NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, ९ एप्रिल, २०१४

विकास कोणाचा?

हदगांव/हिमायतनगर(वार्ताहर)शेतकरी, शेतमजुर, मराठा, दलित, मुस्लीम, अदिवासी, बंजारा व बेरोजगार युवकांच्या मुळावर उठलेल्या जातीयवादी आघाडी सरकारला गाडुन टाका असे प्रतिपादन हदगांव तालुका शिवसेना प्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांनी हदगांव तालुक्यातील मनाठा, बामणीफाटा, शेंदन, डाक्याची वाडी, तामसा, हिमायतनगर, निवघा, वाळकी, कव्हळी, नेवरी, दुधड, जिरोणा अशा अनेक सभातुन आघाडी सरकारवर तोफ डागत आपला झांझावती प्रचारातुन वानखेंडेसाठी मत मागत आहेत.

केंद्रात, राज्यात कॉग्रेसचे सरकार जिल्हयाचा मुख्यमंत्री तालुक्याला कॉंग्रेसचा आमदार असतांना काय विकास साधला व कोणाचा विकास साधला असा खोचक सवाल करत हदगांव तालुक्यात कधी नव्हे ते टक्केवारीच्या माध्यमातुन पाहतापाहता कॉंग्रेसच्या पुढार्‍याचा मात्र विकास झाला पुढारी तुपाशी तालुका उपाशी अश्या भ्रष्ट लोकांना त्यांची जागा दाखवुन देण्याची वेळ आली असल्याचे आष्टीकर म्हणाले. मागील विधानसभेत जिल्हयाचा मुख्यमंत्री होणार व आपल्या भागाचा विकास होईल व आपले प्रश्‍न मार्गी लागतील या आशेने हदगांव हिमायतनगर तालुक्यातील जनतेने मताधिक्याने कॉग्रेसचे आमदार निवडुन दिला पण निवडुन आल्यावर तालुक्यातील जनतेच्या पदरी निराशाच पडली एकही प्रश्‍न मार्गी लागला नाही. शेतकरी, मराठा समाज, दलित, अल्पसंख्याकचे प्रश्‍न तसेच कायम राहीले. या कॉग्रेसच्या पुढार्‍याकडुन घोर निराशा झाली आमदार झाल्यावर मतदाराकडे पाठ फिरविणार्‍या व त्यांच्या प्रश्‍नाला बगल देणार्‍या कॉग्रेसच्या आमदाराला त्याची जागा दाखवुन दया.

याच धरतीचे नेते आ. सातवांची सुध्दा अशाच पध्दतीची वागणुक असुन त्यांच्यावर कळमनुरी मतदार संघातील मतदार नाराज असुन निवडुन आल्यावर आपल्या मतदारसंघात फिरकले नाही. खा. सुभाष वानखेडे हे सर्वसामान्यात राहणारा व सर्वसामान्याचे दु:ख जाणणारा नेता असुन हिमायतनगर तालुक्याचा प्रश्‍न निकाली काढणारा व आपल्या प्रश्‍नाला तालुक्याला न्याय मिळवुन देण्यासाठी विधानसभेत, लोकसभेत आवाज उठवणार्‍या खा. वानखेडेंना विजयी करण्याचे भावनिक आवाहन आष्टीकर यांनी केले.

हदगांव तालुक्यात निवडणुकीच्या तोंडावर खोटे आश्‍वासने देत नारळे फोडत फिरणार्‍या कॉग्रेसच्या आमदाराला आजच का तालुक्याच्या प्रश्‍नाची आठवण झाली? तालुक्यातील जनतेला वार्‍यावर सोडुन मुंबईत राहणार्‍या व शेतकरी, शेतमजुर, मराठा, दलित, मुस्लीम, अदिवासी, बंजारा, ओबीसी व बेरोजगार युवकांच्या प्रश्‍नाला साडेचार वर्षात न्याय देता आला नाही व याबाबत त्यांनी विधानसभेत तोंडही उघडले नाही. अश्या कॉग्रेसच्या आमदाराकडुन कॉग्रेसच्या लोकसभा उमेदवारासाठी मते मागली जातात व खोटी आश्वासने दिली जातात या कॉग्रेसच्या खोटारडयावर विश्वास ठेवु नये व महायुतीचे उमेदवार खा. सुभाष वानखेडेंना विजयी करुन संसदेत पाठवुन शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी व नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन नागेश पाटील आष्टीकर यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा