NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

सोमवार, १२ मे, २०१४

अतिवृष्टी व गारपीट

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील बोरगडी - बोरगडी तांडा येथे माहे जुलै २०१३ मध्ये झालेली अतिवृष्टी व मार्च २०१४ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी तलाठी शेख मुस्सा, ग्रामसेवक शिलेवाड, कृषी सहाय्यक माजळकर यांची मागणी पूर्ण न केलेल्या शेतकर्यांना शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या मदतीपासून वंचित ठेवल्याची तक्रार येथील २० ते २५ ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. तातडीने संबंधितांवर कार्यवाही करून निलंबित करावे आणि खरे नुकसान झालेल्यांना शासनाची मदत मिळून द्यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.

विदर्भ - मराठवाड्याच्या सिमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदी तीरावर बोरगडी - बोरगडी तांडा गाव्वासलेले आहे. या गावांना नेहमीच अतिवृष्टी व गारपीटीचा फटका बसतो. असच फटका सन २०१३ च्या जुलै - ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टी व सन २०१४ च्या मार्च महिन्यात झालेल्या वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे संबंधित नदी काठावरील गावाच्या शेतकर्यांना बसला आहे. अतिवृष्टीत खरडून गेलेल्या जमिनी व पिकंचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून खर्या शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी असे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री सुरेश धस यांनी दिले होते. तर गारपीट भागातील शेतकर्‍यांचे हाताशी आलेले रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कापूस व ज्वारी ही पिके नेस्तानाभूत झाली. तसेच शेत शिवारातील आंब्यांचा मोहर पूर्णत: नष्ट झाला आहे. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा सर्वे करुन शासनातर्फे तात्काळ मदत देण्यात येणार असल्याने हिमायतनगर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचे सर्वे कण्यात आले. त्यावेळी बोरगडी - बोरगडी तांडा भागातील तलाठी श्री शेख मुस्सा, ग्रामसेवक श्री शिलेवाड, कृषी सहाय्यक श्री माजळकर यांनी नुकसानीची नोंद वरिष्ठ स्थरावर पाठविण्यासाठी शेतकर्यांना प्रत्येकी ३ हजार रुपयाची मागणी करण्यात आली. परंतु केवळ मागणीची रक्कम न दिल्यामुळेच संबंधिता अधिकार्यांनी आमचे नाव नुकसानग्रस्त यादीतून वगळले आहे. स्वार्थापोटी नुकसानीच्या यादीतून वगळून शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकाची चौकशी करून मदतीपासून वंचित ठेवल्याप्रकरणी निलंबित करावे. तसेच जायमोक्यावर जाऊन खर्या अर्थाने झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकर्यांना मदत मिळून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी धीरज कुमार, उपविभागीय अधिकाई किनवट, तहसीलदार हिमायतनगर, तालुका कृषी अधिकारी हिमायतनगर यांच्याकडे करण्यात आली आहे. यावर प्रेमराव किशनराव चव्हाण, चिमणाबाई किसान चव्हाण, ज्ञानेश्वर संभाजी काईतवाड, सिधुबाई प्रेम चव्हाण, प्रेम कानिराम चव्हाण, बेबीबाई देवराव चव्हाण, प्रबत संतोबा काईतवाड, विजयाबाई नरेंद्र चव्हाण, संभाजी राजाराम काईतवाड, बालाजी गंगाधर सोलेवाड, नामदेव संभाजी काईतवाड, यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्या आहेत. 
टिप्पणी पोस्ट करा