NEWS FLASH नांदेड़ पुलिस भर्ती में बड़ा घोटाला, होणे के बाद परीक्षा रद्द 15 गिरफ्तार, और भी जगह घोटाला आ सकता है सामने, ..., **

बुधवार, १४ मे, २०१४

लघुशंकेचे पाट

हिमायतनगरच्या ग्राम पंचायतीत शौचालयाचा अभाव.. भिंती वाहतात लघुशंकेचे पाट


हिमायतनगर(प्रतिनिधी)संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत गावागावात ग्रामस्वच्छता अभियान राबवले जात असताना हिमायतनगर शहराची स्वच्छता तर सोडा चक्क येथील ग्रामपंचायत कार्यालयात साधे शौचालय व लघु शंकेसाठी मुतारी नसल्याची बाब उघड झाली आहे. परिणामी ग्राम पंचायत कार्यालयात येणारे अधिकारी - पदाधिकारी यांना कार्यालयाच्या भिंती आड लघुशंका करावी लागत असल्याने, भिंतीच्या माठीमागे लघवीचे पाट वाहत असल्यचे चित्र दिसत आहे. यामुळे बस स्थानक व ग्रामपंचायत पिसरत दुर्गंधी पसरल्याने कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. 

जिल्हाभरात मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या नेतृत्वाखाली संतगाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान चालविले जात आहे. याची चळवळ हिमायतनगर तालुक्यात मागील चार वर्षापासून सुरु झाली असून, ५० टक्के गावे हागणदारी मुक्त झाली आहेत. तालुक्यातील काही गावे सध्या या चळवळीत सामील झाले असून, त्या ठिकाणी सुद्धा सदरचे अभियान राबविले जात आहे. गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येक घरा-घरात शौचालय झालेच पाहिजे असा शासनाचा दबाव आहे. इतर जिल्ह्यातील पथकाकडून पाहणी करून सर्वेक्षणाअंती शासकीय, निमशासकीय कर्मचा-यांच्या घरी शौचालय बांधकाम झाले. त्याचे प्रमाणपत्र ग्रा.पं. कार्यालयाकडून दिले जाते. ज्या घरी शौचालय नाही त्यांना शासनाच्या विविध सोयी-सूविधांचा लाभ मिळणार नसल्याचेही शासन सांगते. परंतु आजवर कोट्यावधीची बक्षिसे मिळविलेल्या हिमायतनगर तालुक्यातील गावागावात हग्न्दाई मुक्त योजना पारदर्शीप्रमाणे राबविली जात असून, मात्र हिमायतनगर शहर स्वच्छता अभियानापासून कोसो दूर आहे. 

एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत संबोधल्या जाणार्या हिमायतनगरच्या ग्रामपंचायीमध्ये शौचालयाचा अभाव दिसून येत आहे. ग्राम पंचायतीची इमारतही खिळखिळी झाली असून, याच इमारतीच्या भिंती आड लघुशंका केली जात असल्याने कार्यालयात दुर्गंधी सुटली आहे. तर इमातीच्या भिंती आड लघु शंका केली जात असल्याने अक्षरश्या लघवीचे पाट वाहत असल्याचे दिसून येते आहे. परिणामी या दुर्गंधीमुळे कार्यालयात सरपंच - उपसरपंच यासह ग्रामपंचायत सदस्य जास्त काळ टिकून बसत नसल्याने सामन्यांचे कामे मात्र खोळबंत आहेत. शहराच्या विकास करण्यासठी लाखो तुप्याच्या निधीतून सिमेंट रस्ते बांधले जात आहेत. मात्र ग्रामपंचायतीत साधे शौचालय बांधण्याचा मुहूर्त मिळत नसल्याचे संबंधितांच्या हलगर्जीपणाच्या कारभारावरून दिसत आहे.  या प्रकाराकडे संबंधितानी लक्ष देऊन हिमायतनगर शहरात स्वच्छता अद्भियान राबविण्याबरोबर प्रथम ग्राम पंचायतीत शौचालय बांधून होत असलेली कुचंबना थांबवावी अशी रास्त अपेक्षा कामानिमित्त कार्यालयात येणाया जनतेतून केली जात आहे. 


याबाबत ग्राम विकास अधिकारी श्री आडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सार्वजनिक शौचालय व मुतारी बांधल्या जाऊ शकते. परंतु यासाठी मासिक बैठकीत ग्राम पंचायत सदस्यांनी ठराव घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगून, दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला.  

याबाबत सरपंच गंगावाई शिंदे यांच्याशी संपर्क  केला असता त्या म्हणाल्या कि, याच बाजूला देशीचे दुकान आहे, त्यामुळे दारुडे दारू ढोसून याच ठिकाणी लघुशंका करतात. आगामी महिन्याच्या बैठकीत शौचालय बांधकामाचा प्रस्ताव मांडून बांधकाम करण्यासाठी प्रयत्न करू. तसेच इमारतीच्या भिंतीवर लघुशंका करणार्यांना दंडाची तरतूद करण्यात येईल. यासाठी सर्व सदस्यांचे सहकार्य लाभणे गरजेचे आहे.
टिप्पणी पोस्ट करा