NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, ५ मार्च, २०१४

नियुक्त्या तातडीने करण्याची मागणी

हिमायतनगर तालुक्यात कालबाह्य विशेष कार्यकारी अधिकारी सक्रिय ..
नवीन नियुक्त्या तातडीने करण्याची मागणी  

हिमायतनगर(वार्ताहर)सामान्य जनतेच्या हितासाठी पालकमंत्री यांच्या आदेशावरून नियुक्त करण्यात आलेले विशेष कार्यकारी अधिकारी यांची मुदत संपून कालबाह्य झाले असतानाही अजूनही ते सक्रिय असून, तातडीने नवीन विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून होत असलेल्या पदाच्या गैरप्रकाराला आळा घालण्याची मागणी जानकारातून होत आहे.

या बाबत सविस्तर असे कि,शासनाच्या विविश योजना, शैक्षणिक अभ्यासक्रम प्रवेश, व इतर सर्व शासकीय कामासाठी देण्यात येणाऱ्या प्रस्तावाची कागदपत्रे दाखल करताना मुल दस्ताऐवजाच्या झेरोक्स प्रती साक्षांकित केल्याशिवाय सदर प्रस्ताव दाखल करून घेतला जात नाही. हिमायतनगर तालुक्यात ५५ गावामध्ये विशेष कार्यकारी पदाच्या नियुक्त्या करण्यासाठी मा.पालकमंत्री यांच्या आदेशानुसार ८ जून २०१२ रोजी जिल्हाधिकारी यांनी पत्र क्रमांक २७ अन्वये पोलिस अधीक्षक यांना कळविले होते. सदर पत्राची दाखल घेवून नांदेडच्या पोलिस अधीक्षक यांच्या स्वाक्षरीने जावक क्रमांक जेविशा/ विशेष कार्यकारी अधिकारी / चाप /४८७९ /१२ दिनांक १६ जून २०१२ अन्वये हिमायतनगर पोलिस ठाणे यांना या संदर्भात पालकमंत्र्यांनी शिफारस केलेल्या ५५ व्यक्तीच्या चारित्र्य विषयीचा अहवाल तत्काळ पाठविण्याचे आदेश दिले होते. तसा अहवालही हिमायतनगर ठाण्याकडून पाठविण्यात आला होता. परंतु आजतागायत पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांनी संदर्भात कोणतीच कार्यवाही केली नाही. परिणामी विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या निवडी रखडल्यामुळे याची अडचण सुशिक्षित विद्यार्थी, लाभार्थी,बेरोजगारांना होत आहे. झेरोक्स प्रती साक्षांकित करण्यासाठी विशेष कार्यकारी अधिकार्यांना शोधत गल्लो - गल्ली फिरावे लागत आहे.हि अडचण दूर करण्यासाठी विद्यमान जिल्हाधिकार्यांनी रखडलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तातडीने करव्यात अशी मागणी सामान्य नागरीकातून केली जात आहे.

कालबाह्य अधिकार्याकडून साहित्याचे उपयोग सुरूच 

विशेष कार्यकारी अधिकारी या पदाची निवड हि दोन वर्षाच्या काळासाठी असते. सदर कालावधी संपल्यानंतर संबंधितानी आपल्याकडील प्रमाणपत्र, सूचनापत्र, ओळखपत्र, रबरी शिक्का, आदी साहित्य जिल्हाधिकारी कार्यालय किंवा स्थानिकाच्या पोलिस स्थानकात जमा करणे आवश्यक आहे. परंतु येथील काहींनी सदरचे साहित्य जमा न करता मुदत संपूनही त्याचा उपयोग करीत असल्याचे कळते.           

टिप्पणी पोस्ट करा