NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, ७ मार्च, २०१४

ठरणार लक्की मैन...?

खा. वानखेडे पुन्हा एकदा ठरणार लक्की मैन...?
पण सातवांशी होणार काट्याची फाईट...

हिमायतनगर(अनिल मादसवार)लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आणि राजकीय नेते आळस झटकून कामाला लागले. यातच विद्यमान खा. हिंगोली लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनी उमेदवारी जाहीर होतच हिमायतनगरात येवून वाढोणा नगरीचे आराध्य दैवत श्री परमेश्वराचे दर्शन घेतले. व पुन्हा एकदा लक्की मैन ठरणार असल्याचे संकेत दिले असले तरी..युवक काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष व काँग्रेसचे संभावित उमेदवार राजीव सताव यांच्याशी थेट सामना झाल्यास दोघात होणारी लढत तुल्यबळ होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

गात लोकसभा निवडणुकीत राजकीय गणित जुळवून विजय प्राप्त करणारे खा.सुभाष वानखेडे निवडणुकीनंतर मात्र या भागाकडे जास्त फिरकले नाहीत. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या शिवसैनिकांपासून चार हाथ लांबच राहिल्याने त्यांच्या या वागण्याने काही निष्ठावंत शिवसैनिक नाराज आहेत. तर काहींनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत दुसऱ्या पक्षाशी घरोबा केला. एकेकाळी सबंध तालुका भारत शिवसेनेचा दरारा कायम होता. शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर शिवसैनिक आक्रमक होताना दिसून येत होता. परंतु मागील काहीं काळात हिमायतनगर तालुक्यात शिवसेनेची वाताहत झाली. शिवसेनेला रसातळाला घालण्याचा जणू विडाच सुभाष वानखेडे यांनी उचलला कि काय..? असा प्रश्न खुद्द शिवसैनिकच विचारीत होते.

गेल्या चार वर्षात शिवैनिकांची खा. वानखेडे यांनी कोणताही संवाद साधला नाही. अतिवृष्टीत व सहस्रकुंड जालाविद्दूत प्रकल्पाला विरोध करण्यासाठीच फक्त वानखेडे हिमायतनगर अवतरले तेवढेच.. पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका नाहीत कि, खासदारकीच्या काळात केवळ घारापुर वगळता अन्य कोणत्याही ठिकाणी विकास कामाचे नारळ फुटले नाही. खासदारांच्या या विरहाने निष्ठावंत शिवसैनिक मात्र पुरेशे हतबल झाले. प्रत्येकाच्या खांद्यावर दिसणारी भगवी दस्ती आता तुरळक प्रमाणात मोजक्याच कार्यकर्त्यांच्या खांद्यावर दिसू लागली आहे. प्रबळ विरोधक नसल्यामुळे हदगाव हिमायतनगरची एक हाती सत्ता उपभोगणाऱ्या आ.जवळगावकरांनी शिवसेनेचा बालेकिल्ला भुई सपाट केला. विरोधकच उरले नसल्याने विकासाचा भरपूर निधी सर्वत्र खर्च करण्यात कोणतीही जवळगावकरांनी ठेवली नाही. वाड्या- तांडे - आदिवासी दुर्गम भागात आमदार निधी खर्च करत ज्या मतदारांनी नेतृत्वावर विश्वास दाखविला, त्यांनी कर्तुत्व सिद्ध केल्याच्या भावना या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत. याचाच फायदा आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला होणार असून, राजीव सताव या भागाला नवीन असले त्यांचा या भागात जनसंपर्क कमी असला तरी देखील आ.जवळगावकरांचे कार्य त्यांना तारणार असल्याने खा. वानखेडे हे पुन्हा एकदा लक्की मैन ठरणार कि..? राजीव सातवांपुढे अन लक्की ... हे येणार काळच ठरवेल हे मात्र निश्चित..
टिप्पणी पोस्ट करा