NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शनिवार, १ मार्च, २०१४

वानखेडे यांच्या उमेदवारीने

खा.सुभाष वानखेडे यांच्या उमेदवारीने कार्यकर्त्यात जल्लोष 


हिमायतनगर(अनिल मादसवार)लोकसभा मतदार संघातून शिवसेनेने खा.सुभाष वानखेडे यांची उमेदवारी जाहीर करताच हिमायतनगर - हदगाव तालुक्यातील कार्यकर्ते व युवकांनी जल्लोषपूर्ण वातावरणात फटक्याची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला आहे.

आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने नुकतीच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच शिवसेनेने शुक्रवारी यादी जाहीर केली आहे. त्यात लोकसभेसाठी हिंगोलीतून खा. सुभाष वानखेडे यांचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.  मागील लोकसभा निवडणुकीत तत्कालीन राज्यमंत्री  सूर्यकांता पाटील यांचा दारूण पराभव करीत सुभाष वानखेडे यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळेसही त्यांचा उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित होते. परंतु वसमत, कळमनुरी, माहूर मधील एका गटाचा त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. परंतु सुभाष वानखेडे हे विद्यमान खासदार असल्याने व त्यांच्या तोडीचा दुसरा उमेदवार नसल्याने पुन्हा एकदा पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. 

केदारनाथ - परमेश्वराचे दर्शन 

लोकसभेची उमेदवारी जाहीर होताचे एकीकडे फटक्याची आतिषबाजी तर दुसरीकडे खा.वानखेडे यांनी केदारनाथ व श्री परमेश्वराचे दर्शन घेवून आशीर्वाद घेतला आहे. हिमायतनगर येथील ट्रस्ट कमेटीच्या वतीने महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी वानखेडे यांचे जंगी स्वागत केले. यावेळी बर्याच युकानी शिवसेनेत स्वेच्छेने प्रवेश केले. याप्रसंगी शिवसैनिक,युवक व नागरिक बहुसंखेने उपस्थित होते.  

टिप्पणी पोस्ट करा