NEWS FLASH रजनीकांत के बाद कमल हासन की राजनीति में एंट्री, 26 से करेंगे तमिलनाडु का दौरा,... अमेठी से मिशन 2019 का आगाज करने जा रहे हैं राहुल, रास्ते में खाई चाट - पकौड़ी,... 'घर का मामला था, जिसे सुलझा लिया गया है': जज विवाद पर बोले BCI चीफ,... कुरुक्षेत्र में 'निर्भयाकांड', नाबालिग से गैंगरेप के बाद निर्मम हत्या,... रिपब्लिक डे पर धमाकेदार ऑफर, महज डेढ़ हजार में कर सकेंगे हवाई सफर,... दिल्ली की एक प्लास्टिक फैक्ट्री में लगी भीषण आग, लाखों रुपए का सामान जलकर खाक,... वसीम रिजवी को सिर कलम करने की धमकी, मदरसों पर उठाए थे सवाल,... छग : फिल्म 'नायक' की तरह पार्षद ने की एक दिन का सीएम बनाने की मांग,... Army Day: शहीदों के साहस और जज्बे को राष्ट्रपति और प्रधानमंत्री ने किया सलाम, ..., **

शुक्रवार, २ मे, २०१४

युवकाची गळा दाबून हत्या...

वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अहवालातून.. त्या अज्ञात युवकाची गळा दाबून हत्या... 


हिमायतनगर(वार्ताहर)बोरगडी रस्त्यावरील शेत शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याच्या स्थितीत मंगळवारी ३५ वर्षीय अज्ञात युवकाचे प्रेत आढळून आले होते. याबाबत नागरीकातून तर्क वितर्क लढवीत असताना वैद्यकीय अधिकार्यांनी केलेल्या शव विच्छेदनाच्या  अहवालातून त्या अज्ञात युकाची " गळा दाबून हत्या " केल्याचे समोर आले आहे. त्याची हत्या कोणत्या करणातून झाली हे अजूनही गुलदस्त्यात आहे. अजूनही सदर मयत युवकाची ओळख पटली नसल्याने तपास करणारे पोलिस मात्र हैराण आहेत. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहरापासून हाकेच्या अंतरावर बोरगडी रस्त्यावरील एका शेताच्या लिंबाच्या झाडाला एका अनोळखी ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह फाशी घेतल्याच्या अवस्थेत दि.२९ एप्रिल रोजी आढळून आला होता. यची खबर मिळताच पोलिसांना घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान मयत युवकाचे प्रेत हे एका लिंबाच्या झाडाच्या फांदीला पांढऱ्या दस्तीने लटकल्याचे होते, तर मयताचे पाय मात्र जमिनीला तिरप्या अवस्थेत लटकउन ठेवल्याचे  दिसले. यावरून पोलिसांनी सदर अनोळखी युवक हा आंध्रप्रदेश अथवा विदर्भातील कामगार असावा असा अंदाज वर्तविला. त्यानंतर मयताचे शवविच्छेदण सरसम प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चव्हाण यांनी केला. दरम्यान त्यांनी दिलेल्या अभिप्राय अहवालात सदर युवकाचा मृत्यू हा गळा दाबून झाला असावा. आणि हा खून करून कोण्यातरी अज्ञात आरोपीने आत्महत्या दर्शविण्यासाठी लिंबाच्या झाडाला दस्तीने लटकविल्याचा अहवाल दिला आहे.

त्यामुळे अज्ञात युवकाच्या मृत्यूचा तपास लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून, मयत अज्ञात.. आरोपी अज्ञात.. त्यामुळे त्याचा खून कश्यासाठी झाला, कोणी केला या प्रश्नाची उत्तरे शोधणे पोलिसांना कठीण झाले आहे. वैद्यकीय अधिकायाच्या अहवालावरून हिमायतनगर पोलिस स्थानकात कलम ३०२ अन्वये फिर्यादी पोलिस उपनिरीक्षक सुशील चव्हाण यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
टिप्पणी पोस्ट करा