NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

गुरुवार, ३ एप्रिल, २०१४

२० लाखाची रोकड पकडली

२० लाखाची रोकड पकडली

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच आज रामतिर्थ पोलिसांच्या तपासणी मोहिमे दरम्यान नरसी येथे एका इंडिका कारमध्ये रोख 20 लाखांची रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली असून ही रक्कम कशासाठी व कोणासाठी नेण्यात येत होती याबद्दल कारमधील इसमांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

नांदेड लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरु असून मातब्बर उमेदवारांच्या रंगतदार लढतीमुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. अशा परिस्थितीत संभाव् अनैतिक आर्थिक उलाढाल रोखण्याच्या अनुषंगाने पोलीस दलाकडून ठिकठिकाणी वाहनांची नाकेबंदी करण्यात येत असून यानिमित्ताने वाहनातील सामानाची कसून झडती घेण्यात येत आहे. अशाच तपासणी मोहिमेदरम्यान नरसी चौरस्त्यावर नाकाबंदी अभियान सुरु असताना आज गुरुवारी दुपारी इंडिका कार क्र.एमपी-10 सीए-1022 ही नांदेडकडून बिलोलीकडे जात असताना रामतिर्थ पोलिसांनी गाडीची तपासणी केली. या तपासणी दरम्यान गाडीतील इसमाजवळ 20 लाखांची रोकड आढळून आली. प्राथमिक चौकशीदरम्यान रकमेचा तपशिल जुळत नसल्याने सदरील गाडी रामतिर्थ पोलीस स्टेशन येथे नेण्यात आली असता अधिक चौकशीअंती गाडीतील इसमाने आपले नाव प्रकाश महाजन असल्याचे सांगितले. तसेच आपण एबंडवार यांची बिलोली जवळील जिनिंग प्रेसिंग चालवतो असेही सांगितले. सदरील रक्कम ही जिनिंग मधील कॉटन खरेदी विक्री व्यवसायातील असल्याचेही महाजन यांनी सांगितले. अशी माहिती सपोनि. संजय खंदाडे यांनी दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी सदरील रकमेच्या व्यवहाराची सत्यता पडताळून तसेच संबंधित विभाग व आयकर अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करुनच पुढील निर्ण घेण्यात येईल, असेही सपोनि संजय खंदाडे यांनी स्पष्ट केले. एकूणच ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नरसी चौरस्त्यावचर सापडलेल्या 20 लाखांच्या घबाडाने चर्चेला उधान आले असून चौकशी दरम्यान आणखी कोणते गौडबंगाल बाहेर येते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा