NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

मंगळवार, ११ मार्च, २०१४

" बळीप्रथेला " लगाम...

एकंबा यात्रेतील " बळीप्रथेला " न्यायालयाच्या आदेशाने लगाम... 


नांदेड(अनिल मादसवार)हिमायतनगर येथून जवळच असलेल्या मौजे एकंबा येथे दरवर्षीप्रमाणे भरणाऱ्या कानोबा (कानिफनाथ) यात्रेत भाविकांकडून हजारो बकर्याचा बळी देण्याची प्रथा आज मंगळवार ता.११ रोजी  न्यायालयाच्या आदेशाने बंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील मौजे एकंबा येथे दरवर्षी दशमीच्या दिवशी नवनाथांपैकी एक असलेल्या कानोबा (कानिफनाथ) महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहाने भरविण्यात येते. कानिफनाथ महाराजाने आपल्या सातशे शिष्यांसह धर्मप्रचाराचे काम निजामी राजवटीत केल्याच्या आख्याईका काही बुजुर्ग व्यक्तींकडून सांगण्यात येतात. औरंगजेबाच्या काळात येथे महसूल वसुलीसाठी येणाऱ्या तत्कालीन राजवटीतील अधिकार्यांना खुश करण्यासाठी बकऱ्याचा बळी देवून त्यास मेजवानी देण्याची प्रथा होती अशी दंतकथा या बळीप्रथेच्या संदर्भात सांगितली जाते. कालांतराने तीच प्रथा कायम होऊन दशमीच्या दिवशी यात्रेत कानिफनाथ मंदिरासमोर काही उत्साही आंधश्रद्धाळू भाविकांकडून बकऱ्यांचा बळी देण्याची प्रथा रूढ झाली. 

परंतु १९७० च्या नंतर त्याचे स्वरूप बदलले आणि यात्रेत हजारांवर बकऱ्यांचा बळी देण्याचा परिपाठ सुरु झाला. अंदाजित १९७० साली येथे १५ बकऱ्यांचा बळी देण्यात आला. २००३ साली हाच आकडा ८० वर पोहोचला. तर २०१० साली याची संख्या १२० झाली दर वर्षी बकऱ्यांचा बळी देण्याच्या संखेत झपाट्याने वाढ होत असून, आजघडीला हजारो बकर्यांचे शिरच्छेद करून त्यांचा बळी चढविल्या जात होता. तसेच मृत बकर्याचे शव हे दोघे जन धरून मंदिरापासून ते गावातील रस्त्यावरून घरी नेले जात होते. त्यामुळे बकर्याच्या मासाचे तुकडे व रक्ताचे थेंब पडत असल्याने हे भयावह दृश्य पाहणार्यांचे मन विच्छिन करणारे दिसते. त्यामुळे चिमुकल्या बालकांना भीती तर माळकरी व भक्त गणांना किसळवाणे दिसत होते. परंतु हि अघोरी प्रथा काही वारकरी संप्रदायातील महिला - पुरुष मंडळीना खटकली. आणि त्यांनी या बळी प्रथेला १९७० पासून प्रभू महाराज पिटलेवाड यांच्या नेतृत्वाखाली विरोध करण्यास सुरुवात केली. हजारो बकर्यांचा बळी त्यांच्या रक्त मासांचा चिखल हे वारकर्यांना बघावेनासे झाले. म्हणून त्यांनी हि प्रथा कायमची बंद करण्यासाठी तीव्र लढा उभा केला. शेवटी प्रभू महादजी पिटलेवाड या वारकर्याने ३१ जानेवारी २०१४ ला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड पिठात पुराव्यानिशी याचिका दाखल केली होती. सबळ पुरावे लक्षात घेत दि.१० मार्च २०१४ रोजी मौजे एकंबा येथील दिल्या जाणाऱ्या बळी प्रथा बंद करण्याचा आदेश आर.एम.बोरडे आणि ए.एम.बदर यांच्या खंड पीठाने दिला. या कामी विधी तज्ञ मुकेश गोयंका यांनी बाजू मांडली होती.    

हि अघोरी प्रथा बंध करण्यासाठी न्यायालीन लढा लढणारे प्रभू महाराज पिटलेवाड यांनी न्यालयाच्या आदेशाचे स्वागत करीत दीर्घ कालीन लढलेल्या लढ्यास यश मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. या दीर्घ स्वरूपाच्या न्यायालीन व न्यालायाबाहेरील लढा उभे करण्यासाठी उत्तम नरवाडे, अजबराव मुसळे, पंजाबराव कुरमे, विनोद वानखेडे, देवराव देवसरकर, डॉक्टर खंदारे, बालाजी हम्पोलकर, शेषराव बोरडे, मधुकर वानखेडे, माधव नरवाडे व वारकरी संप्रदायातील महिला शारदाबाई सूर्यवंशी, लक्ष्मीबाई मसुरे, सुरेखाबाई बोइनवाड, सुरेखाबाई वानखेडे, भगिरथ बोइनवाड, भगिरथ कल्याणकर, शशिकलाबाई कल्याणकर, रुखमाबाई कानजुडे, जिजाबाई दरेवाड, रेनुकाबाई चमकुलवाड आदींनी सहकार्य केले. 

आज भरविण्यात आलेल्या यात्रेत न्यायालयाच्या आदेशानुसार चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात येवून या बळी प्रथेला आळा घालण्यात आला आहे. दरम्यान सकाळीच तहसीलदार जरड , पोलिस उपनिरीक्षक सुशील चव्हाण, व त्यांचे सहकारी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सल्लागार प्रकाश जैन, सचिव अनिल मादसवार, संघटक कानबा पोपलवार, धम्मपाल मुनेश्वर आदी मंडळीनी भेट देवून पाहणी केली.       न्यायालयाने दिलेल्या निर्णय हा योग्य असून, अनेक वर्षाच्या लढ्याला यश आल्याचे समाधान मला वाटत आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली देवाजवळ पशु हत्या करणे हा क्रूर प्रकार थांबणे गरजेचे होते, ते आज बंद झाले.                                                          
                                                     ... अंजनाबाई बापूराव हम्पोलकर , एकंबा
आमच्या गावातील कानिफनाथाच्या मंदिरासमोर बकऱ्याचाबळी देण्याची प्रथा निजाम शाहीपासून हि अनिष्ठ प्रथा चालू होती. यास लगाम लागल्याने गावातील उत्सव शांतते साजरा केल्याचे समाधान मिळाले...

... पार्वतीबाई टिकाराम कदम, एकंबा मागील ३० वर्षापासून देवाची वारी करतो, समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या न जाता बळी प्रथा बंद करण्यात न्यायालयास यश मिळाले आहे. अश्या प्रकारचे परिवर्तन झाल्याशिवाय अंधश्रद्धा दूर होणार नाही...
                                                                  
                                                                          .. सदाशिव कोड्गीरे, बोरगडी   न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत - हामंद 

याचिकाकर्ता आणि न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतच करायला पाहिजे. सामान्य जनतेची मानसिकता बदलणे ही काळाची गरज आहे. न्यायालयाने बळीप्रथेला बंदी घालून चांगला निर्णय दिला आहे. त्याचबरोबर या निर्णयाची यशस्वीपणे अंमलबजावणी करणारे पोलिस प्रशासनही अभिनंदनास पात्र आहे. असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ.शिवदास हामंद यांनी व्यक्त केले.

    
टिप्पणी पोस्ट करा