाळ, दुपार व सायंकाळी या ठराविक वेळेत येतात. जास्तीत जास्त प्रवाश्यांना बसचे वेळापत्रक नसल्यामुळे खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. तर जेष्ठ नागरिक मात्र बसने प्रवास करण्यासाठी तासनतास भर उन्हात व पावसात वात पाहत बसतात. प्रवाश्यांची हि समस्या लक्षात घेतापरमेश्वर मंदिर कमेटीने बस उभ्या करण्याची सोय केलेली आहे. मात्र येथे साधे प्रवाशी निवारे नसल्यामुळे ऊन, पावसाचा सामना करावा लागतो आहे. तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीच्या वाडी - तांड्यातील व बाहेरगावाहून ये - जा करणाऱ्या प्रवाश्यांना एस.टी.महामंडळाच्या या दुर्लक्षित कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मागील ५० वर्षापासून येथिउल काही राजकीय व्यक्तींच्या स्वार्थामुळे झालेल्या ओढाताणीचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. खरे पाहता बसस्थानक हे रेल्वे लाईन नजीक असायला हवे मात्र या राजकीय व्यक्तींच्या मतभेदामुळे बसस्थानकाचे भिजत घोंगडे अजूनही दिसत आहे. हिमायतनगर तालुका केवळ रस्ते, नाल्या, बांधकामाच्या विकासात आघाडीवर असून, महत्वाच्या बसस्थानकाच्या प्रश्नात अजूनही मागेच आहे. आता तरी जबादार लोकाप्रतीनिधिनी बस स्थानकासाठी जागा उपलब्ध करून शासनाच्या निर्णयानुसार तालुका तिथे आगार या योजनेतून हिमायतनगर येथील बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लावावा अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत आहे. याकडे लोकप्रतिनिधी लक्ष नाही दिल्यास आगामी काळात हिमायतनगर शहरात बसस्थानक होईल कि नाही.. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा