NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

सोमवार, १९ मे, २०१४

भीषण अपघात..तीन ठार

भोकर फाट्यावर जीप व ट्रकचा भीषण अपघात..तीन ठार 


हिमायतनगर(वार्ताहर)हिमायतनगरहून लग्न सोहळ्यासाठी नांदेडकडे जाणार्या एका बोलेरो जीपला भरधाव वेगातील ट्रकने जबर धडक दिल्याने तीन जन जागीच ठार तर आठ जन जखमी झाल्याची घटना भोकर फाट्याजवळील कलदगाव पाटीजवळ(ता.अर्धापूर) सायंकाळी ०६ वाजेच्या सुमारास घडली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर येथील काही युवक लग्नासाठी नांदेडकडे बोलेरो जीप क्रमांक एम.एच.२६ - ३६८२ मधून जात होते. सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान भोकर फाट्याच्या अलीकडील कलदगाव फाट्याजवळ येताच समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील ट्रक क्रमांक आर.जे.२७- जी. बी. ६०६९ ने जबर धडक दिली. या घटनेत बोलेर जीपचा चकनाचूर झाला असून, जीपमध्ये चालकाच्या पाठीमागे बसलेल्या अब्दुल लतीफ शे.आलम वय २४ वर्ष, मो.इम्रान मो.राहिमोद्दिन वय २० वर्ष, सय्यद आसिफ स.इसुफ वय २५ वर्ष सर्व रा. जनता कॉलनी, हिमायतनगर तिघे जन जागीच ठार झाले तर, मोहम्मद उमर मो.खुदुस वय २२ वर्ष, आसिफ खान दौलत खान वय २२ वर्ष, शेख हनीफ अ.खदिर वय २२ वर्ष, जाकीर खान जफर खान वय २० वर्ष, शेख युनुस शे.महेमूद वय २० वर्ष, शेख महेबूब शे.खदिर वय २४ वर्ष (नवरदेव), यांच्यासह अन्य दोन जन जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच बारड महामार्ग स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक रहेमान शेख, पोलिस कोंस्तेबल दीपक ओडणे, श्रीनिवास रेड्डी, चालक सुभाष बसवंते यांनी तातडीने जखमींना नांदेडच्या गुरुगोविंद मेमोरियल रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, चालक मात्र फरार झाला आहे. 
टिप्पणी पोस्ट करा