NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

रविवार, २ मार्च, २०१४

विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी

हिमायतनगर येथील विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी
तिसऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत १२ विद्यार्थ्यांचे यश

हिमायतनगर(वार्ताहर)औरंगाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या तिसर्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत हिमायतनगर येथील राजाभागीरथ विद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रजत व कास्य पदक जिंकून घवघवीत यश संपादन केले आहे.

नुकतेच औरंगाबाद येथे चायनीज मार्शल आर्ट - वूशु - कुंग - फू स्पोर्ट असोशियनच्या वतीने तिसरी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत हिमायतनगर येथील महाराष्ट्र वादोकाई कराटे क्लासेसचे तथा राजा भगीरथ विद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षक खंडू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला होता. ब्लैक बेल्ट या ग्रुपमधून १४ ते १८ वयोगटातील कु.शुभांगी गाजेवार, अनिकेत गुडेटवार, राविसागर महाजन, राजू कदम या चार विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे सुवर्ण पदक जिंकले आहे. रविराज कदम, संदेश नरवाडे या विद्यार्थ्याने रजत तर नागनाथ आंबेपवाड, रघु देशमुख, वृषभ मिराशे, सतीश गुरगुटवाड, सोहम जन्नावार, शेख फिरदोस, यांनी तृतीय क्रमांकाचे कास्य पदक जीकले आहे.

सुवर्ण पदक जिंकांर्या विद्यार्थ्यांचे गोवा येथे होणार्या कराटे असोशियनच्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या कराटेपटू विद्यार्थ्यांना प्रशिक्षक खंडू एम.चव्हाण यांनी प्रशिक्षण देवून घडविले आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग गाडगे, सचिव अनिल मादसवार, कार्याध्यक्ष प्रेमकुमार धर्माधिकारी, संघटक कानबा पोपलवार, उपाध्यक्ष दत्ता शिराणे, परमेश्वर शिंदे, कोषाध्यक्ष अनिल भोरे, दिलीप शिंदे, धम्मा मुनेश्वर, पालक राजू गाजेवार,पुंडलिक कदम, राम गाडेकर, योगेश चीलकावार, सुमित कागणे, नीरज गाडेकर, संतोष माने, लक्ष्मीकांत होळकर, यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा