NEWS FLASH नांदेड़ पुलिस भर्ती में बड़ा घोटाला, होणे के बाद परीक्षा रद्द 15 गिरफ्तार, और भी जगह घोटाला आ सकता है सामने, ..., **

रविवार, ६ एप्रिल, २०१४

पराभव करणार ...खा.वानखेडे

तर ...काँग्रेस उमेदवाराचा १.५ लाख मतांनी पराभव करणार ...खा.वानखेडे

तामसा(देविदास स्वामी)आगामी होऊ घातलेल्या हिंगोली लोकसभा मतदार संघातून जनतेच्या आशीर्वादाने प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवाराचा १.५ लाख मताने पराभव करून पुन्हा संसदेवर भगवा फडकू असा ठाम विश्वास खा.सुभाष वानखेडे यांनी बोलून दाखविला. ते तामसा येथील महायुतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत व्यापारी असोशियांचे अध्यक्ष विजयकुमार लाभशेटवार, प्रतिष्टीत व्यापारी रविकुमार बंडेवार, तामसा जी.प.सदस्य रमेश घंटलवार, आष्टीचे जी.प.सदस्य गजानन पवार पथराडकर आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, माणसाचे नशीब व कर्तव्याची जोड अशी सांगड असल्यास थोरांचा आशीर्वाद व जनतेच्या आशीर्वादाने मी मागील १५ वर्षाच्या कार्यकाळात आमदार होती.तर ५ वर्ष खासदार होती. दरम्यानच्या काळात विकासाची कामे केल्याने जनतेने मला निवडून दिले. माज्या काळात मी जनतेची व गोर गरीब शेतकऱ्यांची कामे केली. हदगाव तालुका परिअस्रात रस्ते, वीज, शिक्षण आदी प्रश्नाबाबत भरीव असे काम केले. सद्य देशभरात मोदीची लाट पसरली आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे मी स्वतः फिरत असलेल्या ठिकाणी मतदारांचा प्रचंड पाठींबा मिळत आहे. केदारनाथ बरोबरच जनतेचे आशीर्वाद मला विजयाकडे नेत आहेत. जिकडे तिकडे समान्य मतदारांचा प्रतिसाद मिळत असल्याने काँग्रेस च्या प्रतिस्पर्धी उमेदवार पेक्षा दीड लाख मते जास्तीचे घेऊन निवडून येईल असे ठाम मत नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा