NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

रविवार, ६ एप्रिल, २०१४

वारकर्यांची दिंडी यात्रा शेगावला रवाना.....

बळीप्रथा संकल्पपूर्ती झाल्याने वारकर्यांची दिंडी यात्रा शेगावला रवाना.....

हिमायतनगर(वार्ताहर)मौजे एकंबा येथील वारकरी संप्रदायाचे भक्त गणनी मागील पाच वर्षापासून बलीप्रथा बंदीच्या यशस्वितेसाठी हिमायतनगर ते शेगाव अशी पाई दिंडी काढली जात आहे. वारकरी भजनी मंडळाच्या या प्रयत्नांना यावर्षी च्या कानोबा (कानिफनाथ) यात्रेत यश मिळाले आहे. कान्होबा दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून दिल्या जाणार्या बळी प्रथेला औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने लगाम लागल्याने वारकरी मंडळीना आनंद झाला आहे.

मागील अनेक वर्षापासून तालुक्यातील मौजे एकंबा येथे दरवर्षी दशमीच्या दिवशी नवनाथांपैकी एक असलेल्या कानोबा(कानिफनाथ) महाराजांची यात्रेत हजारो बकर्याचा बळी देण्याची कु - प्रथा चालविली जात होती. या बळी प्रथेमुळे रक्ताचे थेंब पडत असल्याने व मृत बकर्याचे शव हे उघडपणे नेले जात असल्याने हे भयावह दृश्य पाहणार्यांचे मन विच्छिन होत होते. अघोरी प्रथा रोखण्यासाठी वारकरी सांप्रदाईक भजनी मंडळाचे प्रमुख प्रभू महाराज पिटलेवाड यांनी १९७० पसून लढा उभारला, परंतु काही केले तरी हे रोखणे अवघड बनल्याने दि.३१ जानेवारी २०१४ ला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड पिठात पुराव्यानिशी याचिका दाखल केली होती. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून सबळ पुरावे लक्षात घेत दि.१० मार्च २०१४ रोजी मौजे एकंबा येथील दिल्या जाणाऱ्या बळी प्रथा बंद करण्याचा आदेश आर.एम.बोरडे आणि ए.एम.बदर यांच्या खंड पीठाने दिला. त्यांच्या प्रयत्नाने या बळी प्रथेला लगाम लागला तरी देखील, यामुळे वाद निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. त्यामुळे येथील बर्याचश्या भाविक भक्तांनी बळी देण्यासाठी आणलेली बकरी परत नेली. तर गावातील काहींनी कान्होबाचे दर्शन घेवून उत्सव शांततेत साजरा केला.

वारकरी सांप्रदाईक भक्तांचे प्रयत्नांना यश आले असून, राहिलेले शेवटची पाचव्या वारीसाठी येथील भक्तांची दिंडी ताल मृदंगाच्या तालात, हाती विना व डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन महिला भजनी मंडळी रवाना झाली आहे. सदर दिंडीचे हिमायतनगर शहरात आगमन होताच प्रथम येथील श्री परमेश्वर मंदिरात पादुकांचा अभिषेक करण्यात आला. दिंडीत सामील झालेल्या सर्व वारकर्यांचे परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ व जेष्ठ संचालक देविदास मुधोळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येउन पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

सहकार्य लाभलेल्या पत्रकारांचा सत्कार

बळी प्रथेच्या चांगल्या कामासाठी हिमायतनगर तालुक्यातील जेष्ठ नागरिक व पत्रकार बांधवांनी मोलाचे सहकार्य केले. त्या सर्व पत्रकारांचा सत्कार प्रभू महाराज पिटलेवाड व त्यांच्या भजनी मंडळाच्या लोकांनी पुष्पहार, शाल श्रीफळ देऊन सत्कार करून आभार मानले. यावेळी महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, देविदास मुधोळकर, हनुसिंघ ठाकूर, किरण बिच्चेवार, डॉक्टर अशोक उमरेकर, बाबुराव भोयर गुरुजी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग गाडगे, उपाध्यक्ष दत्ता शिरणे, परमेश्वर शिंदे, सचिव अनिल मादसवार, संघटक कानबा पोपलवार, कोषाध्यक्ष अनिल भोरे, दिलीप शिंदे, छायाचित्रकार सोपान बोम्पीलवार, माधव यमजलवाड व वारकरी उत्तम नरवाडे, माधव नावडे, आजापराव मसुरे, राधाकृष्ण देशपांडे, सुभाष बोईनवाड, दशरथ जाधव यांच्यासह महिला भजनी मंडळ उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा