NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

गुरुवार, १ मे, २०१४

आमरण उपोषण

हिमायतनगर(अनिल मादसवार)कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पोटा बु.येथील मनीषा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या गैर सोई व शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीत होत असलेल्या गैर कारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गजानन वानखेडे यांनी दि.३० एप्रिल पासून, शाळेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील पोटा बु. येथे असलेल्या जगदीश शिक्षण प्रसारक मंडळ दाबदरी द्वारा संचालित मनीषा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा जगदीशनगर येथे चालविली जाते. मागील अनेक दिवसापासून संबंधित शाळेचा कारभार पाहणारे अध्यक्ष सचिव यांच्यासह संचालकांनी राजकीय वरद हस्ताच्या जोरावर नांदेड येथील समाज कल्याण अधिकार्यांना हाताशी धरून मनमानी कारभार अवलंबविला आहे. आश्रम शाळेतील निवासी विद्यार्थ्यांना सुविधा देण्याच्या नावावर लाखो रुपयाचा निधी जमून विद्याथ्यांना मात्र गैर सुविधेत लोटण्याचा सपाटा सुरु ठेवला आहे.

शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी - विद्यार्थीनीना सकाळी संध्याकाळी शौच्चालायासाठी तांब्या घेऊन बाहेर पडावे लागत असल्याचे चित्र वारंवार दिसून येत आहे. शाळेच्या समोरच नांदेड किनवट हा रहद्दारीचा राज्य रस्ता असून, या ठिकाणाहून अवजड वाहनाच्या वातुकीची वर्दळ सुरूच असते. पैनामी शौच्चासाठी बाहेर पडणे विद्यार्थ्यांच्या विवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना जेवणासाठी वऱ्हांड्यात बसावे लागत असून, जेवणाच्या वेळी सुटणारी हवा त्यामुळे उडणारी धूळ आणि केकाचारा याचा आस्वाद विद्यार्थ्यांना घ्यावा लागत आहे. परिणामी याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची दात शक्यता आहे. त्याच बरोबर अनेक भौतिक सुविधांपासून विद्यार्थी वंचित असून, शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी वाघिणीचे दुध नसून.. संस्था चालकांच्या मलई काढण्याचे साधन बनले आहे. येथील संस्था चालकांच्या घरातील माणसे फक्त नावालाच शाळेवर नौकरीला असून, घरी बसूनच शासनाची लाखो उपाये पगारीच्या नावाखाली लाटून शासनाच्या तिजोरीवर अप्रत्यक्षपणे डल्ला मारत असल्याचे उपोषण कर्त्यांचे म्हणणे आहे.

यश अन्य गैर प्रकारच्या कारभारामुळे हि शाळा नेहमीच चर्चेत राहत असून, संबंधित शाळेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मागील फेब्रुवारी महिन्यात उपोषण कर्त्यांनी केली होती. परंतु समाज कल्याण अधिकार्यांनी चौकशीच्या नावाखाली आपले उखळ पांढरे करून घेऊन संस्थाचालकास झालेल्या गैर कारभारात सारवासारव करण्याची संधी देऊन चौकशी गुलदस्त्यात ठेवली असल्याचे उपोषण कर्त्यांचे म्हणणे आहे. हा प्रकार लक्षात आल्यानेच तक्रार कर्त्यांनी दि.३० एप्रिल पासून मनीषा आश्रम शाळेच्या गेट समोरचा उपोषण मांडून प्रत्यक्ष उपस्थिती चौकशी करावी असा आग्रह धरला आहे. आता तरी समाज कल्याण विभागाचे अधिकारी गैरकारभार करणाऱ्या मनीषा आश्रम शाळेची चौकशी करतील का..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा