NEWS FLASH नांदेड़ पुलिस भर्ती में बड़ा घोटाला, होणे के बाद परीक्षा रद्द 15 गिरफ्तार, और भी जगह घोटाला आ सकता है सामने, ..., **

शुक्रवार, १६ मे, २०१४

महाराष्ट्रात कॉंग्रेसला दोन जागा

हिंगोली/नांदेड(प्रतिनिधी)नुकत्याच संपन्न झालेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड - हिंगोलीतून कॉंग्रेसचे उमेदवार तर लातूर मधून भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. यांच्या विजयाचा जल्लोष फटके फोडून केला जात आहे.

हिंगोली लोकसभा निवडणुकीत नुकत्याच संपन्न झालेल्या २४ फेर्यांच्या मतमोजनीतील शिवसेना - कॉंग्रेस या दोन प्रमुख पक्षामध्ये झालेल्या शेवटच्या टप्प्यातील मतमोजणीत सुभाष वानखेडे समोर असताना अचानक कलाटणी मिळाल्याने राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राजीव सातव यांचा १ हजार ६०० मतांनी निसटता विजय झाल्याचे सांगण्यात आले आहे.

नांदेड लोकसभा मतदार संघात झालेल्या 22 फेर्यांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार डी.बी.पाटील यांना पाठीमागे टाकले होते. शेवटी अशोक चव्हाण हे ८७ हजार मतांनी विजयी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळ्यामुळे मुख्यमंत्रीपद गमवावे लागले होते. त्यानंतर त्यांच्यासाठी राजकारणातील परतीचे दार कायमचे बंद झाल्याचे बोलले जात होते. मात्र अनेक चढ-उतारानंतर अशोक चव्हाण यांच्या पदरी याप्रकरणात राज्य सरकारची क्लीन चिट पडली. त्यानंतरही काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या संतापामुळे अशोक चव्हाण यांची कोंडी कायम राहिल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र एकेक करत चव्हाण यांच्यापुढील विघ्नं दूर होत गेली. तर लातूर लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार सुनील गायकवाड यांचा २.५ लाख मतांनी विजय झाला आहे.

नांदेडमधील उमेदवारीने चव्हाण यांचा काँग्रेसमधील वनवास खऱ्या अर्थाने संपला. ही उमेदवारीही त्यांना नाट्यमयरीत्या मिळाली. आधी चव्हाण यांच्या पत्नीने या मतदारसंघातून अर्ज भरला होता. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस उरला असतानाच अचानकपणे दिल्लीतून नांदेडसाठी चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर घोटाळ्याचा डाग लागलेले चव्हाण जिंकतील का? हा मोठा प्रश्न होता. मात्र देशात आणि राज्यात मोदीलाट असताना, माजी मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह राज्यात काँग्रेसचे बहुतेक सर्वच उमेदवार पराभवाच्या छायेत असताना चव्हाण आणि सरतेशेवटी राजीव सातव हे या लाटेतून तरल्याचे दिसत आहे.
टिप्पणी पोस्ट करा