NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

रविवार, १८ मे, २०१४

ठक्करबाप्पा योजनेच्या मात निकृष्ठ्पणा

अभियंत्याच्या आशीर्वादाने ठक्करबाप्पा योजनेच्या मात निकृष्ठ्पणा 

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील मौजे गणेशवाडी येथील ग्रामपंचायती अंतर्गत करण्यात येत असलेल्या ०७ लक्ष रुपयाच्या सिमेंट रस्त्याच्या कामात अतिशय निकुष्टपणा आणला जात असून, याकामाकडे लक्ष देणाऱ्या अभियंत्यांनी गुत्तेदार व ग्रामसेवकास अभय दिले आहे. परिणामी सदरची कामे अल्पावधीतच धुळीत मिळण्याची शक्यता आहे. सदर कामाची गुननियन्त्रक मापक मशीनद्वारे चौकशी करून लालची ग्रामसेवक व गुत्तेदार व पुढार्यावर कायावाही करावी अशी मागणी येथील माजी सरपंच वामनराव जाधव व ग्रामस्थांनी केली आहे.

तालुक्यातील बहुतांश ग्राम पंचायतीत ठक्करबाप्पा योजनेतील कामांची पुरती वाट लावण्याऱ्या  अधिकारी पदाधिकार्यांना येथील पंचायत समितीचे विद्यमान गटविकास अधिकारी व अभियंत्याचे  अभय मिळत आहे. परिणामी शासनाकडून प्राप्त झालेल्या योजनाची कामे निकृष्ठ दर्जाचे करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. असे प्रकार करणाऱ्या एकंबा, कारला - पिच्चोंडी येथील ग्रामसेवकावर अपहार प्रकरणी वर्षभरापूर्वी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे होत असले तरी तालुक्यातील जीरोना - गणेशवाडी - गणेशवाडीतांडा या गट ग्रामपंचायतीत कार्यरत ग्रामसेवक पुपलवार यांनी विद्यमान उपसरपंच बळवंत राठोड, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, अभियंता यांना हाताशी धरून निकुष्ठ कामाचा सपाटा लावला आहे. आदिवासी भागात येत असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे गणेशवाडी येथे ठक्कर बाप्पा योजनेतील ५ लक्ष रुपयाच्या निधीतून सिमेंट रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. या कामात ग्रामसेवक महाशय यांनी सोलिंगमध्ये विहिरीचा ठिसूळ दगड, नाल्याची काळी माती मिश्रित रेतीचा वापर सुरु केला आहे. एवढेच नव्हे तर १३ ब्रास काम करण्याचे असताना गुत्तेदारास हाताशी धरून दोन ते तीन ब्रास काम कमी करण्याचे सांगितले होते. हि बाब समोर आल्याने व रस्त्याच्या कामात वापरण्यात येत असलेल्या दगड - रेतीची पाहणी करून ग्रामस्थांनी वीरोध करून सदर रस्त्याची माती अल्पावधीतच होईल अश्या प्रतिकिया दिल्या आहेत. 

निकुष्ठ प्रकारचे माटेरीयल टाकताच ग्रामस्थांनी विरोध करून गुत्तेदारास काम करण्यास मज्जाव केला आहे. तरीदेखील राजकीय वरदहस्त प्राप्त येथील उपसरपंचाच्या जोरावर अडाणी सरपंचास अंधारात ठेऊन ५ लाखाच्या निधीचे काम ग्रामसेवकाने हिमायतनगर शहराच्या ठिकाणी राहून अत्यंत निकृष्ठ पद्धतीने करून शासनाचा निधी गिळंकृत करण्याचा प्रयत्न चालविला आहे.   

या निकृष्ठ रस्ता कामाच्या प्रकाराकडे औरंगाबाद आयुक्त, जिल्हाधिकारी व कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी लक्ष देऊन कामात वापलेल्या व वापरण्यात येत असलेल्या निकृष्ठ साहित्याची गुणनियंत्रक मापक मशीनद्वारे चौकशी करून आदिवासी वस्तीतील कामाचा दर्जा सुधारावा तसेच मागील १० ते १५ वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून निकृष्ठ व अर्धवट कामे करणाऱ्या ग्रामसेवकास निलंबित करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. कामाची चौकशी न झाल्यास वेळ प्रसंगी उपोषणाचा मार्ग अवलंबिणार असल्याचे सांगितले आहे. 

मागील सात - आठ महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासन योजनेच्या ठक्कर बाप्पा योजनेतून गणेशवाडी ग्रामपंचायत जीरोणा अंतर्गत येथे ५ लक्ष रुपयाच्या निधीतून सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले.  मात्र अल्पावधीतच हा रस्ता फुटून धुळीस मिळाल्याचे दिसून येत आहे.   
टिप्पणी पोस्ट करा