NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, ७ मार्च, २०१४

परमेश्वर यात्रेच्या पशुप्रदर्शनात

परमेश्वर यात्रेच्या पशुप्रदर्शनात सरसमच्या मिराशे यांची जोडी अव्वल

हिमायतनगर(अनिल मादसवार)श्री परमेश्वर यात्रा महोत्सवाला दिवसेदिवस रंग चढु लागला असुन, दि. ०७ मार्च रोजी झालेल्या पशु प्रदर्शनात आकर्षक अश्या २३ गावरान बैलजोड्या ०९ संकरीत गाय, दोन संकरीत कालवड , १० गावरान कालवड, १४ गावरान गोरा, १२ गावरान गाय आदिंसह शेकडो पशुपालकांनी सहभाग नोंदवीला होता. प्रदर्शनात आलेल्या पशुंची पहाणी पर्यवेक्षक पशुवैद्यकीय अधिका-यांनी करुन योग्य अश्या पशुपालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले. प्रदर्शन दरम्यान पुढील वर्षी आणखी वेग-वेगळ्या पध्दतीचे पशु-जनावरांचा या प्रदर्शनात सहभाग नोंदवीण्याचे आव्हाण मंदिर संस्थानव्दारे करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये गावरान बैलजोडीतुन सोहम आनंदा मीराशे सरसम यांच्या ढवळ्या बैलजोडीस प्रथम क्रमांकाचे पारीतोषीक 2000 रुपये देण्यात आले. व्दीतीय बक्षीसाचे मानकरी श्री सतीश प्रकाश नागरखेडे खडकीकर, तृतीय पारीतोषीक श्री रमेश दिगांबर शिंदे सरसम, चौथे पारीतोषीक उत्तम बळीराम चव्हाण हिमायतनगर, पाचवे पारीतोषीक पवन करेवाड, सहावे, सुनील देशमुख, सातवे लक्ष्मण चव्हाण, आठवे मारोती भदेवाड यांच्या बैलजोडीस देण्यात आले आहे. गावरान गो-हयामध्ये प्रथम क्रमांक शिवाजी हंगरगे वडगांव, दुसरा क्रमांक लक्ष्मण हाके पार्डी, तिसरा क्रमांक लक्ष्मण मोकलवाड यांना देण्यात आले. गावरान गाईत प्रथम बक्षीस संटी कप्पलवाड पवना, व्दीतीय शुभम संतोष गाजेवार, तिसरा क्रमांक दत्ता कोमलवाड सिबदरा या पशुपालकास देण्यात आला. गावरान कालवडीमद्ये प्रथम रघुनाथ कदम सरसम, दुसरा क्रमांक संतोष रावते हिमायतनगर यांना देण्यात आला. संकरीत गाईच्या स्पर्धेत प्रथम - तुकाराम मुधोळकर, व्दीतीय - सुधाकर मुत्तलवाड, संकरीत कालवडीच्या स्पर्धेत प्रथम विठल कुपटे, व्दीतीय आकाश ढोणे या शेतक-यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. तर अन्य विशेष पशुंच्या पालकांना पशुंची निगा व ठेवन या अनुसार उपस्थितांकडुन उत्तेजनार्थ बक्षीस मंदिर ट्रस्टच्या वतीने वितरण करण्यात आले. यावेळी परीक्षक पशुवैदयकीय अधिका-यांसह अन्य मान्यवरांचे स्वागत परमेश्वर ट्रस्ट कमेटीच्या वतीने श्रीफळ देऊन करण्यात आले.

यावेळी यात्रा कमेटीचे अध्यक्ष श्री लक्ष्मण शक्करगे, उपाध्यक्ष सुभाष शींदे, सचीव संजय माने , भोकरचे पशुवैद्यकीय अधिकारी अविनाश बुन्नावार, किनवटचे डॉं. इरफान, हिमायतनगरचे डॉ.व्ही.एन.बीराजदार, डॉ.पंकज लोखंडे, डॉ. माघाडे साहेब, के.आर.पवार, श्री के.जे.बोयवार, श्री केाटुरवार, एस.आर.शिंदे आदिंसह ट्रस्ट समीतीचे उपाध्यक्ष श्री महावीरचंद श्रीश्रीमाळ, राजेश्वर चिंतावार, प्रकाश कोमावार, प्रकाश शिंदे, देवीदास मुधोळकर, संभाजी जाधव, आनंता देवकते, राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, विजय शिंदे, नारायण करेवाड, ज्ञानेश्वर शिंदे, अवधुतराव बाचकलवाड, विठ्ठलराव चव्हाण, नारायण बास्टेवाड, पांडुरंग चव्हाण, संतोष गाजेवार, मुन्ना जन्नावार, बाळु मारुडवार, तुकाराम मुधोळकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरेग गाडगे, सल्लागार प्रकाश जैन, नांदेड न्युज लाईव्हचे संंपादक तथा सचिव अनिल मादसवार, उपाध्यक्ष दत्ता शिराणे, कार्याध्यक्ष प्रेमकुमार धर्माधाकीरी, संघटक कानबा पोपलवार, कोषाध्यक्ष अनिल भोर, सुनील सुवर्णकार, अशोक अनगुलवार, आदिंसह तालुक्यातील शेतकरी वांधव व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

अवकाळी पाऊस व गारपीटीचा फटका

नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीचा फटका यात्रेतील पशु प्रदर्शन व कृषी प्रदर्शनास बसला असुन, हव्या त्या प्रमाणात शेतकरी या कार्यक्रमास उपस्थीत झाले नव्हते. दरवर्षी पेक्षा या वर्षी शेतकरी व पशुंची संख्या कमी दिसुन आली आहे.

कृषी प्रदर्शनात फळ - भाज्यांची आवक 

श्री परमेश्वर यात्रा महोत्सवात प्रथमच कृषी प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते,यात बहुतांश शेतक-यांनी वीवीध प्रकारच्या फळ भाज्या आणुन उत्सफुर्तपने सहभाग नांेंदवीला आहे. यात भोपळा,रामफळ, हाळद,गाजर, गोबी, मीरची, मका, संत्रा- मोसंबी, तमाटा, अंब्याच्या कै-या, चिकु, केळी, डाळींब, काकडी, मुळा, सुर्यफुल, कांदा - लसुन, टरबुज, पपई आदी फळभाज्या प्रदर्शनात माडल्या होत्या. या सर्व पीक - फळांची पहाणी करण्यासाठी शेतक-यांनी गर्दी केली होती. या फळ - भाज्याच्या कृषी प्रदर्शनाची मांडणी पंचायत समीतीचे कृषी अधिकारी संजय लहाने,अव्दैत देशपांडे यांनी केली होती. परीक्षण मंदिर समीतीच्या लोकांनी करुन प्रथम व्दितीय क्रमांक निवडण्यात येऊन उपस्तीत मान्यवरांच्या हस्ते बक्षीस नितरण करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा