NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

रविवार, ६ एप्रिल, २०१४

उमरखेडमध्ये वानखेडेंचा संवाद

व्यापारी विरोधी कॉग्रेसला जागा दाखवा...
व्यापारी, डॉक्टर, वकील, पंतजली योगपिठाच्या कार्यकर्त्यांशी उमरखेडमध्ये वानखेडेंचा संवाद

उमरखेड(वार्ताहर)महायुतीचे उमेदवार खा. सुभाष वानखेडे उमरखेड येथील यांनी शनिवारी उमरखेड तालुक्यातील व्यापारी, डॉक्टर्स, वकील, पतंजली योगपिठ प्रणित भारत स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद करत कॉग्रेस पक्षाच्या धोरणावर जबरदस्त टिकास्त्र सोडत कॉग्रेस सरकार हे व्यापार्‍यांच्या विरोधात असुन एल.बी.टी. सारख्या अनेक मुदयासोबत व्यापारी विरोधी कॉग्रेसचे अनेक उदाहरणे त्यंानी आपल्या भाषणात देत उमरखेड तालुका व परिसराच्या विकासासाठी मी मागील पाच वर्षात विरोधी पक्षाचा खासदार असतांना जो विकास साधता येईल तो साधला आणि उर्वरीत विकासासाठी मी कटीबध्द आहे असे प्रतिपादन केले.

खा. सुभाष वानखेडे यांनी आता जाहीर प्रचारासोबतच ग्रुप बैठका सुरु केल्या असुन त्याचाच एक भाग म्हणुन खा.वानखेडे यांनी प्रथम उमरखेड येथील व्यापारी, डॉक्टर्स, वकील, पतंजली योगपिठ प्रणित भारत स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत संबंधीताच्या अडचणी ऐकुन घेतल्या व मोदी सरकार येणार असल्याने आपल्या भागाचा विकास करुन घेण्यासाठी मला परत एकदा संधी दया. अशी भावनिक साद यावेळी खा. सुभाष वानखेडे यांनी उपस्थितांना घातली. सदर बैठकिचे आयोजन व्यापारी संजय भंडारी यांच्याकडे करण्यात आले होते.

कॉग्रेसच्या यु.पी.ए. सरकारमध्ये विकासकामात लाखो-करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला असुन या सरकारने खिसे भरण्याचे काम केले असुन भारतातील तळागाळातील जनतेचा केव्हांही विचार केला नाही शेतकर्‍यांचे प्रश्‍नी हे सरकार केव्हांच गंभीर नव्हते. अश्याच पध्दतीने मागील अनेक वर्षापासुन हे कॉग्रेसचे पुढारी जनतेस खोटे बोलुन जनतेची दिशाभुल करीत आहेत आता भ्रष्टाचारातील हाच पैसा निवडणुकीमध्ये वापरुन सत्ता हस्तगत करण्याचा यांनी प्रयत्न चालविला आहे असेही खा. सुभाष वानखेडे यांनी यावेळी सांगीतले. या बैठकिस ऍड. विलास देवसरकर, रतिराव बोरगडे, यशवंत गिरी, संजय भंडारी, राजु नजरधने, रमेश चव्हाण(जिल्हा सचिव भाजप), पांडुरंग पवार, राजेश्‍वर रायेवार, पुंडलिक कुबडे, गजानन गंगात्रे, अनुरुध्द रिघाटे, हाजी कलीमोद्दीन, स.युसुफ स. लाल, डॉ. सुरेश गोरे, ऍड. संतोष जैन, ऍड. जितु पवार, ऍड. संतोष जाधव, ऍड. पप्पु चंद्रवंशी, ऍड. शारदा शिंदे, ऍड. कु. भारती, ऍड. प्रेमानंद माळवे, सुनिल टाक, रमेश चव्हाण, डॉ. विश्वनाथ विनकरे, व्यंकटेश लोणे, डॉ. कुंदन, नितीन भुतडा, आदेश जैन, गजानन मोहळे, राजु खामणेेकर, कैलास कदम, राहुल सोनुले, रवि रोडे, नागेश भुरेवार, नितीन कलाले, पांडुरंग पराते, गजानन नरवाडे, सुरेश कल्याणकर, अतुल मैंढ, राजु उदावंत, संजय उदावंत, संजय देवकते, मोहन राठोड, राजेश चव्हाण आदी यांच्या समवेत भाजप, शिवसेना, आरपीआय, स्वा.शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शनिवारी सांयकाळी हदगांव शहरातील वेगवेगळया संघटनाशी खा. सुभाष वानखेडे संवाद साधणार आहेत.
उपस्थित सर्व संघटनानी खा. सुभाष वानखेडे यांना विजयासाठी आश्वस्त करतांनाच विजयानंतर आमच्या प्रश्‍नाना न्याय दया अशी मागणी केली.​ 
टिप्पणी पोस्ट करा